Wednesday, October 19, 2011

सत्ता पक्षांची कापसाचा हमीभावाची मागणी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी विदर्भ जनआंदोलन समितीचा आरोप-लोकसत्ता

सत्ता पक्षांची कापसाचा हमीभावाची मागणी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी
विदर्भ जनआंदोलन समितीचा आरोप-लोकसत्ता

नागपूर, १८ ऑक्टोबर/प्रतिनिधी


काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची कापसाचा हमीभाव वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे. त्याचवेळी विरोधी पक्षाच्या यात्रेवरही समितीने टीका केली आहे. सत्ताधारी पक्ष कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत असताना विरोधी पक्ष या प्रश्नावर मौन बाळगून आहे. अशावेळी या कापूस उत्पादक शेतकऱ्याने कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न समितीचे किशोर तिवारी यांनी केला आहे.
ज्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कापसाचा हमीभाव फक्त ३०० रुपयाने वाढवून ३ हजार ३०० व ज्या सरकारने निर्यात धोरण शेतकरी विरोधी करून शेतकऱ्यांना गेल्यावर्षी दोन हजार कोटीचे आर्थिक नुकसान सहन करण्यास बाध्य केले, त्याच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सत्तेचे पद भूषवणारे सरकार व पक्षामध्ये पदाधिकारी असलेले नेते एकमेकांची चढाओढ करत कापसाला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल तर दुसरा ६ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा, अशी मागणी आपल्याच सरकारला करत आहेत. ५२ लाख हेक्टरमधील कोरडवाहू कापसाचे पीक बुडाले असताना व्यापारी खुलेआम लूट करत असल्यामुळे या नेत्यांची हमीभाव वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असून या नेत्यांनी हिंमत असेल तर त्यांच्या पदाचा व पक्षाचा राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या प्रामाणिक प्रश्नावर रस्त्यावर यावे, अशी मागणी केली आहे

No comments: