Saturday, August 23, 2014

'फ्री इन -कमिंग'-भाजप - सेनेने राजू शेट्टी यांचा सल्ला गांभीर्याने घ्यावा -किशोर तिवारी 'फ्री इन -कमिंग'-भाजप - सेनेने राजू शेट्टी यांचा सल्ला गांभीर्याने घ्यावा -किशोर तिवारी 


दिनांक -२३ ऑगस्ट २०१४केंद्रामध्ये भाजपची सत्ता आल्यावर व महाराष्ट्रात कॉंग्रेस -राष्ट्रवादी  कॉंग्रेसचा दारूण  पराभव झाल्यावर मागील दोन महिन्यापासून दररोज १५ वर्षे आघाडी सरकारची व १० वर्षे संपुआ सरकारमध्ये सत्ता भोगलेले माजी खासदार व आमदार व सरकार दलाली  करणारे टोलवाले ,ठेकेदार शेकडो कोटीची संपती लुटणारे नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये दाखल होत आहेत यामुळे सामान्य जनता मात्र पार निराश झाली असुन या संताप देणाऱ्या 'फ्री इन -कमिंग' अनियंत्रित पोटभरू नेत्यांच्या प्रवेशावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सावध राहण्याचा जो सल्ला  दिला आहे याला भाजप -शिवसेनेने गांभीर्याने घ्यावे ,असा आपुलकीचा निरोप महायुतीला मागील लोकसभेत विनाशर्त पाठींबा देणारे विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी दिला आहे
http://www.loksatta.com/pune-news/raju-shetty-alerted-leaders-of-shivsena-bjp-796737/#.U_YnikK5fKw.twitterविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांची जागावाटपाबाबत झालेल्या  बैठकीनंतर राजू शेट्टी भाजप सेनेला नुकताच सल्ला देतांना म्हटले आहे कि , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जहाज बुडणार हे नक्की आहे. या जहाजाला ज्यांनी कुरतडले तेच नेते आता शिवसेना भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. कोणतेही जहाज बुडायला लागल्यावर त्यावरचे उंदीर सर्वात आधी उड्या मारतात. अशा पद्धतीने हे नेते महायुतीच्या जहाजात येऊ लागले आहेत. मात्र, त्यांच्या येण्यामुळे महायुतीचे जहाज बुडायला नको. कोणाला किती महत्त्व द्यायचे हे शिवसेना आणि भाजपने ठरविले पाहिजे, असाही सल्ला राजू शेट्टी यांनी दिला ,ह्या सूचना अत्यंत गंभीर स्वरूपच्या असून ज्या नेत्यांनी आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्राला बरबाद केले ,शेतकऱ्यांना आत्महत्या करावयास लावल्या तेच नेते महायुतीच्या मार्गाने सत्तेवर येणार असेल तर जनता हा कैल्यदायक प्रकार सहन करणार नाही असा इशाराही किशोर तिवारी दिला आहे .सरकार कोणत्याही पक्षाचे असो  सनातनी  भ्रष्ट खासदार व आमदार व सरकार दलाली चापलुस  व दुकानदारी म्हणून राजकारण करणारे टोलवाले ,ठेकेदार मस्तवाल  नौकरशाली सोबत सुरु केलेला  गोरघधंदा बंद करा व यांना यांच्या केलेल्या पापांची शिक्षा देण्यात यावी हि जनतेची मागणी असतांना त्यांनाच महायुतीमध्ये  मानाने घेऊन भाजप -सेना काय साध्य करणार आहे असा सवालही ,तिवारी यांनी केला आहे . जर  'फ्री इन -कमिंग' अनियंत्रित सुरु तर सर्व प्रामाणिक कार्यकर्ते घरी बसतील व पोटभरू नेते पक्षांचा ताबा घेतील व भाजप -सेनेला दुसरी कॉंग्रेस -राष्ट्रवादी पक्ष करतील तरी आता वेळ असतांना राजू शेट्टी  सबुरीचा सल्ला संयमाने घ्यावा अशी विनंती ,तिवारी यांनी केली आहे . 


No comments: