वाघग्रस्तभागात विद्युत भारनियमन तात्काळ बंद करा : शेतकरी मिशनचे मुख्यमंत्र्याना साकडे
दिनांक २१ ऑक्टोबर
दिनांक २१ ऑक्टोबर
सध्या अख्ख्या जगात गाजत असलेल्या १३ निष्पाप आदिवास्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी १ वाघीणीच्या विद्युत वितरण कंपनीच्या पांढरकवडा विभागात व राळेगाव उपविभागात दिवसा रात्रीचे चक्राकार भारनियमन तसेच झरी तालुक्यातील पवनार जंगल परीसरातील ,वाशीम ,अमरावती जिल्हात नव्याने नरभक्षक वाघाच्या घटनेची वनविभागाने या भागातील ग्रामीण जनतेला दिलेल्या जाहीर सूचनेनुसार या भागात जाण्यास रात्री टाळण्यास सांगितल्यामुळे महाराष्ट्र सरकारने वाघग्रस्तभागात विद्युत भारनियमन तात्काळ बंद करावे अशी कळकळीची विनंती कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मुख्य सचिव दिनेश जैन ,उर्जामंत्री बावनकुळे ,ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार ,अति मुख्य सचिव प्रवीण परदेशी ,वन सचिव विकास घारगे यांना केली आहे . प्रधान सचिव वन विकास घारगे यांनी वरील सूचनेला समर्थन देत ऊर्जा सचिवांना विनंती सुद्धा केली आहे .
सध्या यवतमाळ जिल्हात १३ निष्पाप आदिवास्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी १ वाघीणीच्या बंदोबस्त करण्याची विशेष मोहीम सुरु आहे व या नरभक्षक टी १ वाघीणीची प्रचंड दहशत असल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे उभे पीक वाळत आहे वन विभाग अनेक भागात जाण्यासही सुरक्षेतेच्या दुर्ष्टीने मज्जाव करीत आहे त्यातच हजारो शेत मजुरांची सतत उपासमार होत आहे अशा अडचणीच्या गंभीर परीस्थीतीमध्ये मुंबई व नागपूरबसुन नरभक्षक टी १ वाघीणीच्या जीवाची चिंता करीत असलेल्यांची जरा या उपासमारीला तोंड देत असलेल्या हजारो आदिवास्यांना आधार द्यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
दिनांक २० ऑक्टोबरला पालकमंत्री-यवतमाळ व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समिती सभा घेतली असतांना १३ निष्पाप आदिवास्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी १ वाघीणीच्या विद्युत वितरण कंपनीच्या पांढरकवडा विभागात व राळेगाव उपविभागात दिवसा रात्रीचे चक्राकार भारनियमन तसेच झरी तालुक्यातील पवनार हिवरा वारसा वांजरी तसेच ढाणकी जंगल परीसरातील सध्या असलेली वाघाची दहशत पाहता सरकारने वाघग्रस्तभागात विद्युत भारनियमन तात्काळ बंद करावे हा मुद्दा लावून धरला याला राळेगावचे आमदार डॉ अशोक उईके ,वणीचे आमदार संजय बोदकुलवार ,उमरखेडचे आमदार राजूभाऊ नगरधने यांनी जोरदार पाठींबा दिला तसेच वाघग्रस्तभागात विद्युत भारनियमन तात्काळ बंद करण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता पांढरकवडा वैद्य यांनी दिल्याचे अधीक्षक अभियंता यवतमाळ मडावी यांनी सांगितले आता सरकारने तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
=======================================================
No comments:
Post a Comment