Monday, March 19, 2018

भीमकुंड पूरग्रस्तांना तात्काळ पट्टे ,पाणी व रस्ता देणार -किशोर तिवारी यांची सरकार 'आपल्या दारी कार्यक्रमात ' घोषणा


भीमकुंड पूरग्रस्तांना तात्काळ पट्टे ,पाणी  व रस्ता देणार  -किशोर  तिवारी यांची सरकार 'आपल्या दारी कार्यक्रमात ' घोषणा 

दिनांक -१८ मार्च २०१८

यवतमाळ जिल्हातील घाटंजी तालुक्यातील पैंनगंगेच्या तीरावर  दुर्गम भीमकुंड आदीवासी गावातील सर्व नागरीक २०१४ मध्ये सप्टेंबर महिन्यांत आलेल्या पुरात आपले सर्व गमावल्यावर जवळच्या महसूल मालकीच्या जागेवर तात्कालीन सरकारमधील मंत्री व आमदार  शिवाजीराव मोघे यांनी प्रशासनाच्या परवानगीने या  पूरग्रस्तांचे आजपावेतो ४ वर्षांनंतरही पुनर्वसन न झाल्याने  त्यांना राज्य मानवाधिकार आयोगाच्या सप्टेंबर २०१५ च्या आदेशाप्रमाणे या सर्व वंचितांना  जमिनीचे पट्टे ,रस्ता , वीज , पाणी तात्काळ देण्याचे आदेश वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आयोजीत केलेल्या सरकार आपल्या कार्यक्रमात दिले . 
मागील ४ वर्षापासुन भीमकुंड आदीवासी गावातील सर्व नागरीक येथील   जमिनीचे पट्टे ,रस्ता , वीज , पाणी सारख्या मुलभुत सुविधांसाठी  किरणताई कोलवते ,कृष्णा मारपवार ,अशोक म्याकलवर ,प्रकाश कोलवते ,शंकर रावते ,संतोष सोमनवार ,राजु पडगिलवार ,भोजन्ना गोपावार यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत आहेत . आपल्या व्यस्था या लोकांनी राज्य मानवाधिकार आयोगासमोर सुद्धा मांडल्या आहेत सप्टेंबर २०१५ राज्य मानवाधिकार आयोगाने  या सर्व वंचितांना  जमिनीचे पट्टेदिले रस्ता , वीज , पाणी तात्काळ देण्याचे आदेश तात्कालीन जिल्हाधिकारी यवतमाळ एस पी सिंग यांना दिले होते मात्र आजपर्यंत महसूल, वन ,ग्राम विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य मानवाधिकार आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे यावर किशोर तिवारी आपली नाराजी प्रगट करीत  या सर्व वंचितांना  जमिनीचे पट्टे ,रस्ता , वीज , पाणी तात्काळ देण्याचे व न दिल्यास येत्या ११ एप्रिल पासुन भीमकुंडच्या  नागरीकांनी उपोषण सत्त्याग्रह सुरु करण्याची घोषणा सुद्धा यावेळी करण्यात आली . 
घाटंजी येथील तहसीलदार हमद यांनी  जमिनीचे पट्टे देण्याचे तर गट विकास अधिकारी माणीक चव्हाण यांनी रस्ता , वीज , पाणी तात्काळ देण्याचे आश्वासन यावेळी दिले . यावेळी गणेरी भीमकुंड ठाणेगाव सावरगाव येथील गरिबांना व आदिवास्यांना गॅस कनेक्शन देणार असल्याची माहीती रेंज वन अधिकारी सिडाम यांनी दिली . 
या सरकार आपल्या कार्यक्रमाला  पं समिती  सदयस सुहासभाऊ पारवेकर, जीवनभाऊ मुददलवार , कृषी उपज बाजार समितीचे संचालक  अजयभाऊ अल्टीवार ,जी प सदयस रुपेश कल्लमवार ,भीमराव नैताम ,मोहन जाधव ,सुरेश बोलेनवार धर्मा आत्राम ,कोलाम नेते अर्जुन आत्राम लेतुजी जुनघरे बाबुलाल मेश्राम  अंकित नैताम  ,माजी सैनिक माधवराव टेकाम संजय आरेवार उपस्थित होते . 
==============================================================No comments: