Tuesday, October 23, 2018

पारधीसमाजाच्या उपेक्षेची दखल घेण्यासाठी गोपालपूर पारधीबेड्यावर २५ ऑक्टोबरला पारधी नेते मतीन भोसले यांच्या उपस्थितीत सरकार आपल्या दारी कार्यक्रम

पारधीसमाजाच्या  उपेक्षेची दखल घेण्यासाठी गोपालपूर  पारधीबेड्यावर २५ ऑक्टोबरला पारधी नेते मतीन भोसले यांच्या उपस्थितीत सरकार आपल्या दारी कार्यक्रम  
दिनांक -२४ ऑक्टोबर  २०१८
स्वातंत्र्यानंतर पारधी समाजाची होत असलेली सतत उपेक्षेची  मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी गंभीर घेतली असुन यामुळेच त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गोपालपूर पारधी बेडा निवडला असुन याचे कारण गोपालपूर पारधी बेडा भयाण वास्तव असून विकासाच्या नावाचा येथे कुठेही लवलेश नाही. पोट भरण्याच्या संघर्षात विकास यांच्यापासून कोसो दूर  गेलेला आहे. दररोज उद्याचे काय? हा प्रश्‍न यांच्या आजही पारधी समाजासमोर उभा आहे अशा   या पारधी पोडाच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे पारधी समाजाच्या चळवळीचे नेते मतीनभाई भोसले ,राळेगावचे  लोकप्रीय आमदार डॉ .अशोक उईके व स्व वसंतराव नाईक  स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी पारधी  बेड्यावर पाणी नाही, रस्ता नाही, साधी नालीही नाही व खायला धान्यपण नाही अशा समस्या विदर्भातील  पारधी बेड्यावरील आहेत त्यातच पारध्यांना  मूलभूत सुविधांपासून व  अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्याचे संघटीत षडयंत्र प्रशासनातील कामचोर अधिकारी करीत असतात ,  मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी पारधीसमाजाची सतत उपेक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचाराण्यासाठी अनेक पारधी बेडे दत्तक घेतले आहेत व आणखी घेणार आहेत अशा पारधी बेड्यावर असणाऱ्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी व विषेय पारधी विकास योजनेमध्ये त्याचा समावेश करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजीत केल्याचे राळेगावचे  लोकप्रीय आमदार डॉ .अशोक उईके यांनी सांगीतले   . 
उच्चंन्यायालयाच्या आदेशाची सतत पायमल्लीकरून विदर्भातील  हजारो   पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्याच्या सर्व नागरी पुरवडा विभागाच्या सर्व जबाबदार  अधिकाऱ्यांवर आदिवासी अत्याचार नियंत्रण कायद्याखाली सरकारने कारवाई आदेश  यापूर्वीच दिले आहेत मात्र नागरी पुरवडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर अंबलबजावणी केली नसल्याच्या तक्रारी येत आहेत म्हून या  भेटीत  गोपालपूर  पारधी बेड्यावर घराघरात जावून प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणार आहेत  पोडावर रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, अंत्योदयाचे धान्य, आरोग्याच्या समस्या अशा अनेक समस्याचे तसेच   ज्या नागरिकांच्या घरकुलाच्या समस्या, प्लॉटच्या समस्या आहेत त्यांनी आपल्या तक्रारी यावेळी द्याव्यात असे आवाहन प्रकाशराव फुलमाळी ,सुखदेव पवार , सुदाम पवार ,फुलमाळी,अंकुश पवार ,रिमीन राऊत ,सचिन भोसले ,अजय फुलमाळी , अर्जुन काळे ,देवी घोसले ,प्रह्लाद राऊत,रामराव पवार यांनी केले आहे . 
==============================




No comments: