Thursday, December 20, 2018

नितीन गडकरी यांना अडचणीत आणल्यास देशात भाजपाला अडचणी वाढतील -किशोर तिवारी

नितीन गडकरी यांना अडचणीत आणल्यास देशात भाजपाला अडचणी वाढतील -किशोर तिवारी 
दिनांक -२१ डिसेंबर २०१८
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व सर्वसमावेशक व देशाला सर्व क्षेत्रात विकासाकडे नेण्याकरितां व सध्या विरोधी पक्षांना वा भाजपमध्ये प्रचंड नाराजीत व आपला झालेला उपमान सहन केलेल्या नेत्यांना सोबत घेण्याकरिता व समाजाच्या सर्व वर्गाच्या क्षेत्राच्या जनतेमध्ये विश्वावासाचे व भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी भाजपचे सर्वमान्य संघ परिवारातील मवाळ व कृषी विषयाचे जाणकार तसेच ग्रामीण भारताचे  आर्थिक प्रश्न्नाचे समाधान करण्याची जाण असणारे नेते नितीन गडकरी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व देण्यात यावे अशी संघ प्रमुखांना केल्यावर सध्या अख्ख्या भारतात या विषयावर चर्चा सुरु झाली आहे मात्र महाराष्ट्रातील मोदी -अमित शहा भक्तांमध्ये माझ्यावर टीकेची झोड सुरु झाली आहे ,आपण भाजपचे सक्रीय सदयस नाही व विदर्भात शेतकरी व आदीवासी चळवळीत मागील २५ वर्ष काम करीत असलेला कार्यकर्ते असुन हे आपले व्यक्तिगत मत असल्याचे वारंवार स्पष्ट केल्यानंतरही आपल्या विवेकावर व पक्षात वा देशात सर्वमान्य संघ परिवारातील मवाळ नेतृत्व आल्यास अल्प संख्यक समाजाचा सूर कळण्याकरीता सुरु केलेला खुल्या चर्चेचे स्वरूप विकृत केल्याने आपण व्यथित झाले असुन मला नितीन गडकरीच्या फार जवळ असलेल्या मंत्र्यांनी व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी तुमच्या  या पत्रामुळे नितीन गडकरीच अडचणीत येतील त्यांचेवर  डिसेंबर २०१२ प्रमाणे खोटे आरोप व ई डी चा त्रास सुरु होईल अशी भीती व्यक्त केली आहे या भीतीच्या प्रकारावर किशोर तिवारी यांनी नितीन गडकरी यांना अडचणीत आणल्यास देशात भाजपाला अडचणी वाढतील असा गंभीर इशारा एक छत्री टोकाच्या भुमिका  घेऊन अहंकाराच्या व हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्या नेत्यांच्या  पुन्हा एकदा दिला आहे . आपले पत्र प्रकाशीत झाल्यावर काश्मीर ते  कन्याकुमारी  पासुन लाखो तळागाळातील जनतेच्या आलेल्या प्रतिक्रिया व महाआघाडीच्या अनेक नेत्यांनी आपणास नितीन गडकरी यांचा चेहेरा मान्य असल्याचे संकेत दिले आहेत यामुळे नितीन गडकरी हा एकमेव राष्ट्रीय पर्याय असल्याचे निश्चित झाले आहे , असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 
भाजप हा पक्ष शिस्तीचा आहे त्यामध्ये आपली मते सार्वजनिकपणे मांडले  पक्ष शिस्तीचा भंग आहे मात्र आपण भाजपच्या मित्र आघाडीचा भाग आहोत त्यामुळे भाजपच्या मोदी -अमित शहा भक्तांनी आपला उपमान करू नये अशी कडकडीची विनंती तिवारी यांनी केली आहे . 
यापूर्वी दिनांक १७ डिसेंबरला किशोर तिवारी यांनी  संघ परीवारतील  प्रमुखांना भाजपाच्या नेतृत्वात बदलांवर  केलेली विनम्र विनंती राष्ट्रीय चर्चेसाठी सार्वजनिक केल्यावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच तात्काळ हटवा अशी मोहीम सुरू केल्याचा संभ्रम मोठ्या प्रमाणात वारंवार प्रसारीत करण्यात येत आहे त्यातच मुंबई भाजपचे नेते राज पुरोहीत यांनी "किशोर तिवारी कोण त्यांची अवकात काय असा प्रश्न माध्यमांच्या मार्फत उपस्थित केला तर काही भाजपच्या मंत्र्यांनी आपणास कोणीतरी सुपारी दिल्याचा आरोप केला तर त्यांना आपण माहीती देतो की माझे वडील पंडित जमुनाशंकर तिवारी हे भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ प्रचारक होते  गेल्या ६० वर्षापासुन संघाच्या निगडीत आहे आणीबाणीत मिसा अंतर्गत आम्ही कारावास भोगला २०१४ च्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी भाजपने आपला वापर केला व नंतर केराच्या टोपलीत टाकण्यात आल्यावरही आपण फक्त संघाच्या शिस्तीमुळे चुप बसलो ,आपण भाजपासाठी फक्त नितीन गडकरी नेतृत्व करतील व शेतकऱ्यांचे व विदर्भाच्या राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा होईल यासाठी पाठींबा दिला होता  ,मात्र आज शेतकरी मिशनचा अध्यक्ष या नेत्याने मागील ६ वर्षात ३६८० खेड्यात घरा घरात भिरल्यावर लाखो लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा तसेच नोटबंदी व घाईने लागू झालेल्या जी एस टी कर प्रणाली कृषी क्षेत्रातल्या व आर्थिक क्षेत्रात व्यापाऱ्यांना मंदीचा मागील तीन वर्षापासून बसता असलेला सतत फटका त्यातच  गॅस जोडणीचा वा मुद्रा योजनेचा ऐतिहासिक निर्णयाचा बँका व अनुदान कमी करण्याच्या वा जागतीक कच्च्या तेलाची किंमतीची वाढ हाताळण्यात आलेला अपयशावर खुल्या नाराजीच्या सूर ऐकल्यावर  संघ परीवारामध्ये सध्या सुरु असलेल्या चिंतनामध्ये विनंतीवजा सल्ला  करतांना  न विचारता दिला असल्याचे पुन्हा एकदा सप्ष्ट केले आहे . 
डिसेंबर २०१२ व २०१३ च्या सुरवातीला मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या खांद्यावर बिनबुडाचा खोट्या आरोपाची बंदुक देऊन गडकरी यांना अडचणीत आणण्यात आले होते  व दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपद व त्यामुळे देशाचे २०१४ मधील निर्विवाद मिळणारे पतंप्रधानपद हिरावुन घेण्यात आले होते याचा  राग असतांनाच पाच राज्याच्या विधानसभेचे निकाल भाजपच्या एकछत्री टोकाच्या भुमिकेत घेऊन देशाची सत्ता चालविणाऱ्या नेत्यांच्या अहंकाराच्या व हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्या नेत्यांच्या कार्यशैलीवर नाराजी मोठ्याप्रमाणात समोर आली आहे  अशा   सर्व आयुष्य भाजपाला या स्तरावर आणण्यासाठी आपले जीवन बलिदान केलेल्या सर्व नेत्यांना तसेच भाजपच्या तळागाळातील कोट्यावधी कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करणे हा आत्मचिंतनाचा प्रयन्त असल्याचे किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले आपल्या अनाहूत सल्ल्यामुळे ज्या परिजनाच्या भावना दुखावल्या त्यांना दिलगिरी किशोर तिवारी व्यक्त केली आहे . 
=====================================================================

No comments: