Thursday, October 27, 2011

म्हणे, प्रायोजक तत्त्वावर विदेशवारी! - कापूस उत्पादक पणनचे संचालक परतले-लोकमत

Thursday, 27 October 2011

म्हणे, प्रायोजक तत्त्वावर विदेशवारी! - कापूस उत्पादक पणनचे संचालक परतले-लोकमतम्हणे, प्रायोजक तत्त्वावर विदेशवारी! -
कापूस उत्पादक पणनचे संचालक परतले

यवतमाळ। दि. २७ (जिल्हा प्रतिनिधी) लोकमत
विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तर या दौर्‍याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तब्बल चार हजार कोटींच्या तोट्यात असलेल्या आणि डबघाईस आलेल्या पणन महासंघाच्या संचालकांची विदेशवारी रूईगाठींच्या खासगी व्यापार्‍यांनीच प्रायोजित केली असावी, असा आरोपही तिवारी यांनी केला आहे.
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=NagpurEdition-2-1-27-10-2011-db752&ndate=2011-10-28&editionname=nagpur
कापूस उत्पादकांच्या उत्थानासाठी (?) पणन महासंघाच्या संचालकांनी केलेली विदेशवारी चांगलीच गोत्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाची परवानगी असली तरी या दौर्‍यासाठी प्रायोजक शोधण्यात आल्याची कबुली खुद्द पणन महासंघाच्या अध्यक्षांनी दिल्याने हा दौरा आता वादग्रस्त ठरला आहे.
राज्यात पणन महासंघांचे एकही कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही अन् पणन संघाचे संचालकांनी म्हणे कास्तकारांच्या उत्थानासाठी दहा दिवसांची विदेशवारी केली. यात यवतमाळ जिल्ह्यातील चार, वर्धा दोन, अकोला दोन तर अमरावती जिल्ह्यातील दोन संचालकांचा समावेश आहे. यासाठी रितसर शासनाची परवानगी घेण्यात आली, मात्र पणन संघाचा किंवा शासनाच्या तिजोरीतील एक छदामही खर्च न केल्याचा दावा पणन महासंघाचा आहे. चीनचा दौरा आटोपून परतलेले पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी म्हणतात, चीनमध्ये कापसाची शेती मोठय़ाप्रमाणात होते. याचाच अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौर्‍यासाठी शासनाची केवळ परवानगी घेतली होती. पणन महासंघाचा एक छदामही या दौर्‍यावर खर्च करण्यात आला नाही. संपूर्ण दौरा प्रायोजक तत्वावर आयोजित असून काही रक्कम संचालकांनी स्वत:च्या खिशातून खर्च केल्याचे डॉ.हिराणी यांचे म्हणणे आहे. परंतु ते प्रायोजक कोण होते, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. चीनमध्ये भारतातील कापूस निर्यात व्हावा, येथील कास्तकाराला चीनची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि कापसाची खरेदी चीनने थेट पणन महासंघाकडून करावी, असा आग्रह धरण्यासाठी हा दौरा असल्याचा त्यांचा दावा आहे. एकीकडे किमान हमी भावाचा आकडा तीन हजार तीनशेवर स्थिरावला आहे तर दुसरीकडे सहा हजार रुपये प्रति क्विंटल दराचा कापूस खासगी व्यापारी चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरात विकत घेत आहेत. एकंदरीत संचालक तुपाशी अन् कास्तकार उपाशी, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तर या दौर्‍याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तब्बल चार हजार कोटींच्या तोट्यात असलेल्या आणि डबघाईस आलेल्या पणन महासंघाच्या संचालकांची विदेशवारी रूईगाठींच्या खासगी व्यापार्‍यांनीच प्रायोजित केली असावी, असा आरोपही तिवारी यांनी केला आहे.
=======================================================

No comments: