Friday, December 22, 2017

बोंडअळीग्रस्त कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे शेतकरी मिशनकडून स्वागत :कापसाचे बियाणे व पर्यायी पीकव्यवस्थेवर तोडगा काढा -किशोर तिवारी

बोंडअळीग्रस्त कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे शेतकरी मिशनकडून स्वागत :कापसाचे बियाणे व पर्यायी पीकव्यवस्थेवर तोडगा काढा -किशोर तिवारी 
दिनांक २३ डिसेंबर २०१७
महाराष्ट्र  राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना कृषी मंत्री भाऊसाहेब  फुंडकर यांनी काल  विधानसभेत  जाहीर केलेल्या मदतीचे कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी स्वागत केले आहे . भाजप सरकारने बोंडअळीग्रस्त  कापूस उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी प्रति हेक्टरी  प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये ते ३७ हजार ५०० रुपये इतकी मदत कृषीमंत्री श्री. फुंडकर यांनी घोषीत  केल्यावर आज किशोर तिवारी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात सरकारचे स्वागत करून कापसाच्या पिकावर बियाणांच्या उपयशानंतर विदर्भ -मराठवाड्याचे कापुस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले असुन या संकटावर कायमस्वरूपी तोडगा शोधण्याच्या प्रयन्तात गंभीरपणे चिंतन करण्याची गरज तिवारी व्यक्त केली आहे . 

यावर्षी ऑगस्टच्या सुरवातीला गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेले संकट आता   संपुर्ण विदर्भ व  मराठवाड्यात ,मध्यप्रदेश ,गुजरात राज्यात पसरले आहे यात महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले असुन मात्र कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांनी ह्या अभुतपुर्व संकटावर पुरेसे लक्ष न दिल्यामुळे  विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी  दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्यामुळे

कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनने गुलाबी  बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात लावून धरला होता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ,गुलाबी  बोंडअळीच्या संकटातुन कायम सुटका यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा सुरु केला होता या बोंडअळीच्या प्रकोप टाळण्यासाठी कालबद्ध पंचसूत्री तोडगा शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राच्या  सादर   केला आहे 

सध्या सरकारच्या घोषणेप्रमाणे कोरडवाहू कापूस उत्पादकास शेंदरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३० हजार ८०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३७ हजार ५०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. कापसाची मदत ही २ हेक्टरपर्यंत देण्यात येईल तरी वरील मदतीवर २ हेक्टरची मर्यादा ठेऊ नये अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे . 

No comments: