Friday, April 10, 2015

न्यायालय-केंद्रीय व राज्याच्या मंत्रांच्या आदेशांना प्रशासनाने दाखविली केराची टोपली - जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी वांजरी धरणग्रस्तांचे उपोषण सत्ताग्रह

न्यायालय-केंद्रीय व राज्याच्या मंत्रांच्या आदेशांना प्रशासनाने दाखविली  केराची टोपली - जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी वांजरी धरणग्रस्तांचे उपोषण सत्ताग्रह 
दिनांक -१० एप्रिल २०१५
पंतप्रधान पैकेज मध्ये २००७ मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी फक्त ३५ हजार रुपये एकराने सक्तीने घेऊन न्यायालयाने एकरी लाख रुपये मोबदला द्यावा असा आदेश २०१३मध्ये देऊनही दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या घोषणा सरकारने भारत सरकारचे राज्य मंत्री हंसराज अहिर व महाराष्ट्र सरकारचे अर्थ ,वन व नियोजन मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी जानेवारी २०१५ मध्ये आदेश  दिल्यानंतरही उपासमारीला तोंड देत असलेल्या व दुष्काळ व नापिकीमुळे आत्महत्येच्या मार्गावर असलेल्या  यवतमाळ जिल्यातील केळापूर तालुक्यातील  वांजरी गावातील प्रकल्प शेतकऱ्यांनी शेतकरी नेते किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात  उपोषण सत्ताग्रह करून जर १ मे पुर्वी प्रलंबित मोबदला मिळाला नाही तर आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा सरकारला दिला आहे . 
मागील आठ वर्षांपासून वांजरी धरणात जमीन जाऊन भूमिहीन झालेले शंकर पवार ,दीपक मिसेवार ,तानबा पालकारे ,सुधाकर मासटवार , निशांत गौरकार ,मारोती शिंदे ,दौलत पलकारे ,घनशाम अडसर ,दीपक पालकरे ,वसंता अडसर ,शांताराम  कुंचालवार , चिंतामण विरुळकर , स्वरवती  पालकरे या शेतकऱ्यांनी सरकारला धरणाकरीता  आपली जमीन देण्यास २००७ मध्ये विरोध केला मात्र सरकारने त्यांची शेती सक्तीने घेतली व तात्पुरता फक्त ३५ हजार रुपये  प्रती एकर दराने मोबदला दिला त्यावेळी बाजारभाव २ लाख प्रती एकर होता ,त्यानंतर सरकारच्या निर्णयाविरुद्ध ६ वर्ष लढा दिल्यानंतर त्यांना  न्यायालयाने एकरी लाख रुपये मोबदला द्यावा असा आदेश २०१३मध्ये आदेश दिला मात्र सरकारला अनेक पत्र व नोटीस देऊनही या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही व मंत्रालयात जा व कमिशन द्या असा सल्ला वकिलांनी दीला मात्र उपासमारीला तोंड देत असलेले हे भूमिहीन झालेले शेतकरी भारत सरकारचे राज्य मंत्री हंसराज अहिर व महाराष्ट्र सरकारचे अर्थ ,वन व नियोजन मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांना शेतकरी नेते किशोर तिवारी यांच्यामार्फत जानेवारी २०१५ मध्ये भेटल्यावर आपल्याला ३१ मार्चपर्यंत सर्व पैसे  मिळण्याचे आश्वासन देण्यात आले व भारत सरकारचे राज्य मंत्री हंसराज अहिर व महाराष्ट्र सरकारचे अर्थ ,वन व नियोजन मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी सरकारला पत्रसुद्धा जानेवारी २०१५मध्ये दिले होते मात्र धरणग्रस्त शेतकऱ्यांना  एक दमडीही सरकारने दिली नाही उलट जिल्याधिकारी यांनी सिंचन विभागाकडे जाण्याचे पत्र या शेतकर्याना वारंवार देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे . 
सध्या वांजरी येथे जमिनीचा भाव कमीतकमी १०  लाख प्रती एकर असुन आपली जमीन गमावलेले शेतकरी आता आत्महत्या करण्याचा मार्गावर आहेत ,उपोषण सत्ताग्रहात   भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यान सोबत विदर्भ जनादोलन समितीचे सुरेश  बोलेनवार,मोरेश्वर वातीले , प्रीतम ठाकूर   संतोष नैताम ,मुरली वाघाडे ,भीमराव नैताम ,मनोज मेश्राम ,नंदकिशोर जैस्वाल ,नितीन कांबळे ,शेखर जोशी ,अंकित नैताम ,मोहन जाधव यांनी सुद्धा उपोषण सत्ताग्रहात भाग घेतला . सरकारने १ मे पुर्वी प्रलंबित मोबदला मिळाला नाही तर आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी  सरकारला दिला आहे . 

No comments: