पारोमिता गोस्वामी यांनी फुलविलेला श्रमिकांचा एल्गार लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार
पारोमिता गोस्वामी यांनी फुलविलेला श्रमिकांचा एल्गार लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार
चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या टोकाच्या जिल्ह्यात पारोमिता गोस्वामी यांनी फुलविलेला श्रमिकांचा एल्गार लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या व्यासपीठावर आला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहाने त्यास मानवंदना दिली.
एका अमराठी महिलेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा मोठेपणा आहे, अशा शब्दांत पारोमिता गोस्वामी यांनी सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबाबत राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. चळवळीत साथ देणार्या शांताबाई मढावी, गीताबाई मरसकोले, भीमबाई आत्राम, भीमबाई सीडा आणि विजा सिद्धावा या महिलांनाही त्यांनी व्यासपीठावर येण्याची विनंती केली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांचे स्वागत केले. राष्ट्राध्यक्षाही कौतुकाने पुढे सरसावल्या आणि त्यांनी आपल्यासोबत गोस्वामी आणि त्या महिलांसोबत छायाचित्रे काढू दिली. मी मूळची बंगाली असले तरी माझी कर्मभूमी ही महाराष्ट्रच राहिली आहे. आयुष्याच्या अंतापर्यंत मी चंद्रपूर, गडचिरोली भागांत राहूनच वंचित शेतकरी, मजूर, वेठबिगार, स्थलांतरित, बालमजुरांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी झटत राहणार असल्याचा निर्धारही गोस्वामी यांनी व्यक्त केला.
गोस्वामी म्हणाल्या की, या शांताबाई मढावींच्या अंगणात आमच्या श्रमिक एल्गारची स्थापना झाली. संघटनेच्या कामाची रूपरेषा त्यांच्या झोपडीत आखली गेली. आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींनी हडप करण्याच्या आंदोलनात त्यांनी साथ दिली. तुरुंगातही साथ दिली. चिमूर ते नागपूर हे दीडशे किलोमीटर अंतर आम्ही चालत गेलो. अनवाणी पायाने त्याही माझ्यासोबत राहिल्या.
No comments:
Post a Comment