Saturday, July 15, 2017

बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत ग्रामीण महीला स्वयंसहायता प्रकल्पाला मुबंईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशन कडुन २५ लाखाचे अनुदान

बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत ग्रामीण महीला  स्वयंसहायता प्रकल्पाला  मुबंईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशन कडुन २५ लाखाचे अनुदान 

दिनांक १५ जुलै २०१७
महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी आत्महत्यागस्त यवतमाळ जिल्ह्यात सुरु असलेल्या बळीराजा चेतना अभियान कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ करण्याच्या द्रुष्टीने व कृषीमालाला  गावस्तरावर प्रक्रिया करून सरळ ग्राहकांना विकण्याच्या पेसा मधील २०० गावाच्या ग्रामपंचायतीच्या  अनुसूचित क्षेत्र स्थानिक विकास स्वराज्य मंडळ (महासंघ ) च्या पुढाकाराने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या व ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहायता प्रकल्पच्या पहील्या केंद्रासाठी अनिवासी भारतीय व इंग्लंड येथील एका मोठ्या  उद्योग समुहाचे उपाध्यक्ष रोहीत शेलाटकर यांच्या मुबंईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशन कडुन २५  लाख रुपयाच्या निधी देण्याची घोषणा पांढरकवडा येथे प्रकल्पाच्या आज कै वसंतराव नाईक शेतकरी  स्वालंबन मिशनच्या शेतकरी विधवा मेळाव्यात कार्यक्रमात केली  . या कार्यक्रमाला  वसंतराव नाईक शेतकरी  स्वालंबन मिशनचे  अध्यक्ष किशोर तिवारी ,मुबंईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशन कडुन राजेश तावडे ,यवतमाळ  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ,कृषी विभागाचे सभापती  श्याम जैस्वाल ,अनुसूचित क्षेत्र स्थानिक विकास स्वराज्य मंडळ (महासंघ )चे अध्यक्ष तुळशीराम कुमरे सचिव प्रवीणभाऊ कुळकर्णी ,माजी जी. प सदयस  आदिवासी सेवक पुरस्काराप्राप्त समाज  सेवक धर्माजी आत्राम ,विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळचे संचालक सी यू पाटील ,कापूस बियाणे संशोधन केंद्र ,पी के वि अकोला येथील डॉ टी एच राठोड ,के वि सी यवतमाळचे संचालक डॉ  एस यू नेमाडे ,पांढरकवडा वनविभागाचे उप वन संरक्षक गुरुप्रसाद ,मानद वन व वन्यजीव संरक्षक प्रा  डॉ विराणी ,उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते ,आदिवासी प्रकल्प अधिकारी डाखोरे ,मंडळ विकास अधिकारी घसाळकर ,शेतकरो नेते सुरेश बोलेनवर ,मोहन जाधव,आदिवासी नेते अंकित नैताम  यांचा कामांचा सत्कार मिशनकडून करण्यात आला . 
यावेळी ५० शेतकरी विधवांना पंजाबराव कृषी विद्यापिढाकडून सरळ वाणाच्या कापसाच्या बियाणांचे तर कृषीखात्यामार्फत युरियाचे ,दिलासा संस्थेकडुन देशी पाटा   बियाणांचे वाटप करण्यात आले तर  ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली . 
महिलांच्या स्वयंसहायता प्रकल्पची माहीती  देतांना शेतकरी   मिशनचे  अध्यक्ष किशोर तिवारी यांनी हा पहिला पायलट प्रकल्प पांढरकवडा येथे अनुसूचित क्षेत्र स्थानिक विकास स्वराज्य मंडळ (महासंघ ) च्या पुढाकाराने व मुबंईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या मदतीने सुरु करण्यात येत यामध्ये दालमिल सारखे प्रक्रिया उद्योग व कृषीमाल तारण ,ग्रामीण महिलांना स्वयं रोजगार प्रशिक्षण ,पत पुरवढा करण्यासाठी पतपेढी यासारखे जीवनमान उंचाविणारे कार्यक्रम सुरु करण्यात येतील व पुढील टप्यात पेसा अंतर्गत प्रत्येक २०० गावात दहा गावासाठी एक अशारीतीने एक केंद्र लोकसहभागातुन सुरु करण्यात येणार आहे अशी माहीती दिली 
मुबंईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशनचे राजेश तावडे यांनी सर्व शेतकरी विधवांच्या पाल्याना मागील पाचवर्षापासून विदर्भ जनआंदोलन समितीच्या माध्यमातुन उच्च शिक्षणासाठी देण्यात येत असलेली माहीती दिली व यापुढेही ही मदत गरजु पाल्याना देण्याची  घोषणा यावेळी केली . 
यावेळी यवतमाळ  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ,कृषी विभागाचे सभापती  श्याम जैस्वाल यांनी शेतकरी हितांच्या महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहीती दिली . भाजप सरकार ऐतिहासिक कर्जमाफी करून थांबणार नसुन आता शेतकऱ्यांना कर्जमुक्तीकडे खरी वाटचाल सुरु झाल्याची घोषणा केली यापुढे जिल्हापरिषदे मार्फत सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात  अनुदानाची रक्कम जमा होणार असुन मागील सरकारचे सर्व पोटभरू धंदे आता बंद करण्यात आल्याची माहीती  श्याम जैस्वाल यांनी दिली . 
पांढरकवडा वनविभागाचे उप वन संरक्षक गुरुप्रसाद यांनी एक हजार ग्रामीण जनतेला रोजगार मिळत असल्याची माहीती दिली व काळात वन विभाग व पेसा गावातील महासंघाच्या मार्फत रोजगार निर्मितीसाठी विषेय कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहीती दिली . 
उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते यांनी बळीराजा चेतना अभियान व अनुसूचित क्षेत्र स्थानिक विकास स्वराज्य मंडळ (महासंघ ) च्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या  ग्रामीण महीला  स्वयंसहायता प्रकल्पाला योजनांची जोड घालुन मदत करण्याची आश्वासन यावेळी दिले . 
माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांनी गोंद ,लाख ,मोहा ,तेंदु ,बांबू यांचे रोजगार निर्मितीचे महत्व समजून सांगताना यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांद्वारे वनखात्याच्या पुढाकाराणे   चंदनाच्या रोपांच्या लागवडीच्या कार्यक्रमाची माहीती दिली . 

विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळचे संचालक सी यू पाटील ,कापूस बियाणे संशोधन केंद्र ,पी के वि अकोला येथील डॉ टी एच राठोड ,के वि सी यवतमाळचे संचालक डॉ  एस यू नेमाडे यांनी महीला शेतकऱ्यांना व आदिवास्यांना कृषीकेंद्राची पायरी चढण्यापुर्वी एकदा आमचा सल्ला घ्या व लागवडीचा खर्च ५० टक्याने कमी करा अशी विनंती यावेळी केली . 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंचायत राज अधिकारी विनकरे यांनी केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अब्दुला गिलानी ,नितीन कांबळे , नंदूभाऊ जैस्वाल ,भीमराव नैताम ,शेखर भाऊ जोशी ,हिवरा सरपंच विलास आत्राम ,माजी जी. प सदयस लेतुज़ी जुनघरे उपस्थित होते . 
=============================================
No comments: