महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा -किशोर तिवारी
दिनांक -२८ ऑक्टोबर २०१८
दिनांक -२८ ऑक्टोबर २०१८
महाराष्ट्रात राजीव गांधी जिवनदायी योजनेच्या नावाने राज्यातील दारिद्य्र रेषेखालील आणि शेतकरी कुटुंबांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने राज्य सरकारने सुरु केलेली अतिशय महत्वाची सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु असलेली योजना रुग्णालय ,टी पी ए व योजनेतील अधिकारी यांचा संगममताने हजारो कोटीच्या गोरखधंद्याचे केंद्र झाले आहे ,एकीकडे महाराष्ट्र सरकारला सुमारे १८०० कोटींचा चुना हे रुग्णालये लावत असतांनाच शेकडो कोटी रुपये रुग्णालयात ही योजना विनामूल्य असतांनाही अनेक रुग्णांकडून जबरीने घेतात व ही वसुली राजरोसपणे करण्यात येत आहे . हा सगळा गोरखधंदा आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रात धडक मोहिमेने नुकताच उजागर केला आहे मात्र अशीच परिस्थिती अख्ख्या विदर्भ व मराठवाड्यात असुन ज्या प्रमाणे हजारो कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा सरकारने विषेय चौकशी पथकाद्वारे उघडकीस आणला त्याच प्रकारे या आरोग्य योजनेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा अशी मागणी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी केली आहे .
किशोर तिवारी यांना विदर्भ मराठवाड्याचा दौऱ्यामध्ये "सरकार आपल्या दारी" कार्यक्रमात महात्मा फुले जिवनदायी योजनेतून उपचार घेणा-या रूग्णांना मोफत उपचार झाला का हे विचारले असता त्यांना सुरूवातीला रूग्णालयाचे बिल द्यावे लागते असे सांगितले व या प्रकाराची चौकशी केली असता त्यांच्यावर शासकीय खर्च मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे रूग्णालय सरकार कडून आणि रूग्णांकडून दुहेरी वसूली करीत असल्याचे वारंवार निर्दयनातआले आहे एकूणच महाराष्ट्रात शासकीय जिवनदायी योजनेच्या नावांवर रूग्णालयाचा हा गोरखधंदा सर्वानाच माहित आहे मात्र या सर्व राजकीय व्यवस्था आणि पुढारी मात्र राजकीय हितसंबध जोपासण्यात गर्क असल्याने या गंभीर प्रकारावर चूप आहेत . या योजनेतील लहान लहान उनिवांचा फायदा घेत योजनेतील समाविष्ट अनेक रुग्णालये आता गरीब रुग्णांची पिळवणूक करीत आहेत , या मुळे ही योजना आता गरिबांसाठी की खाजगी रुग्णालयासाठी असे म्हणन्याची वेळ आली आहे अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली .
या आरोग्य योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णांना व्यक्तीगत भेटी देऊन विचारणा केल्यावर धक्कादायक सत्य समोर आले आहे त्यामध्ये रुग्णालय ,टी पी ए व योजनेतील अधिकारी यानी अनेक बोगस रूग्णांची नोंद वा एखादा साधरण रुग्णाला आम्ही तुला पूर्ण फुकट इलाज करून देतो पण तुला आई सि यू ICUमध्ये व्हेंटिलेटरवर Ventilatorवर फोटो काढावी लागेल असे सांगून सर्रास पणे बोगस केसेस दाखवून शाषणा कडून पैसे उकळत असल्याचे उघड झाले आहे . ही योजना चांगल्या रीतीने राबवावी या करिता प्रत्येक जिल्हात अधिकारी नेमले आहेत. परंतु प्रत्येक जिल्हातील महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजनेतील कर्मचारी जाणून बुजून रुग्णालयातून मासीक हप्ता घेऊन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. ही गोष्ट फार गंभीर असून योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयात उपचार घेवून गेलेल्या रुग्णांची फाईले व रुग्णालयाची कसून चौकशी करण्यात यावी ही मागणी आपण लावून धरणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले .
महाराष्ट्रातील अनेक नामांकित मोठे रुग्णालये या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे या रुग्णालयात सुद्धा गरीब रुग्णांनकडून अनेक टेस्ट करून त्यांच्या कडून पैसे उकड्ण्यात येतात जे नुकतेच रुग्णाचे नातेवाईक या सर्रास पणे गरीब लोकांकडून हतो असलेल्या वसुलीचा विरोध करतात त्यांना रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर लोक त्यांना धमकावत सांगतात की जर तुम्ही कुठे आमची तक्रार केली तर तुमच्या रुग्णाला आम्ही आमच्या रुग्णालयातून हाकलून देवू अशी धमकी देतात यामुळे गरीब लोक घाबरून काही न बोलतात व पैसे भरून चूप बसतात, अशा प्रकारे गरीब रुग्णाकडून पैसे उकळण्याचा जणू धंधाच सुरु आहे असा गंभीर तक्रारी तिवारींना प्राप्त झाल्या आहेत .
शेतकरी मिशन सर्व गरिबांना व शेतकऱ्याना या योजनेचा फायदा घेण्यास सतत प्रचार करीत आहेत त्यामुळे मोफत उपचार मिळेल या आशेने रूग्णांना भरती करतात,परंतु कसाब रूपी डॉक्टरांच्या रूग्णालयाच्या कचाट्यात परिवार अडकला की त्याला लुटण्याचे वेदनादायी प्रकार समोर आल्यावर आपण ही तक्रार लावून धरत असल्याचे तिवारी यांनी सांगितले कारण गरिबांना लाभ देण्यासाठी ही योजना कार्यान्वीत केली आहे खरी परंतू या योजनेचा लाभ रूग्णांना होण्याऐवजी रूग्णालयांना होतांना दिसतो आहे कारण रूग्णालयाच्या कचाट्यात अडकलेल्या रूग्णांचा परिवार हतबल होवून डाॅक्टर म्हणेल तीच पूर्व दिशा असे समजून पुरता भाजला जात आहे. या योजनेच्या नावावर शासनाचा अमाप पैसा रूग्णालयीन प्रशासन कागदी घोडे नाचवून एक प्रकारची हजारो लूट करीत असुन पारदर्शक सरकार चुप का असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे .
===================================================
No comments:
Post a Comment