Thursday, December 28, 2017

प्रशासनाच्या उदासीनतेसमोर ग्रामीण जनता हतबल : सुकंडी-रूढा-कारेगाव-अर्ली येथील जनता दरबारात समोर आलेले सत्य

प्रशासनाच्या उदासीनतेसमोर ग्रामीण जनता हतबल : सुकंडी-रूढा-कारेगाव-अर्ली येथील जनता दरबारात समोर आलेले सत्य  
दिनांक -२८ डिसेंबर २०१७
केळापुर  तालुक्यातील अर्ली ,घुबडी ,कारेगाव बंडल , सुकंडी ,चनाका व रूढा  परीसरातील शेतकरी ,शेतमजुर ,आदीवासी ,कोलाम, पारधी यांच्या रस्ता ,वीज ,पाणी ,घरकूल ,अन्न सुरक्षा ,जमिनीचे पट्टे व आदीवासी ग्राम विकास  विकास योजनेपासुन वंचित ठेवण्यास प्रशासनाची उदासीनताच   कारणीभुत असुन सतत पाठपुरावा करूनही जनतेचे एकही काम होत नसेल तर याला जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा कै वसंतराव नाईक शेती स्वा . मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या रूढा ,कारेगाव व अर्ली येथील जनता दरबारात तक्रारीचा डोंगरच मांडल्यानंतर केली . 
एकाही घरात वीज नाही अशा सुकंडी कोलमपोडावर सर्व प्रथम तालुक्याचे तहसीलदार महादेव जोरवार , गट विकास अधिकारी मधुकर घसाळकर, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते ,उपअभियंता वीज विभाग शेख साहेब , उपविभागीय अन्न पुरवडा अधिकारी झाडे , विभागीय वन्य अधिकारी पवारसाहेब , सहायक निबंधक मेश्राम यांचे सह भेट दिल्यानंतर निवारा ,पिण्याचे पाणी ,वीज ,घरकुल यांचा प्रश्न मांडण्यात आला त्यावर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत तोडगा काढण्याचे आश्वासन  यावेळी देण्यात आले . 
रूढा  येथे या परीसरातील भाजप नेते शिवारेड्डी एल्टीवार हिवरीकर यांनी आयोजित जनतादरबारमध्ये ७७ वर्षीय निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी नरसिंगराव कुस्केनवार यांनी गावातील ग्रामसेवक कोणतेही काम करण्यास तयार नसुन ,प्रत्येक वेळी ग्रामविकासाच्या प्रश्न्नावर उपमानास्पद वागणुक देत असल्याची तक्रार केली . कोलामाना घरकुल योजनेपासुन व जमिनीच्या पट्टापासुन सतत वंचित ठेवण्यात येत असल्याची तक्रार नागारेड्डी तोटावार यांनी यावेळी  केल्यावर   ग्रामसेवकाविरुद्ध विभागीय चौकशी करून निलंबनाचा प्रस्ताव देण्याचा आदेश यावेळी दिला . 
शिवारेड्डी एल्टीवार हिवरीकर यांनी कापुस उत्पादक शेतकऱ्यांना  गुलाबी बोंडअळीचा फटका बसला असुन सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना तर यावर्षी प्रचंड नुकसान झाले असुन कृषी व महसुल खात्याने पंचनामे पुर्ण न केल्याची तक्रार यावेळी केली . 
कारेगाव येथे सरपंच कृष्णराव कनाके व भाजप नेते धनंजय झिल्पीलवार  यांनी येथील  आश्रम शाळा मागील दहावर्षापासुन ५० की मी नेण्यात आली असुन नवीन वास्तु तयार झाल्यानंतरही सुरु करण्यात आली नाही वारंवार आंदोलन करूनही कोणतीही कारवाई होत नाही अशी तक्रार केली तसेच टिपेश्वर अभयारण्यामुळे वन्यप्राण्यांचा तसेच वाघाचा प्रचंड त्रास होत असुन या परीसरात शेती करणे कठीण झाले असुन सामुहिक फेन्सिंग शेताला करण्याची मागणी तालुका भाजपचे उपाध्यक्ष नरेंद्र येनगुरवार पाटील यांनी यावेळी केली तसेच शेतीवरील लेव्हीची अट आता रद्द करण्यात यावी अशी मागणी नरेंद्र येनगुरवार पाटील यांनी केली आपण सरकारदारी याचा पाठपुरावा करण्याचे  आश्वासन  तिवारी यांनी यावेळी दिले . 
दिलीप मेश्राम व वेंकटरेड्डी सोमावार यांनी   अर्ली येथील शाळा राजकीय नेत्यांनी चालबर्डीला पळवली असुन जिल्हापरिषदेच्या शाळेवर शिक्षकांचा कट रचुन दुष्काळ ठेवण्यात येत असुन शेकडो मुलींना शिक्षणापासुन वंचित ठेवले जात आहे अशी तक्रार केली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अर्ली संपूर्णपणे आजारी असुन आरोग्यखाते व प्रशासन वांरवार भेटी देऊनही कारवाई करण्यास तयार नाहीत या गंभीर तक्रारींची  दखल घेत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत यांनी यावेळी दिले .
 सुकंडी -रूढा -कारेगाव -अर्ली येथे आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या नाकर्तेपणावर किशोर तिवारी नाराजी प्रगट करीत आपण याचा अहवालच मुख्यमंत्र्याना देणार असे यावेळी जाहीर केले . 
=====================================
==================================
====




No comments: