देवस्थान व ट्रस्टग्रस्त शेतकऱ्यांचा पांढरकवडा येथे ७ ऑक्टोबरला विदर्भस्तरीय मेळावा
दिनांक-६ ऑक्टोबर २०१८
दिनांक-६ ऑक्टोबर २०१८
विदर्भात हजारो शेतकरी मागील अनेक पिढ्यापासुन देवस्थानाच्या व ट्रस्टच्या जमिनीवर मागील ७० वर्षापासुन वहीती आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांनी घोंसी तरोडा माहूर शिरपूर नांझा पिंपरी येथील देवस्थानग्रस्तांचा पुढाकाराने येत्या ७ ऑक्टोबरला विदर्भस्तरीय शेतकरी मेळावा पांढरकवडा येथील सुराणा भवनात दुपारी २ वाजता आयोजीत केला करण्यात आला आहे . विदर्भातील हजारो देवस्थान व ट्रस्टच्या जमिनीची मालकी गुजराथ राज्याप्रमाणे धोरणात्मक निर्णय घ्यावा ही प्रमुख मागणी असुन या सर्व देवस्थानाच्या व ट्रस्टच्या जमिनीवर मागील ७० वर्षापासुन वहीती आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांना पीककर्ज ,सरकारी योजना ,सरकारी अनुदान तात्काळ देण्याची मागणीही रेटणार असल्याची मागणी या शेतकरी मेळाव्याचे संयोजक रणजित दरने पाटील यांनी दिली .
या विदर्भस्तरीय शेतकरी मेळाव्याला लोकनेते अण्णासाहेब पारवेकर कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,भाजपा नेते विजय पिदूरकर शेतकरी नेते सुरेश बोलेनवार ,आदीवासी नेते धर्मा आत्राम अंकित नैताम उपस्थित राहणार आहेत .
विदर्भात हजारो शेतकरी मागील अनेक पिढ्यापासुन देवस्थानाच्या वा जमीनदारांनी आपल्या जमीनी सिलिंग कायद्याखाली सरकार जमा होऊ नये कुटुंबाच्या ट्रस्ट तयार करून वाचविल्या मात्र ही लाखो हेक्टर जमिनीवर आदिवासी मागासवर्गीय शेतकरी मशागत करीत आहेत त्यांच्या मागील ७० वर्षाचा वहितीचा सातबाराही आहे व तत्कालीन देवस्थानच्या वा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी या आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांना जमिनीची मालकी देण्याची व फेरफार करण्याची मंजुरीही दिली होती त्यानुसार त्यांना सरकारी सवलती मिळत होत्या व योजनांचा तसेच बँकाकडून पीककर्जही मिळत होते मात्र मागील काही पोटभरू लोकांनी या देवस्थानच्या वा ट्रस्टच्या ताबा घेतला असुन या देवस्थानच्या वा ट्रस्टच्या जमिनी विकण्याचा कट रचला असुन महसुल खात्यातील मंत्रालयातील भ्र्ष्ट अधिकारी व महागड्या न्यायव्यवस्थेत सोयीचे आदेश घेऊन या हजारो शेतकऱ्यांना या महाराष्ट्राच्या कसेल त्याची जमीन कुळ कायदा वा ५० वर्षांपासून असणारा ताबा याला बगल देऊन भूमीहीन करण्याचा प्रयन्त सुरु केला या देवस्थानच्या वा ट्रस्टच्या जमिनीचा प्रश्न गुजराथ राज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतांना धोरणात्मक निर्णय घेऊन या गुजराथ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मालकीहक्क दिला आहे महाराष्टतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घ्यावा यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहीती रणजित दरने यांनी दिली .
मागील काही वर्षात माहुर देवस्थान ,श्रीराम देवस्थान आदिलाबाद ,रुईकर ट्रस्ट सारख्ख्या पोटभरू लोकांनी या संस्थांना बळकावल्या असुन प्रशासन ,राजकीय नेते ,न्याय व्यवस्थेला चुकीची माहीती या जमीनी भू माफियाना विकण्याचा धंदा सुरु केला आहे यामुळे आता विदर्भस्तरीय देवस्थानाच्या व ट्रस्टग्रस्त हजारो शेतकरी एकवटले असुन यांना जमिनीची मालकीचा धोरणात्मक निर्णय सरकारला घेण्याकरीता हा लढा सुरु करण्यात आल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली .
==========================================================================================================================================
No comments:
Post a Comment