Monday, October 15, 2018

यवतमाळ जिल्ह्यासाठी रबी हंगामासाठी "मागेल त्याला अनुदानीत हरभरा बियाणे "-शेतकरी मिशनच्या प्रयन्तांना यश

यवतमाळ जिल्ह्यासाठी रबी हंगामासाठी "मागेल त्याला अनुदानीत हरभरा बियाणे "-शेतकरी मिशनच्या प्रयन्तांना यश
दिनांक -१६  ऑक्टोबर २०१८
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य ) सन २०१८-१९ अंतर्गत  अनुदानीत हरभरा प्रमाणीत बियाणे वाटपाची मागणी यावर्षी ३० हजार क्विंटल असतांना फक्त १३८९ क्विंटल अनुदानीत अनुदानीत हरभरा प्रमाणीत बियाणे  सुरवातीला देण्यात आले होते मागील चार वर्षात यवतमाळ जिल्हात जलयुक्त शिवाराची तसेच मागेल त्याला शेत तळे योजनेत हजारो  शेत तळे निर्माण झाल्यामुळे सन २०१४-१५ मध्ये ९००० क्विंटल सन २०१५-१६ मध्ये १४३००क्विंटल सन २०१६-१७ मध्ये १७५०० क्विंटल तर  सन २०१७-१८ रब्बी हंगामात १६५०० क्विंटल  अनुदानीत हरभरा प्रमाणीत बियाणे वाटप करण्यात आले असतांना फक्त १३८९ क्विंटल लक्षांक दिल्यामुळे तसेच पावसाच्या दगा  दिल्यामुळे कापसाची झालेली प्रचंड नापीकीमुळे शेतकऱ्यांचा हरभऱ्याच्या लागवडीकडे वाढलेला कल  पाहता यवतमाळ जिल्हाच्या अनुदानीत हरभरा प्रमाणीत बियाणे वाटपाचा लक्षांक कमीत कमी ४० हजार क्विंटल करा अशी मागणी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त सचिन्द्रप्रताप सिंग यांना केली होती . 
कृषी आयुक्त सचिन्द्रप्रताप सिंग यांनी १५ ऑक्टोबरला किशोर तिवारी यांना कळविले की यवतमाळ जिल्हा माझ्या अत्यन्त जवळचा आहे व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य ) आपण जिल्हातील शेतकरी बांधवाना राबविण्यासाठी  "मागेल त्याला अनुदानीत हरभरा बियाणे " देण्यात येतील अशी माहीती दिली . 
महाबीजचे यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक पाटील साहेब यांनी यापूर्वीच वाढीव ३० हजार क्विंटलची मागणी जिल्हा कृषी  अधिकाऱ्यामार्फत नोंदविली होती व १८ हजार क्विंटलची मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून आली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी "मागेल त्याला अनुदानीत हरभरा बियाणे " २५०० रुपये अनुदानावर उचलावे व रबी हंगामामध्ये विक्रमी पेरा करावा तसेच रबीसाठी सरकारी व सहकारी बँकाकडून पीककर्ज ही मिळणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 
महाबीजचे अनुदानीत हरभरा बियाणे " २५०० रुपये अनुदानावर मिळत नसल्यास त्यासाठी पैसे मागण्याची तसेच मस्तवाल  सरकारी व सहकारी बँकाकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्यास आपण आपणास व्हाट्सअप मोबाईल नंबर ९४२२१०८८४६ वर तात्काळ तक्रार करावी अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
=============================================================











No comments: