Saturday, September 20, 2025

विदर्भाच्या शेतकरी विधवा दिवाळीत देवाभाऊंच्या बंगल्यावर २० लाखाचा देवाभाऊंचा डबल बेड दर्शनाला जाणार

विदर्भाच्या  शेतकरी  विधवा  दिवाळीत देवाभाऊंच्या बंगल्यावर २० लाखाचा देवाभाऊंचा डबल बेड  दर्शनाला जाणार 

दिनांक -२१ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या आदेशाने सरकारने मुंबईतील मलबार हिल येथील वर्षा बंगल्याचे डबल बेड गादी, सोफा  पुरवठा करण्यासाठी निविदा मूल्य २०.४७ लाख संदर्भ आयडी २५०९१७४१७१२०० ने काढली असुन त्याचवेळी संदर्भ आयडी २५०९१७४१२४३०० ने वर्षा बंगल्याचे शेड, स्वयंपाकघर प्लॅटफॉर्म, सी. काँक्रीट आणि विविध कामांचे  नूतनीकरण करण्यासाठी निविदा मूल्य १९.५३ लाख त्याचबरोबर संदर्भ आयडी २५०९१८४९३५३० ने वर्षा बंगल्याचे प्लास्टर आणि रंगकाम करण्यासाठी  संदर्भ आयडी २५०९१८४९३५३० ने निविदा मूल्य १९.८७ लाख एकूण ६० लाखाचे टेंडर देवाभाऊंच्या सेवेत काढले आहेत ,हे सर्व काम ३० सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावयाचे आहे यापुर्वी माननीय मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामध्ये तसेच नंदनवन आणि देवगिरी बंगला, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे केटरिंग सेवांचा पुरवठा करण्यासाठी संदर्भ आयडी २५०४०९४८३४३० ने १०.२२ कोटी ची २९ एप्रिल २०२५ पूर्वी करण्यात आली आहेत त्यापुर्वी मागील ५ वर्षात मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर २० कोटी रुपये खर्च झाले आहेत आता आपल्या देवाभाऊ २० लाखाचा पलंग व गादी पाहण्यासाठी मागील डिसेंबर महिन्यांपासून शेतकरी आत्महत्या केलेल्या देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणी विशेष बसने "दर्शन यात्रा " काढुन मुंबईला भेट देणार असल्याची माहीती "मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " संयोजक शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिली . 

सध्या महाराष्ट्रावर १० लाख कोटीचे विक्रमी कर्ज झाले आहे तसेच राज्यात ६३ लाख हेक्टर मध्ये खरीपाची पिके पूर्णपणे बुडाली आहे व शेतकऱ्यांचे कमीत कमी ४० हजार कोटींचा लागवड खर्च बुडाला आहे त्यातच सरकारी व सहकारी बँकांनी यावर्षी निर्धारीत लक्ष्याच्या फक्त ४० टक्के पीककर्ज वाटप केले आहे शेतकऱ्यांनी बहुतेक पीककर्ज मायक्रोफायनान्स ,बजाज फायनान्स ,महिंद्रा फायनान्स ,नागरी पत  संस्था यांच्या कडुन २४ टक्के वार्षीक व्याजाने घेतले आहे या अभुतपुर्व संकटामुळे दररोज महाराष्ट्रात ७ ते ८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत मात्र सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी मध्ये व्यस्त आहेत तर आमचे देवाभाऊ शेकडो कोटींच्या जाहीराती करण्यात व्यस्त आहेत अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 

 "मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " मध्ये सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कुंकू पुसलेल्या शेतकरी विधवा वर्षा बंगल्यासोबत  सोबत नंदनवन आणि देवगिरी बंगला ,सिल्वर ओक बंगला ,मातोश्री नवीन व जुने ,कष्टाने मोलमजुरीकरून मराठी जनतेसाठी निवारा देण्यासाठी तयार केलेल्या राज ठाकरे यांच्या "शिवतीर्थावर " सुद्धा देव दर्शन करतील पार्वतीला ऑटो रिक्शा चालक वाहक एकेकाळी असलेले मराठा नेते एकनाथराव शिंदे व प्रतापराव नाईक यांच्या पुण्यभुमीचे दर्शन घेतील .या "महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा "आलेल्या शेतकरी विधवा बहुतेक बंजारा ,मराठा ,ओबीसी ,आदीवासी, दलीत असल्यामुळें यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची व्यवस्था आपल्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅट मध्ये करणार आहेत तसेच या "महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " करण्यासाठी कृषी विभागाला विशेष अनुदान सर्व शेतकरी विधवांना विश्व बँकेच्या १० हजार कोटीच्या कर्जातुन करावी अशा सूचना दत्तात्रय भरणे हे देणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 

=======================================================================

No comments: