Wednesday, August 27, 2014

यवतमाळ जिल्ह्यात वीजपडून दहा नागरिकांचा मृत्यू-सगदा आणि रायसा येथील वीजग्रस्तांना किशोर तिवारी यांची भेट व मदत


यवतमाळ जिल्ह्यात वीजपडून   दहा नागरिकांचा मृत्यू-सगदा आणि रायसा येथील  वीजग्रस्तांना किशोर तिवारी यांची भेट व मदत 

 दिनांक -२८ ऑगस्ट २०१४

घाटंजी तालुक्यात सगदा आणि रायसा  परिसरात २0 ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. सगदा येथील मीरा नारायण अगीरकर  (५२) या महिलेसह रायसा  येथील गीता मंगाम (३५) ही आणि त्यांच्यासोबत परिंदा लक्ष्मण मंगाम(१३), ममता बाबाराव मंगाम (१४) ह्या दोन मुली शेतात काम करीत असताना वीज कोसळल्याने जागीच गतप्राण झाल्या. विदर्भ जन आंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी व आदिवासी नेते संतोष नैताम ,भीमराव नैताम व सामाजिक कार्यकर्ते शेखर जोशी यांनी पोळ्याच्या दिवशी  सगदा आणि रायसा या खेड्यांना भेट देऊन नारायण अगीरकर ,मंगाम परिवारच्या मंडळीचे सान्धवन करून खावटीची मदतही केली व या भागात वारंवार वीज पडण्याच्या घटना होत असल्यामुळे परिसरातील जनता भयभीत झाली असून  दरवर्षीच्या पावसाळय़ात वीज पडून मृत होणार्‍यांची संख्या लक्षात घेता शासनाने वीज पडण्यापूर्वी सूचना देणारी यंत्रणा (लाईटिनींग प्रेडिक्टर) जिल्हास्तरावर बसविण्यात आली आहे. मात्र गेल्याज पडून मृत झालेल्यांची संख्या बघता ही यंत्रणा सपशेल कुचकामी  असुन आपण हा प्रश्न सरकार मांडण्याचे आश्वासन किशोर तिवारी यांनी सगदा व रायसा येथे दिले . 

घाटंजी तालुक्यात सगदा आणि रायसा  आगीरकर व मंगाम परिवारातील चार निष्पाप बळी याशिवाय दुसर्‍याच दिवशी २१ ऑगस्टला महागाव तालुक्यातील करंजखेड येथे शेतात काम करीत असताना वीज कोसळली यात गजानन रामचंद्र जाधव आणि संतोष राघो जाधव हे दोघेही जागीच ठार झाले. टेंभी येथील शेतात निंदन करीत असताना वीज कोसळल्याने रेखा विलास शिंदे (४0) हीचा मृत्यू झाला. तर पुसद तालुक्यातील माणिकडोह येथील रहीवासी तुकाराम सखाराम पवार (४0) हे आपल्या दुचाकीने शेतात जात असताना दुपारी माणिकडोह घाटात त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात ते जागीच ठार झाले. तर महासोळी येथील एका शेतात वीज पडून किशोर रामप्रसाद राठोड (१८) या युवकाचा देखील मृत्यू झाला. कळंब तालुक्यातील गांधीनगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या छपरावर वीज कोसळली. यात एक विद्यार्थी जखमी झाला. त्यामुळे लाखो रुपये खचरून यंत्रणा बसविली असताना दहा जणांचा मृत्यू झाल्याने शासनाने वीज पडण्यापूर्वी सूचना देणारी यंत्रणा (लाईटिनींग प्रेडिक्टर)  कुचकामी आहे हे सिद्ध झाले आहे ,शासनाने सर्व जिल्हा मुख्यालयी लाखो रुपये खर्च करून वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेव्दारे वीज कोणत्या भागात आणि केव्हा कोसळणार, तिचा वेग किती असणार याचा अचून अंदाज मिळतो असा दावा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे संबंधित गावातील सरपंच, तहसीलदार, पोलिस आणि महसूल प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती विभागाकडून 'एसएमएस' पाठविले जातात. एवढे सर्व करूनही जिल्ह्यात दहा नागरिकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहे याला जबाबदार कोण असा सवालही तिवारी यांनी केला आहे . 

No comments: