Monday, July 1, 2013

शेतकऱ्यांची फसवणूक-पारस ब्रह्म कंपनीचे बी टी बियाणे बोगस


पारस ब्रह्म कंपनीचे बी टी बियाणे बोगस 
शेतकऱ्यांची फसवणूक
ॅ स्थानिक प्रतिनिधी/ यवतमाळ
जिल्ह्यातील अध्र्याअधिक तालुक्यात पारस ब्रह्म कंपनीचे बियाणे बोगस निघाल्यामुळे ते उगाले नाही. परिणामी शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कृषी विभागाकडे शेकडो तक्रारी करूनही अद्याप कारवाई करण्यात न आल्याने शेतकरी संकटात सापडल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील केळापूर, घाटंजी, झरी, मारेगाव, राळेगाव, कळंब, वणी, बाभूळगाव,नेर, महागाव या तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांनी पेरलेले पारस ब्रह्म कंपनीचे बियाणे बोगस निघाले असून सरासरी फक्त २0 टक्के रोपे अंकुरली आहेत. परिणामी कर्जबाजारी शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा फटका तर बसलाच , शिवाय यंदा शेती पडित ठेवण्याची पाळी आली आहे.
पारस ब्रह्म या कंपनीविरूद्ध मागील आठवड्यात प्रत्येक तालुक्यात शेकडो तक्रारी कृषी अधिकार्‍यांकडे आल्या आहेत. मात्र एकाही ठिकाणी बियाणे कायद्यांतर्गत पारस ब्रह्म कंपनी विरुद्ध साधी कार्यवाहीही करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत या कापूस बियाणे कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा विक्री परवाना तत्काळ रद्द करावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. एकीकडे राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माहिकोवर कार्यवाही झाल्यानंतर बियाणे कंपन्या सरळ झाल्या असून यावर्षी बोगस बियाणे विकण्याची कोणतीही तक्रार नाही असा दावा करीत आहेत. त्याच वेळी यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी पारस ब्रह्म कंपनीचे बि. टी.बियाणे फारच निकृष्ट निघाल्याच्या तक्रारी करीत आहेत. अनेक शेतकर्‍यांनी तर संपूर्ण पेरणीमध्ये एकही झाड वापलेले नाही अशी तक्रार येत आहे. साखरा येथील कापूस उत्पादक शेतकरी गजेंद्र आष्टेकर यांनी त्यांच्या १0 एकरात पारस ब्रम्हा कंपनीचे बि.टी.बियाणे १0 बॅग लावले होते. परंतु एकही झाड वापलेले नाही अशीच परिस्थिती घोडदरा, किन्हाळा, मंगी, सोनुर्ली, सिंगलदिप, सखी, धारणा, पढा, वाई, तेलंगटाकळी, सायखेडा, कोंघारा, हिवरा, चालबर्डी, पालगाव, बोटोणी, बोथ, बहात्तर, वागदा, सोनबर्डी, मारेगाव, वांजरी, झुली, ढोकी, मराठवाकडी, वार्हाकवठा, पिवरडोल, गवारा, जरुर, जरंग, शिवणी, आंबेझरी, कोळझरी, सुर्ला, रोहपाट, नवरगाव, करणवाडी या गावामधील आहे. मात्र तक्रारीनंतरही कृषी अधिकारी किंवा कंपनीचे अधिकारी येतील नंतर कार्यवाही होईल व त्यानंतर बघू पाहू अशी बतावणी करीत आहे. बोगस बियाण्यांची ओरड झाल्यानंतर कंपनीच्या मालकांनी सरकारी अधिकार्‍यांना मोठी रक्कम देऊन प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. येत्या आठवड्यात जर पासर ब्रह्म कंपनीचे बियाणे विकण्याचा परवाना रद्द झाला नाही तर कृषी विभागाविरुद्ध फौजदारी कारवाईचा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आ

No comments: