Monday, May 27, 2013

शेतकर्‍यांची व आदिवासींची उपेक्षा थांबवा - छत्तीसगडसारखी माओवादी चळवळ विदर्भात सुरू होण्याची भीती : विदर्भ जनआंदोलन समितीची वेळीच कार्यवाही करण्याची मागणी-लोकमत

शेतकर्‍यांची व आदिवासींची उपेक्षा थांबवा -

छत्तीसगडसारखी माओवादी चळवळ विदर्भात सुरू होण्याची भीती : विदर्भ जनआंदोलन समितीची वेळीच कार्यवाही करण्याची मागणी-लोकमत 

शेतकरी दुर्लक्षित 

■ विदर्भातील दहा हजार शेतकर्‍यांनी गेल्या दशकात मृत्यूला कवटाळले आहे.

■ आदिवासी व शेतकर्‍यांबाबत असलेल्या उदासीनतेमुळे दोन्ही वर्ग विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर आहे.

■ शेतकरी आत्महत्या थांबविणे व आदिवासींचे कुपोषण हे सरकारपुढचे सर्वात मोठे आव्हान आहे.

यवतमाळ : छत्तीसगडमधील बस्तर भागात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा विदर्भ जनआंदोलन समितीने तीव्र शब्दात निषेध केला आहे. मात्र विदर्भातील आदिवासी व शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाकडे त्यांनी सरकारला वेधण्याचे आवाहन विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी केले आहे.
आज शेतकरी आत्महत्या करून तर आदिवासी कुपोषण व भूकबळीने मरत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास छत्तीसगडसारखी माओवादी चळवळ विदर्भात सुरू होण्याला वेळ लागणार नाही. भ्रष्टाचारात गुंतलेल्या व जमीन, पाणी, कोळसा यासारख्या भौगोलिक संपत्तीची लूट करणार्‍या नेत्यांनी गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. लोकशाही मार्गाने आदिवासी व शेतकर्‍यांच्या समस्यांवर तोडगा निघाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. 
छत्तीसगडच्या भ्याड हल्ल्याचे कुणीही सर्मथन करू शकत नाही. मात्र ही परिस्थिती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्भवली हे सर्वांना मान्य करावे लागेल.विदर्भात गेल्या दशकात दहा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. ५0 हजार कुपोषित आदिवासी मृत्यूला जवळ गेले आहे. एकीकडे सरकार विकासाचे दावे करीत असताना शेतकरी व आदिवासी नैराश्य व दारिद्रय़ात जात आहे. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर मोठमोठय़ा योजनांची आणखी केली जाते. मात्र प्रत्यक्षात या योजना राबविताना उपेक्षितांना त्याचा लाभच मिळत नसल्याचे वास्तवही आहे. सर्व राजकीय पक्षांनी देशातील भौगोलिक संपत्ती व करदात्याकडून येणारा विकास निधी आपसात वाटून लूट सुरू केली आहे. भविष्याची चाहुल ओळखून वेळीच कार्यवाही करण्याची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) 

No comments: