Sunday, April 26, 2015

साखरप्रश्नी पवारांना घेऊन मोदींना भेटताना नितीन गडकरी यांनी कापूस उत्पादकांच्या समस्या मांडाव्या -किशोर तिवारी

साखरप्रश्नी पवारांना घेऊन मोदींना भेटताना  नितीन गडकरी यांनी  कापूस उत्पादकांच्या समस्या मांडाव्या -किशोर  तिवारी 
दिनांक -२७ एप्रिल २०१५
ऊस उत्पादक शेतकरी व आजारी साखर उद्योगाचे प्रश्न केंद्रातून  सोडविण्यासाठी व  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याची तीव्रता सांगण्यासाठी  सोमवारी शरद पवारांना घेऊन पंतप्रधानांना केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी भेटणार  आहेत त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्राच्या ५० लाखावर कापूस उत्पादक  त्यातील  विदर्भातील ३० लाख कर्जबाजारी व कापसाचे जागतिक मंदी व नापिकीमुळे अतीतणावात असल्यामुळे मागील सहा महीन्यापासून  दररोज सरासरी ६ ते ७ आत्महत्या करणाऱ्या कोरडवाहु कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सर्वात गंभीर राष्ट्रीय अशा  कृषी समस्येवर  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचेशी चर्चाकरून तोडगा  तात्काळ काढावा अशी विनंती कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील दोन दशकापासून सतत लढा देणारे शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी केली आहे . 

ज्याप्रमाणे क्रूड तेलाच्या किमती घसरल्याने ब्राझीलने साखर उत्पादन जास्त झाले असल्यामुळे . ब्राझीलच्या साखरेचा दर १४ ते १५ रुपये किलो आला आहे भारतमध्ये सरकारी नियंत्रण व साखर उद्योगाना अनुदानामुळे  साखरेचा दर २२ ते २४ रुपये किलो आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्याची  संधी नाही. साखर मंदीचे संकट यंदापुरते मर्यादित नसून भविष्यातही ते येणार आहे. त्यामुळे या प्रश्नी दूरगामी धोरण ठरवावे लागेल हा   नितीन गडकरी यांचा युक्तिवाद कापासावारही लागु होतो कारण कापसाची किमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३०% कमी झाली आहे व कापसाची निर्यात ९० लाख गाठी वरून थेट ५० लाख गाठी वर आली आहे . कापसावरील मंदी भारतातील सर्व सुत व कापड गिरण्या यांच्या उद्योगाचे अस्तिव ध्योक्यात आले आहे तर महाराष्ट्रात यावर्षी १२ हजार कापसाचे जीन बंद असून सुमारे ५ लाखावर जीन कामगार उपाशी मरत आहेत एकीकडे यावर्षी कापसाचे बाजारभाव हमीभाव पेक्षा कमी झाल्यामुळे  सरकारने सी. सी  आय . मार्फत  विक्रमी खरेदी केल्यामुळे  सी. सी  आय कडे ९० लाख गाठी शिल्लक आहेत त्यामुळे येत्या २०१५-१६ च्या कापसाच्या हंगामात सुद्धा कापसाची मंदी कायम राहणार आहे अशा कठीण समयी साखर सोबत कापसावरही नितीन गडकरी आपले केन्द्र सरकारमधले वजन वापरावे अशी विनंती तिवारी यांनी केली आहे . 
एकीकडे  नितीन गडकरी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना साखरेच्या दरात स्थिरता आणण्यासाठी १० टक्के साखरेचा साठा केंद्राने विकत घ्यावा, साखरेवरील आयात शुल्क २५ वरून ४० टक्क्यांवर न्यावे. इथेनॉलवरील अबकारी कर रद्द करावा असा आग्रह धरतात मात्र यावर्षी महाराष्ट्र सरकारने   विदर्भ व मराठवाड्याचा  एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास टक्के गावांमध्ये पूर्णत: खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत व  ९० लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असून जागतिक मंदीचा मार बसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले असुन २०१५ मध्ये  ११६० च्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानतरही  कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताही पुढाकार न घेता उलट विदर्भाच्या शेतकऱ्यांनी सरकारवर मदतीची अपेक्षा करू नये हा निरोप जाहीरपणे वारंवार नितीन गडकरी अत्यंत वेदना देणारे असुन हा तर आम्ह्चा सरळसरळ विश्वासघात करीत असल्याचा आरोपही ,किशोर तिवारी यांनी केला आहे .  


No comments: