Friday, March 8, 2019

यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना सिंचन क्षेत्रासाठी एक क्रांतीकारक पाऊल -किशोर तिवारी

यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना सिंचन क्षेत्रासाठी एक  क्रांतीकारक पाऊल -किशोर तिवारी 
दिनांक ९ मार्च २०१९
शाश्वत शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना हंसराज अहिर यांच्या सतत पाठपुराव्याने व माजी खासदार विजय दर्डा  पुढाकाराने  महाराष्ट्र  शासनाने नदी पुनरुज्जीवनाचा सात वर्षीय प्रकल्प हाती घेतला घेऊन  त्याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीपासून करण्यात येणार येत असुन नुकतेच  वाघाडी पुनरुज्जीवनाच्या ९८५ कोटींच्या प्रकल्प आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधी उपलब्ध करून दिला असुन  या प्रकल्पातून नदी काठावरील ३० हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न पाचपट होणार असुन या नदी पुनरुज्जीवनाच्या प्रकल्प एक कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल असुन यामुळे वाघाडी प्रकल्प वाघाडी नदी  बारमाही वाहती करण्यास क्रांतिकारक असल्याचे मत शेतकरी नेते किशोर तिवारी म्हटले आहे . 
चांगल्याकामाचे कौतुक झालेच पाहीजे त्याचवेळी चुकीच्या निर्णयावर कानउघाडणी केलीच पाहीजे अशी आपली भूमिका आहे कारण यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी ही महत्त्वाची नदी यवतमाळ, कळंब, घाटंजी तालुक्यातून वाहते. पैनगंगेची उपनदी असलेली वाघाडी पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळते. उन्हाळ्यातील चार महिने आणि इतरही काही महिन्यांत ही नदी कोरडी पडते. ती बारमाही वाहती राहावी यासाठी इशा फाउंडेशनने काही दिवसांपूर्वी सर्व्हे करून पुनरुज्जीवनाचा आराखडा शासनास सादर केला होता ,ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुुदेव यांनी देशभरात ‘रॅली फॉर रिव्हर’ प्रकल्प सुरू केला आहे. त्या अंतर्गतच वाघाडीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे व  प्रकल्प आराखडा  सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या उपस्थितीत राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सादर करण्यात आला होता . केंद्रीय गृहराज्यमंत्री ना हंसराज अहिर यांच्या सतत पाठपुराव्याने व माजी खासदार विजय दर्डा  पुढाकाराने  शासनाने प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविली असून आता कामही सुरु झाल्याचे किशोर तिवारी म्हटले आहे . 
सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी भारतातील नद्यांच्या शोचनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी १६ राज्यांमधून ९,३०० किमीची रॅली काढून ‘रॅली फॉर रिव्हर’ मोहीम २०१७ सप्टेंबरमध्ये सुरू केली. त्यानंतर त्यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेचा आराखडा पंतप्रधानांना सादर केला. त्यानंतर ज्या सहा राज्यांनी या मोहिमेअंतर्गत नदी पुनरुज्जीवनाचे सामंजस्य करार केले होते त्यात महाराष्ट्र पहिले राज्य होते यासाठी किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे अभनंदन केले आहे .  या प्रकल्पामध्ये  वाघाडी नदीच्या काठावर  परिसरात झाडांची संख्या वाढविणार येणार आहे  यात प्रामुख्याने फळझाडे लावली जाणार सोबतच नदी काठावरील गावांमध्ये जनजागृती करन्यात येणार आहे  व नदी काठावरील शेतकºयांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त केले जाणार आहे व पारंपरिक पिकांपेक्षा फळशेती, सामूहिक शेती करण्यास प्रवृत्त करणार सोबतच शेतकरी उत्पादन संस्था स्थापन करून फळांची विक्री केली जाणार आहे यासाठी पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी संपुर्ण सहकार्य सद्गुरू जग्गी वासुदेव यांना देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहीती किशोर तिवरो यांनी दिली . 

No comments: