Saturday, March 24, 2018

शेतकऱ्यांवर छळ करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर फौजदारी : दारव्हा येथील मेळाव्यात किशोर तिवारी यांची घोषणा

शेतकऱ्यांवर  छळ  करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर  फौजदारी दारव्हा येथील  मेळाव्यात किशोर तिवारी यांची घोषणा 

दिनांक २५ मार्च २०१८ 
सध्या विदर्भ व मराठवाड्यात शेतकरी व शेतमजूर कृषी संकटामुळे बँकांची दारे ग्रामीण जनतेला बंद झाल्याने विश्व बँकेच्या दबावाखाली  मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या रूपाने सुरु केलेला पतपुरवठा  एका नवीन खाजगी सावकाराच्या युगाचा प्रारंभ करणारा  करून त्यांच्या अत्याचाराचा अतीरेकाने यवतमाळ जिल्हातील दारव्हा तालुक्यातील कर्जबाजारी शेतकरी मांगकिन्ही येथील   रामधन राठोड व इरथळ येथील गजानन भेडे यांचेवर   त्रस्त झाल्याने केलेल्या आत्महत्या करावी लागली आहे या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असुन ज्या मायक्रोफायनान्स कंपन्यां पठाणी वसुली करून शेतकऱ्यांचा छळ करीत आहेत व ज्या मायक्रोफायनान्स कंपन्यां आपल्या परवान्याच्या अटी व शर्ती धाब्यावर ठेऊन कायदे व नियम खिशात ठेऊन अनियंत्रित कारभार करीत त्यासर्व मायक्रोफायनान्स कंपन्यांवर सरकार फौजदारी  कारवाई करण्याची घोषणा  दारव्हा येथील बचत भवनात आयोजीत मायक्रो फायनान्स कंपन्यांग्रस्तांच्या मेळाव्यात   शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली . या मेळाव्यात  मोठ्या संख्येत मायक्रो फायनान्स कंपन्यांग्रस्त शेतकरी व  बचत गटांचा महिलानी उपस्थिती लावली होती . 
मेळाव्याचे संयोजक डॉ अजय दुबे यांनी यावेळी दारव्हा तालुक्यातील  मायक्रो फायनान्स कंपन्यां वसुलीसाठी कर्जबाजारी शेतकऱ्यांना व  गोरगरीब महिलांना शिव्या घालणे, गुंडागर्दी करणे, घरातील वस्तूची जप्ती वा भल्या पहाटे, रात्री-अपरात्री वसुलीसाठी जातात व घरात येऊन वसुलीसाठी ठाण मांडून बसतात  म्हणून अनेकींनी आत्महत्येचे प्रयत्न केले असल्याचे प्रसांगीतले  .सततची नापिकी, दुष्काळ, शेतीमालाला भाव नसणे यामुळे छोटे शेतकरी व शेतमजूर यांची आíथक परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. कितीही आíथक कोंडी झाली तरी गरजा असणारच. आजारपण व शेतीच्या कामाला पसा हा लागतोच.घरदुरुस्ती, मुलांचे शिक्षण याला तरी कुठला पसा आणायचा? घरात लग्नकार्य आले की जास्तच आíथक कोंडी होते अशावेळी   मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाळ्यात फसतात .यवतमाळ  जिल्ह्य़ातील शेतकऱ्याची कथा यावर जळजळीत प्रकाश टाकणारी आहे.दारव्हा तालुक्यातील  मांग किन्ही  या गावात रामधन राठोड तीन  एकर कोरडवाहू जमीन असणारा शेतकरी पहिल्यांदा स्टेट बँकेचे दीड लाख रुपये कर्ज काढले. त्याचे हप्ते आणि व्याज भरण्यासाठी महेंद्र फायनान्स कंपनी कडून कर्ज काढले,दोन-तीन वर्षांत त्याच्यावर पाच लाखांचे कर्ज झाले. व्याजाची रक्कम भरता भरता त्याची दमछाक होऊ लागली. तीन एकर कोरडवाहू शेतीतील उत्पन्न आणि नवरा-बायकोने केलेली मोलमजुरी यांची तोंडमिळवणी.. कशाचा मेळ कशाला लागेना या फायनान्स कंपनीने वसुलीसाठी रामधन राठोड यांच्या मागे लागल्या. तो जिथे काम करेल त्या ठिकाणी जाऊन वसुलीचा तगादा लावू लागले , कंपन्यांचे प्रतिनिधी रात्री-अपरात्री घरी येऊ लागले हे सर्व असह्य़ झाल्याने एक दिवस रामधन राठोडने मागिल महिन्यात  आत्महत्या करून आपले जीवन संपविले असल्याने मायक्रो फायनान्स कंपनी आवरा नाहीतर शेतकरी कायदा आपल्या हातात घेतील असा इशारा यावेळी डॉ अजय दुबे यांनी यांनी दिला ,
या मेळाव्यात जी प सदयस श्रीधरकाका मोहोड सदस्य कालिंदी पवार , अश्विनी कुलसंगे , प स सदस्य सुनीता राउत ,सिंधुताई राठौड़ , शारदा दुधे सह सुधीर अलोणे ,सचिन भगत ,मनोहर भेंडे ,दिगांबर ठाकरे ,जानुसिंग राठोड ,सतीश बनसोड ,वसंतराव ढोले ,डॉ सुलान शेख ,जानन इंझळकर ,पवन भोयर ,साहेबराव धोपटे ,वसंतराव शेंदूरकर उपस्थित होते . 
दारव्हा तालुक्यातील  ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या आणि कर्जवसुलीसाठी कोणत्याही थराला जाणारे मुजोर वसुली अधिकारी यांनी कर्ज वसुलीसाठी केलेल्या अरेरावीच्या विरोधात आता ग्रामीण  भागातील वंचीत शेतकरी व बचत गटांच्या महीला मोठ्या   प्रमाणात मायक्रो फायनान्स कंपन्यांग्रस्तांच्या तक्रारी मेळाव्यात सरकारला देण्यात आल्या . 
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांमध्ये आता फायनान्स कंपन्यांचा जुलमी  तगादा व गुंडागर्दी  हे कारण समोर येत असुन  शासनाच्या पातळीवर राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्जाची सुविधा केलेली असली तरी झटपट कर्ज मिळणे सोयीचे आणि कमी कागदपत्रांवर कर्ज मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीच्या वेळी या फायनान्स कंपन्यांना बळी पडत आहेत . अत्यंत चढ्या दराने हे व्याजदर उपलब्ध असतानाही शेतकरी कर्ज घेत असुन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या कंपन्यांचे जाळे पसरले आहे व त्यामुळे त्यांच्या तक्रारीही वाढत आहेत. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कार्यरत सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांची  कार्यपद्धती आणि त्यावरील नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी  किशोर तिवारी यांनी दिली . 

==============================================================

No comments: