Monday, April 30, 2018

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना ११०० कोटींची मदत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे शेतकरी मिशनकडून स्वागत

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना  ११०० कोटींची मदत देण्याच्या राज्य सरकारच्या   निर्णयाचे शेतकरी मिशनकडून स्वागत 
दिनांक -३० एप्रिल २०१८ 
मागील खरीप हंगामात बोंडअळीने ४३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी राज्यात ३४ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाल्याने त्यातच  विदर्भातील कापूस उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले असल्यामुळे राज्य सरकारने केंद्राला ३,३७३ कोटी मदतीसाठी प्रस्ताव पाठविला असुन  संबंधित मदत येण्याआधीच  सरकारने स्वत:च्या हिश्शाची मदत बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना  लवकरच ११०० कोटींची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.कीटकाचा हल्ल्याने भात व इतर खरीप पिकाचेही नुकसान झाले होते. संबंधित शेतकºयांनाही उपरोक्त निधीतून मदत दिली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी दिली आहे तसेच  पुढच्या आठवड्यात या मदतीचे वितरण सुरू होईल व  राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकरी व त्यांचे बँक खात्यांची यादी तयार केली आहे  त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ३० एप्रिल व १ मे रोजी सार्वजनिक सुटी असल्याने त्यानंतर  खात्यांवर ही मदत जमा होणार असुन यामुळे नापिकीग्रस्त विदर्भ व मराठवाड्याच्या हवालदील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असुन या निर्णयाचे स्वागत कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष  किशोर तिवारी  केले आहे . 

या तात्काळ मदतीसाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी  विशेष पुढाकार घेतला होता व नागपूर येथे २२ एप्रिलला कापसावरील बोंडअळीच्या व्यवस्थापनाबाबत  बैठक झालेल्या बैठकीत नुकसानीच्या आदेशात दुरुस्ती करण्याची विनंती  केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांना केली होती त्यांनी आता नागपूरसह वगळण्यात आलेल्या जिल्ह्यांचा नव्या प्रस्तावात समावेश केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच मदत देण्यात  येणार आहे . राज्याने आपला मदतीचा वाटा ११०० कोटी उचलला असुन केंद्राच्या २२७३ कोटीचा वाटा तात्काळ  शेतकऱ्यांना देण्याची मागणीही किशोर तिवारी यांनी रेटली आहे ,

हिवाळी अधिवेशनात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी  केलेल्या घोषणेप्रमाणे बोंडअळीने ४३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी राज्यात ३४ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमधून ज्या १२ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी बियाणे कंपन्याकडून नुकसान भरपाईसाठी  दावे कृषी विभागाकडे दाखल केल्या असुन त्यावर तात्काळ सर्व कारवाई पूर्ण करून बियाणे कंपन्याकडून नुकसान भरपाई वसुल करावी अशी मागणीही  किशोर तिवारी यांनी केली  आहे ,
==================================================
=====================
=============No comments: