Tuesday, January 6, 2015

‘आता तूच मुलांचे शिक्षण पूर्ण कर’-दुष्काळग्रस्त शेतकर्‍याचा पत्नीला शेवटचा निरोप


‘आता तूच मुलांचे शिक्षण पूर्ण कर’-दुष्काळग्रस्त शेतकर्‍याचा पत्नीला शेवटचा निरोप
शेतीमुळे दोनवेळ पोट भरणे अशक्य झाले असतांना आपल्यामुलाने  इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन सुगीचे दिवस एकदातरी दाखवावे अशा आशेने आभाळाला भिडणाऱ्या पोटभरू राजकीय नेत्यांच्या खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये  हजारो मुले शिक्षण घेत आहेत मात्र मागील तीन वर्षापासून सतत नापिकी व कापसाला मातीमोल भावात विकल्यामुळे कंगालझालेल्या शेतकऱ्यांना  खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजचा खर्च व कॉलेजची फी देणे न होत असल्यामुळे मुलांना घरी परत बोलवावे लागले आहे मात्र होतकरू मुलांनी शिक्षणाचा आग्रह धरल्यामुळे यवतमाळ जिल्यात मागील १५ दिवसात तांबा येथील सोमेश्वर वडे तर रुंझा येथील मनोहर पेंदोर यांनी आत्महत्या करून या समस्यातून पळ काढला आहे मात्र सोमेश्वर व मनोहरचा निरोप सरकारला केव्हा कळणार असा सवाल आज विचारला जात आहे.  सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खाजगी इंजिनीअरिंग कॉलेज सारख्या मोठ्या खर्चाचा भार थोडा जरी उचलला व येत्या दोन वर्षाचा सर्व खर्ज सरकारने घेतला तर शेकडो निरपराध दुष्काळग्रस्त  शेतकरी सोमेश्वरचा मार्गाने जाणार याकरीता हि मुलाखात देत आहे. 

'आपल्या लाडक्या मुलांच्या भविष्याचे स्वप्न पेरणार्‍या शेतकर्‍याला यंदाही पावसाने दगा दिला. दोन एकर कोरडवाहू शेतातील फक्त एकच क्विंटल कापूस घरी आला. घेतलेल्या कर्जाची परतफेड, मुलांचे शिक्षण पूर्ण होणार की नाही, अशा विंवचनेत सापडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील तांबा येथील सोमेश्‍वर कुंडलिक वडे या शेतकर्‍याने घरीच विषारी द्रव्य घेऊन आपली जीवनयात्रा संपविली अन् जाताजाता आपल्या अर्धांगिनीवर मुलांचे भविष्य सोडून दिले. ‘आता तूच मुलांचे शिक्षण पूर्ण कर’, असे शेवटचे शब्द भ्रमणध्वनीवर उच्चारले आणि प्राण त्यागला.
यवतमाळ जिल्हा कापसासाठी प्रसिद्ध असला तरी अल्प पावसाने या पिकाची पूर्णत: वाट लावली आहे. जिल्ह्यात पैसेेवारी ही पन्नास टक्क्यांपेक्षा कमी निघाली. यात बाभुळगाव तालुक्याची तर ४४ टक्केच आली आहे. तालुक्यातील तांबा येथील सोमेश्‍वर वडे हे कर्जबाजारीपणा आणि मुलांच्या शिक्षणाच्या काळजीने विवंचनेत सापडले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या रोशन व भूषण या मुलांचे शिक्षण पैशांअभावी अपूर्ण राहते की काय अशा विचाराने ग्रस्त असणार्‍या सोमेश्‍वर वडे यांना यावर्षी दुष्काळाने बेजार केले.
शासकीय कोट्यातून नंबर लागलेला मुलगा रोशन हा बुलढाण्याच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आणि भूषण हा नागपूर येथील वैनगंगा कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या शिक्षणासाठी २०११ मध्ये दोन एकर आणि २०१३ या वर्षात पुन्हा दोन एकर शेती विकली. यंदाचे शिक्षणाचे शेवटचे वर्ष असल्याने फीचे पैसे भरण्यासाठी कुठलीही सोय उपलब्ध नव्हती. शेवटी मुलांच्या खोली भाड्यासाठी घरी असलेली दुचाकी विकण्यात आली.
नापिकीच्या या वर्षात बँकेचे कर्ज फेडणे, मुलांचे शिक्षण पूर्ण करणे यासह घराचा प्रपंच कसा चालवायचा अशा समस्या सोमेश्‍वर वडेंसमोर निर्माण झाल्या. सोमवार, २२ डिसेंबरला कळंब तालुक्यातील दोनोडा येथील चुलतभावाच्या तेरवीसाठी सहपरिवार गेलेले सोमेश्‍वर कार्यक्रम आटोपून एकटेच घरी परत आले. भ्रमणध्वनीद्वारे मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास पत्नी आणि दोन्ही मुले यांच्याशी संपर्क साधून आपण अखेरचा निरोप घेत असल्याचे सांगितले. मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी पत्नीवर टाकून, आपली हतबलता व्यक्त करून सोमेश्‍वर वडेंनी शेवटचा श्‍वास घेतला.
आज रोशन वडे व भूषण वडे आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून घरी बसले आहेत सरकार बहरी आणी आंधळी झाली कोणीतरी आता समाजातून समोर येईल व त्यांचा आधार बनेल या साठी हे विवेचन करीत आहे आपण रोशन वडे यांच्याशी या ०७७९८३४१७४३ यावर सरळ संपर्क करून फुलनाहीतर फुलाची पाखळी यांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी मोलाची ठरणार आहे . 
किशोर तिवारी 
विदर्भ जनांदोलन समिती 
०९४२२१०८८४६

No comments: