Friday, April 24, 2015

"जंतर -मंतर" वरच्या एका गजेन्द्राच्या आत्महत्यावर ओरड करणाऱ्यांनी महाराष्ट्रात २०१५ मध्ये आत्महत्या केलेल्या ७०८ गजेन्द्रवर बोलावे -किशोर तिवारी


"जंतर -मंतर" वरच्या एका गजेन्द्राच्या आत्महत्यावर  ओरड करणाऱ्यांनी  महाराष्ट्रात २०१५ मध्ये आत्महत्या केलेल्या ७०८ गजेन्द्रवर  बोलावे -किशोर तिवारी 

दिनांक -२४ एप्रिल २०१५

सध्या आपच्या धरणे आंदोलनात  दिल्लीच्या जंतर -मंतर वर  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वासमक्ष आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्र गजेंद्रसिंग  यावर भारताच्या संसदेमध्ये व सर्व   प्रसारमाध्यमावर  आत्महत्याला जबाबदार कोण व गजेंद्रसिंग यांचे खरे मारेकरी कोण यावर चर्चा होत असून मात्र यावर्षी २०१५ मध्ये महाराष्ट्रात ज्या ७०८  तर विदर्भात ४७२ गजेंद्रसिंग सारख्या शेतकऱ्यांनी तसेच १९९५ पासून भारतमध्ये २०१४ पर्यंत ज्या ३ लाख १४ हजार व महाराष्ट्रामध्ये ६४५२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याला जबाबदार कोण व यांचे मारेकरी कोण असा सवाल विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केला असून यावर भारताच्या संसदेमध्ये व सर्व   प्रसारमाध्यमामध्ये जाहीर चर्चा का होत नाही कारण ज्या जागतीकरणाच्या व  खुल्या अर्थकारणामुळे  कृषी संकट आले आहे त्यावर आता राष्ट्रीय चर्चा आवश्यक झाली असून मुठभर लोकांना श्रीमंत करणारी व कोट्यावधी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास लावणारी विकास धोरणे बदलली पाहिजे हाच निरोप दिल्लीच्या जंतर -मंतर वर शेतकरी पुत्र गजेंद्रसिंग  शहीद होऊन दिला आहे मात्र सर्व सत्ताधारी हा निरोप दाबण्यासाठी  प्रयन्त करीत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे . 


 सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पीककर्ज व दुष्काळग्रस्त व तणावग्रस्त मदतीचे पॅकेज शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकत नाही यासाठी फक्त नाले रुंदीकरण हाच एकमेव पर्याय आहे, अशी मुक्ताफळे दररोज फोडत असुन, भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेती विकास व तणावग्रस्त शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी 'कर्जमुक्ती व हमीभाव वाढ' या गरजापूर्तीसाठी आवश्यक असलेली दिशा,धोरणे राबविण्यास अपयशी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे पीक आले असुन याअपयशाची जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यावी, अशीमागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करण्यात येत असुन नाले खोदून व जमिनीत ओलावा आणल्याने महाराष्ट्राचे कृषी संकट संपणार ही सरकारची दिवाळखोरी असून यावर्षी बारमाही सिंचनाची सोय असणार्‍या हजारो शेतक र्‍यांना कापूस, सोयाबीन , धानाला व तुरीला भाव न मिळाल्यामुळे झालेले नुकसान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहावे व ९0 टक्के शेतकरी बँकेचे थकबाकीदार आहेत, लाखो शेतकरी आर्थिक संकटामुळे मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, आजारांवर उपचार करण्यास दमडीही नाही,अन्न व चारा याची सोय सुद्धा नाही व अतिशय अडचणीत असलेले शेतकरी मायबाप सरकार मदतीला येईल, अशी भोळी आशा करणार्‍या शेतक र्‍यांना नितीन गडकरी शेतक र्‍यांनी सरकार व देवावर आता मदतीसाठी पाहू नये तर त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पिककर्ज व दुष्काळग्रस्त व तणावग्रस्त मदतीचे पॅकेज मिळणार नाही, असा निरोप देतात यामुळेच मागील तीन महिन्यात शेतकरी आत्महत्या मोठय़ा प्रमाणात वाढल्या असुन याला विदर्भाचे केंद्र व राज्यातील नेतेच जबाबदार असुन हेच विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्या ह्या शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे व शेतक र्‍यांच्या तोट्याच्या शेतीमुळे झालेल्या कर्जामुळे होत असून आपण यावर गुंतवणूक अधीक ५0 टक्के नफा या सुत्राने कृषीमालाला आधारभूत किंमत व सर्व शेतक र्‍यांना नवीन कर्ज देऊ असे आश्‍वासन दिले होते. आता चुप का असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे.

यावर्षी महाराष्ट्र सरकारने एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास ६0 टक्के गावांमध्ये पूणर्त: खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. यामुळे ९0 लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असून जागतिक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापूस, तूर, सोयाबीन व दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. अशा आणिबाणीच्या वेळी विदर्भाच्या शेतकर्‍यांनी भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना हमीभाव वाढ, पीककर्ज मुक्ती व कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे पीक घेण्यासाठी अनुदान अशी तीन सुत्री असलेला एकात्मिक कार्यक्रम सादर करण्यासाठी किशोर तिवारी यांनी विनंती केली होती मात्न सरकारने हमीभाव वाढ व पीककर्जमाफी देणार नाही हे स्पष्ट केल्यामुळे तणावग्रस्त शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.

No comments: