Wednesday, October 17, 2018

कोरडवाहू कापुस उत्पादक शेतकरी नापिकीच्या गंभीर संकटात :केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा -किशोर तिवारी

कोरडवाहू कापुस उत्पादक शेतकरी नापिकीच्या गंभीर संकटात :केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा  -किशोर तिवारी 
दिनांक -१७ ऑक्टोबर २०१८
राज्यात विदर्भ मराठवाड्यातील कापूस पिकाखाली ४४ लाख हेक्टरचे क्षेत्र असून मागील वर्षी  सर्वच  ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता  त्यामुळे आता  कापसाचे उत्पन्न   प्रचंड प्रमाणात घटले होते यावर्षी मात्र मान्सुनने  दिलेला धोका ,पर्यावरणात झालेला प्रचंड बदल ,रासायनिक शेतीने जैविक तत्वे गमावलेली जमीन ,निकामी झालेले बी टी बियाणांचे तंत्रद्यान ,जमिनीमध्ये ओलावा रोखण्यासाठी सेंद्रिय शक्तीची क्षमता नसल्यामुळे या दशकातील सर्वात कमी कापसाचे पीक कोरडवाहु क्षेत्रात होणार असे संपुर्ण संकेत मिळत असुन दिवाळीपूर्वीच सर्व कापसाची उलंगवाडी होणार असुन सरासरी कापसाचे उत्पन्न विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी व कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहीती नुसार २ ते ३ क्विंटल राहणार असल्याने ५० लाखावर कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक अडचणीत येत असुन यामुळे विदर्भ मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कोणते नगदी पीक पेरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे या गंभीर प्रश्न्नावर केंद्र सरकारने दीर्घ व अल्प मुदतीचा पर्याय देण्याची विनंती कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांना  कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली  आहे . 
मागील वर्षी  ज्या ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रासायनिक खताचा वापर करीत  कोरडवाहू क्षेत्रात आलेली बोन्डे  ऑक्टोबर नोव्हेंबर फुटली व सर्वच शेतकऱ्यांचे पहिला व दुसरा वेचा चांगला आला ,मात्र यावर्षी सरसकट कापसाचे रोप करपत असल्याने प्रचंड नापीकी होत आहे त्यामुळे  संपुर्ण विदर्भ मराठवाड्याच्या कोरडवाहू क्षेत्रात  शेतकऱ्यांचे यंदा ६० टक्क्यांहून अधिक नुकसान होणार असा प्राथमिक अंदाज येत आहे  त्यानुसार सर्वच भागांतून कापसाची आवक प्रचंड प्रमाणात घटली असुन बहुतेक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक नष्ट करून गहु हरभऱ्याची पेरणी सुरु केली आहे मात्र कृषी विभागाचे अधिकारी फक्त कार्यालयात बसल्याबसल्या पिकांचे पंचनामे करीत असल्याच्या प्रचंड तक्रारी आपणास मिळाल्या असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली . 
या खरीप हंगामात  सुरवातीला ३५० ते ४०० लाख क्विंटल कापसाची विक्रमी उत्पादन राज्यात होणार असा विश्वास होता मात्र पाऊसाने दगा दिल्याने व प्रचंड उन्हामुळे  कापसाचे उत्पादन १८० लाख क्विंटलच्या घरात येणार असा प्राथमिक अंदाज आहे  यामुळे शेतकऱ्यांचे कमीतकमी रु आठ हजार कोटीचे नुकसान होणार अशी भीती तिवारी यांनी व्यक्त केली  मात्र कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांनी ह्या अभुतपुर्व संकटावर पुरेसे लक्ष न दिल्यामुळे  विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ५० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी  दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत यामुळे या गंभीर प्रश्न्नावर केंद्र सरकारने दीर्घ व अल्प मुदतीचा पर्याय देण्याची गरज आहे . 
कापसावर सतत नापिकीच्या संकटाचे   निवारण करण्यासाठी  किशोर तिवारी यांनी कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांना सादर केलेल्या अहवालात कापुस उत्पादक पर्यावरणात झालेला प्रचंड बदल ,रासायनिक शेतीने जैविक तत्वे गमावलेली जमीन ,निकामी झालेले बी टी बियाणांचे तंत्रद्यान ,जमिनीमध्ये ओलावा रोखण्यासाठी सेंद्रिय शक्तीची क्षमता पुनस्र्थापना यावर जोर देत  भारतातील देशी कापसाचे बियाणाच्या जागी  आणलेले अमेरीकेचे  संकरीत कापसाचे बियाणेच मूळ कारण असुन व  आता बी टी कापसाचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळी मारण्यास  यातील विषाणूवर  निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमध्ये कमी पाण्याचे  कापसाचे सरळ वाण ,तुरी ,ज्वारी अशा अन्न जातीय पिकांना सरळ नगदी अनुदान देऊन लावण्याचा कार्यक्रम लागु करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे. 
= ======================================

No comments: