Wednesday, December 26, 2012

आदिवासींचा अन्नासाठी पांढरकवड्यात सत्याग्रह-विदर्भ जनआंदोलन समितीचे नेतृत्व

आदिवासींचा अन्नासाठी पांढरकवड्यात सत्याग्रह-विदर्भ जनआंदोलन समितीचे नेतृत्व

सत्याग्रहास उपस्थित आदिवासी महिला व पुरूष आणि मार्गदर्शन करताना माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी.
जिल्हा प्रतिनिधी/२६ डिसेंबर
यवतमाळ : ज्या गरीबांची ओळख बीपीएल यादीत आहे. त्या सर्वांना अंत्योदय योजनेत धान्य द्यावे. या मागणीसाठी यवतमाळ जिल्हय़ातील हजारो गरीब व आदिवासींनी पांढरकवडा तहसील कार्यालया समोर सत्याग्रह केले. या हजारो गरीबांच्या सहीचे निवेदन विभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार व तहसीलदार डॉ. राजेश अडपावार यांना दिले.
या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी, माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी, आदिवासी नेते तुकाराम मेर्शाम, मोहन जाधव, अंकीत नैताम, मनोज मेर्शाम, मोरेश्‍वर वातीले, सुरेश बोलेणवार, भीमराव नैताम यांनी केले. या आंदोलनामध्ये केळापुर, झरी, मारेगाव, राळेगाव व घाटंजी तालुक्यातील साखरा, टिटवी, राजेगाव, राजुरवाडी, बोथ, बहात्तर, पहापळ, भाडउमरी, सायखेडा, रुंझा, मोहदा, करंजी कोठोडा, नवरगाव, रोहपाठ, हिवरा, शिबला, माथार्जुन, वडकी,वरद, सावरखेडा, सोनुर्ली, सिंगलदिप, डोंगरखर्डा, सावनेर, अंजी, तेजनी, गोपालपुर, वांजरी, पाटणबोरी, वडवाट, कोदोरी, चनाखा, घुबडी, चालबर्डी, ताडउमरी, धारणा मंगी, घोडदरा, पाथरी, दाभा या गावाच्या नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी आम्हाला थेट अनुदानाच्य्या रुपाने पैसे न देता ज्या गरीबांची ओळख बीपीएल यादीत आहे त्या सर्वांना अंत्योदय योजनेत धान्य द्या. या मागणीसाठी यवतमाळ जिल्हय़ातील हजारो गरीब व आदिवासी पांढरकवडा तहसील कार्यालया समोर सत्याग्रह केले. दरम्यान केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी थेट अनुदान देण्याच्या योजनेला अमरावतीमध्ये केलेल्या खुल्या विरोधाच्या भूमिकेचे स्वागत विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केले असून या मागणीसाठी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सरकारने या वर्षी ग्रामसभेने २0१२ ची नवीन गरीबांची यादी दिल्यानंतरही २00२ च्या बीपीएल यादी प्रमाणेच गरीबांना बीपीएलचे अन्न देण्यात येत असून सरकारची ही कारवाई गरीबांचे सवरेच्य न्यायालयाने दिलेले अधिकार गोठविणारी असून स्वत: यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांनी उच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्राच्या विपरीत असून जिल्हय़ातील २0१२ च्या यादी प्रमाणे ग्रामसभेने दिलेल्या सर्व गरीबांना बीपीएलचे रेशनकार्ड द्या या मागणी करीता येत्या २६ डिसेंबरला पांढरकवडा येथे कुपोषण व उपासमारीला तोंड देत असलेले हजारो आदिवासी व गरीबांनी धरणे दिले अशी माहिती आदिवासी नेते व न.प.सदस्य अंकीत नैताम व माजी जि.प.सदस्य तुकाराम मेर्शाम यांनी दिली. मागील १0 वर्षापासून दारिद्रय़ रेषेखालील असणार्‍या विभक्त झालेल्या आदिवासी, दलित व वंचित कुटुंबांना सवरेच्य न्यायालयाच्या आदेशानंतरही पिवळय़ा शिधावाटप पत्रिकेपासून यवतमाळ जिल्हय़ात १ लाख कुटुंब वंचित असून न्यायमूर्ती वाधवा समितीने आपल्या यवतमाळ दौर्‍याचावेळी जिल्हय़ातील लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नाचा अधिकारापासून वंचित असलेल्या सुमारे ३0 हजार कुटुंबाना शिधावाटप पत्रिका देण्याचे आदेश १८ महिने उलटुनही केराच्या टोपलीत जिल्हाधिकार्‍यांने टाकले
देशात लाखो मेट्रीक टन गहु व तांदुळ सरकारी गोदामात सडत असल्यामुळे व ठेवण्यासाठी जागा नासल्यामुळे केंद्र सरकारने सर्व शिधावाटप धारकांना बिपीएलच्या दरोन अन्न पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने अन्नाची मागणी करावी अशा सूचना सुद्धा योजना आयोगाने केल्या आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने बिपीएलच्या शिधावाटप पत्रिका वाढविण्याऐवजी लाखो शिधावाटप पत्रिका कमी करण्याचा सपाटा सुरू केला. या आंदोलनामध्ये राजु उपलेंचवार, विकास गाडगे, हलीमा बानो, लिला बुरांडे, प्रितम ठाकुर, जीवन गटलेवार, राजु वर्मा, शेख निसार, संजय बोंद्रे, नितिन कांबळे, नंदू जयस्वाल, संजय सुबुगडे, मुरली वाघाडे, प्रितम ठाकुर, सतिष जाधव, सुनिल राऊत, पद्मा बैस, र्शद्धा तिवारी, आंनद कापर्तीवार, अजीज विराणी, राजु राठोड हे उपस्तित होते.

No comments: