Monday, December 17, 2018

लोकसभा निवडणुक २०१९: भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरीकडे देण्याची काळाची गरज -किशोर तिवारी

लोकसभा निवडणुक २०१९: भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरीकडे देण्याची काळाची गरज -किशोर तिवारी  
दिनांक -१७ डिसेंबर २०१८
पाच राज्याच्या विधानसभेचे निकाल भाजपच्या एकछत्री टोकाच्या भुमिकेत घेऊन देशाची सत्ता चालविणाऱ्या नेत्यांच्या अहंकाराच्या व हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्या नेत्यांच्या कार्यशैलीवर पक्षाबाहेर खुली तर भाजपामध्ये आतल्या सुरात चर्चा जोरदारपणे सुरु आहे तर पक्षाच्या नेतृत्वाच्या वादग्रस्त नोटबंदी व घाईने लागू झालेल्या जी एस टी कर प्रणाली कृषी क्षेत्रातल्या व आर्थिक क्षेत्रात व्यापाऱ्यांना मंदीचा मागील तीन वर्षापासून बसता असलेला सतत फटका त्यातच  गॅस जोडणीचा वा मुद्रा योजनेचा ऐतिहासिक निर्णयाचा बँका व अनुदान कमी करण्याच्या वा जागतीक कच्च्या तेलाची किंमतीची वाढ हाताळण्यात आलेला अपयश यावर संघ परीवारामध्ये सुरु असलेल्या चिंतनामध्ये विनंतीवजा सूचना करतांना विदर्भाचे शेतकरी व आदीवासी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी संघ परीवार प्रमुखांना केलेल्या विनंतीमध्ये लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व सर्वसमावेशक व देशाला सर्व क्षेत्रात विकासाकडे नेण्याकरितां व सध्या विरोधी पक्षांना वा भाजपमध्ये प्रचंड नाराजीत व आपला झालेला उपमान सहन केलेल्या नेत्यांना सोबत घेण्याकरिता व समाजाच्या सर्व वर्गाच्या क्षेत्राच्या जनतेमध्ये विश्वावासाचे व भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी पक्षातील संघ परिवारातील मवाळ नेते नितीन गडकरी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व देण्यात यावे अशी विनंती केली आहे . 
किशोर तिवारी यांनी प्रसारित केलेल्या आपल्या विनंती  पत्रकात संघ परिवारातील सर्व जेष्ठांना व भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपले सर्व आयुष्य भाजपाला या स्तरावर आणण्यासाठी आपले जीवन बलिदान केलेल्या सर्व नेत्यांना तसेच भाजपच्या तळागाळातील कोट्यावधी कार्यकर्त्यांना उद्द्येशून नम्रपणें म्हटले आहे कि आपण ऑक्टोबर २०१२ मध्ये पक्षाचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर नितीन गडकरी यांच्या रूपाने एका सर्वलोकांना लोकशाही पद्धतीने घेऊन आपल्या मवाळ नेतृत्वाने देशाला कृषी सह सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व कामगीरी करणार या विश्वासाने भाजपशी मैत्री केली मात्र डिसेंबर २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या खांद्यावर बिनबुडाचा खोट्या आरोपाची बंदुक देऊन गडकरी यांना अडचणीत आणण्यात व दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपद व त्यामुळे देशाचे २०१४ मधील निर्विवाद मिळणारे पतंप्रधानपद हिरावुन घेण्यात आले मात्र त्यावेळी नितीन गडकरी यांना भाजप नेतृत्वापासून दूर ठेवणारे सर्व  भीष्मपितामहसुद्धा सक्तीच्या रजेवर जातील  याची त्याना कल्पना नव्हती मात्र आज सर्वच देशभरात २०१४ मध्ये भाजपच्या मागे उभे राहणारे सारे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सरकार व संघपरिवारात चापलूस लोकांच्या गर्दीमुळे मेटाकुटीस आले आहेत यामुळे भाजपमध्ये संवाद व लोकशाहीच्या स्थापनेकरीता नितीन गडकरींच्या हातात भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व देणे काळाची गरज आहे नाहीतर पुन्हा एकदा  काँग्रेसची सत्ता देशात आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा किशोर तिवारी यावेळी दिला आहे . 
पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची धुरा जर नितीन गडकरी यांच्या हातात देण्यात आली असती तर मध्यप्रदेश व राजस्थान मध्ये भाजपाची सत्ता हमखास आली असती तसेच छत्तीसगड व तेलंगणा भाजपची अशी दैनावस्था झाली नसती देशाला विकासाची व युवकांना रोजगाराची आवश्यकता असतांना अतीरेकी भुमिका घेणारे हुकूमशाहीने पक्षाला व सरकारला चालविणारे नेते समाजाला व देशाला घातक सिद्ध होतात हा इतिहास भारताला नवीन नाही तर त्याच्या पुनरावृत्तीची आज गरज नसल्यामुळे भाजपने आपले नेतृत्व नितीन गडकरी यांना देऊन डिसेंबर २०१२ मध्ये केलेली चूक दुरुस्त करण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे. 
===============================================================================================================
=============================

No comments: