Saturday, March 2, 2019

अर्ली येथील पुरग्रस्तांचा व प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रलंबित प्रश्न निकाली लावणार -किशोर तिवारी यांची " गाव मुक्काम " कार्यक्रमात माहीती

अर्ली येथील पुरग्रस्तांचा व प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रलंबित प्रश्न निकाली लावणार -किशोर तिवारी यांची " गाव मुक्काम " कार्यक्रमात माहीती 
दिनांक -३ मार्च २०१९
यवतमाळ जिल्ह्यातील अर्ली येथील १०५ कुटुंबाचा २००७ पासुन प्रलंबित असलेला  पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न कायम स्वरूपी पट्टे देऊन व त्यावर घरकुल वसाहत निर्माण करून येत्या पावसाळ्यापूर्वी निकाली काढू असे ठोस आश्वासन कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मशीनचे अध्यक्ष किशोर तिवारी अर्ली येथील गाव मुक्काम कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजीत सरकार आपल्यादारी कार्यक्रमात दिली .अर्ली येथील सरपंच पूजा कोवे  यांनी यावेळी पुरग्रस्तांचा वतीने हा विषय मांडला व या भागातील लोकनेते शिवारेड्डी येलट्टीवार ,अर्लीचे नरेंद रेड्डी या लावून धरल्यावर आपण या पुरग्रस्तांची परिस्थिती प्रतक्ष्य पाहल्यावर निर्णय घेणार असे सांगुन मागील १२वर्षांपासून ज्या आठवडी  बाजाराच्या शेड मध्ये हे सर्व लोक राहत आहेत त्या ठिकाणी प्रत्येक घराला भेट दिल्यानंतर आपणास शासनाचा प्रतिनिधी म्हणून लाज वाटत असुन येत्या ४ महीन्यात आपण स्थानीय लोकप्रतिनिधी व सरळ मुख्यमंत्रीच्या कार्यालयामार्फत सोडविणार असे स्पष्ट केल्यावर गावकऱ्यांनी तिवारी यांची सुटका केली . यावेळी आदीवासी नेते अंकित नैताम ,सरपंच पूजा कोवे ,जिल्हा परीषद सदयस गजानन बेजंकीवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगारेड्डी क्यातमवार ,भाजप नेते शिवारेड्डी पाटील येलटीवार ,नरेन्द्ररेड्डी अर्लीकर ,मायाताई बारहाते ,गजानन बोदूरवार ,डॉ दिलीप रेड्डी कुंटावार धनंजय झीलपिलवार ,किशोर रासमवार ,भूमण्णा सरलावार ,जितु मडावी ,वसंतराव कुरवते  ,हनमंतु कोवे ,लक्ष्मण कुरवते ,महादेव मामीडवार ,नरसय्या नागुलवार ,रमेश कोपुलवार .गंगाराम तांडेकर व पुनाजी टापरे  उपस्थित होते . 
प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रलंबित प्रश्न निकाली
मागील अनेक वर्षांपासून अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथील वसाहत सम्पूर्ण निकामी झाली असुन प्रचंड प्रमाणात दुरुस्तीचे काम आहे ,किशोर तिवारी यांच्या पाठपुराव्याने आता येत्या दोन महिन्यात दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मडावी यांनी दिली . अर्ली येथे फक्त एकच डॉक्टर असल्यामुळे आणी ते सुद्धा यवतमाळवरून येणे जाणे करतात त्यामुळे दोन डॉक्टर तात्काळ देण्याची मागणी यावेळी भाजप नेते शिवारेड्डी पाटील येलटीवार ,नरेन्द्ररेड्डी अर्लीकर यांनी केली मात्र अर्लीला डॉक्टर येतच नसल्याची माहीती यावेळी देण्यात आल्यावर आपण डॉक्टरांचा प्रश्न्न निकाली काढण्याचे आश्वासन किशोर तिवारी यांनी यावेळी दिले . 
वंचितांना अन्न 
अर्ली येथे ३० कुटूंबाना विभक्त झाल्यामुळे अन्न मिळत नसल्यामुळे तक्रार आल्यावर पुढील महिन्यापासून अन्न मिळणार अशी हमी किशोर तिवारी यावेळी तिवारी दिली ,संपूर्ण अर्ली गावात घाणीचे साम्राज्य असुन ग्रामसेवक कलेक्टरच्या पदाची परीक्षा देण्यात गुतंला असुन गट विकास अधिकारी एकदाही गावात आल्या आल्याची तक्रार सरपंच पुजा कोवे यांनी यावेळी केली त्यावर पंचायत समिती आपणच निवडली मात्र सभापतींनी लक्ष देण्याची विनंती करणार अशी माहीती किशोर तिवारी यांनी दिली . 
वन्यप्राणी ,अर्ली आंतरराज्य पुल व टिप्पेश्वर अभयारण्यासाठी  अर्ली-कोरेगाव (बंडल )गेट 
अर्ली वरून नांदेड तेलंगाणा आंतरराज्य बॅरेज -कम -पुलाचे काम लवकरच नितीन गडकरी यांचे मार्फत मार्गी लावण्याचे तसेच हा पूल झाल्यावर टिप्पेश्वर अभयारण्यासाठी  अर्ली-कोरेगाव (बंडल )गेट प्रस्तावीत करण्याचे तसेच वन्यप्राण्यांच्या शेतीला व नागरीकांना होत असलेल्या प्रचंड पिकांच्या व जीवितांचा मुद्दा यावेळी  शिवारेड्डी पाटील येलटीवार ,नरेन्द्ररेड्डी अर्लीकर यांनी उपस्थित केल्यावर आपली संपुर्ण बाजु नवीन वन्यप्राण्यांच्या शेतीला व नागरीकांना होत असलेल्या प्रचंड पिकांच्या व जीवितांचा नुकसान भरपाईसाठी तयार करण्यात येत असलेल्या कायदामध्ये करण्याचे आश्वासन किशोर तिवारी यांनी या वेळी दिले . नेहमीप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाला पांढरकवडा येथील सनदी अति जिल्हाधिकारी सौ भुवनेश्वरीदेवी यांनी कार्यक्रमाला आपली अनुपस्थिती नोंदविली व याची लिखीत तक्रार किशोर तिवारी यांनी मुख्यसचिव यांना सादर केली . 
===========================================================

No comments: