Wednesday, April 11, 2018

आत्महत्याग्रस्त शंकर जायरे यांच्या कुटुंबाला किशोर तिवारी यांची भेट:जायरे कुटुंबांनी मांडला समस्याच्या डोंगर -मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी आग्रही
आत्महत्याग्रस्त शंकर जायरे यांच्या कुटुंबाला किशोर तिवारी यांची भेट: जायरे  कुटुंबांनी मांडला समस्याच्या  डोंगर -मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी आग्रही 
दिनांक -११ एप्रिल २०१८
यवतमाळ जिल्हातील घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील ५० वर्षीय कोरडवाहू नैराश्यग्रस्त शेतकरी   शंकर भाऊराव चायरे  यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह  खासदार आमदार व सर्व शेतकरी नेत्यांना मदतीची याचना करीत १०  एप्रिलला   केलेल्या आत्महत्याचे   पडसाद अख्ख्या जगात उमटल्यांनंतर आज  महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी पहिले यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील शवागारात शंकर चायरे यांच्या मृत देहाचे दर्शन करून घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबाची  भेट घेतली . या भेटी दरम्यान त्यांच्या सोबत अती .जिल्हाधिकारी भुवनेश्वरी ,पंचायत समितीच्या सभापती काळंदी आत्राम  .जी प सदयस सरीता मोहन जाधव तलसीलदार हमद ,गट विकास अधिकारी माणिक मेश्राम  स्वप्नील मंगळे सुद्धा होते . 
भेटी दरम्यान शंकर जायरे यांच्या पत्नीने आपल्या व्यस्था मांडल्या लग्नाला आलेल्या व शिक्षण घेत असलेल्या मुलींची पुढचा खर्च कसा असा सवाल उपस्थित केला . संपुर्ण राजूरवाडीच्या शेतकऱ्यांनी यावेळी प्रश्न्नाचा भडीमार केला . सम्पपूर्ण गावात ३५० खातेदारापैकी फक्त ५२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची तक्रार केली . तुरीचे  चुकारे महीन्याभरापासून प्रलंबित असुन घोषीत मदत न मिळाल्याची तक्रार सुद्धा केली . 
किशोर तिवारी यांनी  सरकारतर्फे देण्यात येणारी मदत व  मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार हा निरोप यावेळी दिला मात्र ज्योपर्यंत मुख्यमंत्री आमच्या व्यस्था ऐकणार नाहीत त्योपर्यंत आम्ही शव उचलणार नाही अशी भुमिका मांडल्यानांतर आपण आपला निरोप मुख्यमंत्र्यांना आपला निरोप देण्याचे आश्वासन किशोर तिवारी यांनी यावेळी दिले .No comments: