Saturday, March 16, 2019

ग्रामीण जनतेच्या मागण्यावर भाजपने भूमिका स्पष्ट करावी- मोदींच्या नावावर निष्क्रिय खासदारांनी निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पहाणे चुकीचे -किशोर तिवारी

ग्रामीण जनतेच्या  मागण्यावर भाजपने भूमिका स्पष्ट करावी- मोदींच्या नावावर निष्क्रिय खासदारांनी निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पहाणे चुकीचे   -किशोर तिवारी 
दिनांक -१६ मार्च २०१९
भाजप सरकारच्या विकासाचा बिंदू शहरीकरणावर व स्मार्ट सिटी ,बुलेट ट्रेन ,मेट्रो ट्रेनवर  एकत्रित झाला होता अशी ओरड होत आहे त्यातच  ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनर्जिवीत करण्यासाठी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीचा लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी सरळ अनुदान ,शेतीमालाचा भाव ,सर्व शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज विनाशर्त पंचवार्षिक तत्वावर जमिनीच्या किमतीच्या ७० टक्के देण्यात यावे , अन्नाची शेती करण्यासाठी पीकपद्धती बदलण्यासाठी सुधारणावादी धोरणे राबविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कमी पडल्याची प्रचंड ओरड शेतकरी व शेतमजूर  असल्याने भाजपने   ग्रामीण अर्थनीती स्पष्ट करावी अशी मागणी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे . 
सध्या भाजपला पर्याय नसल्याने वारंवार निष्क्रिय खासदार त्यातच गेली पाच वर्ष दररोज सकाळ   संध्याकाळ केंद्र व राज्य सरकारला शिव्या देणाऱ्या त्यातच सरकारमध्ये  सत्ता लुटणाऱ्या पक्षाच्या पक्षाला कोणत्याही भविष्याचा विचार करता जाती व धर्माच्या नावावर डोळ्याला पट्टीबांधून मतदान करतील असा अहंकार व विश्वास ठेवणे धोक्याचे असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 
किशोर तिवारी हे विदर्भातील कोरडवाहू आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताकरिता मागील ३० वर्षांपासून चळवळ करीत आहेत त्यांनी ग्रामीण विदर्भ मराठवाडयातील शेतकरी -शेतमजुरांचे प्रमुख आर्थिक प्रश्न सतत रेटले आहेत .सतत ग्रामीण जनतेच्या समस्या व शेतकरी आत्महत्या या प्रश्न्नावर सतत रान उठवीत  २००८च्या राष्ट्रीय कर्जमाफीनंतर त्यांनी २००९मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता मात्र काँग्रेसने हमीभाव ,पतपुरवडा ,ग्रामीण रोजगार ,पीकपद्धतीमध्ये बदल यासारख्या प्रमुख मागण्या नाकारल्यामुळे २०१४मध्ये भाजपला पाठिंबा दिला होता मात्र स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी ,पिककर्जमाफी ,ग्रामीण रोजगार ,पतपुरवडाधोरण याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होत नसुन यावर प्रामाणिक प्रयन्त करण्याची  आवश्यकता असतांनाही राजकीय पक्ष जातीय समीकरण मांडत असल्याची खंत व्यक्त केली शिवसेनेने मागील ५ वर्ष सतत विरोधी पक्षाची भूमिका घेत मुद्देसूद संघर्ष केला मात्र आता शेतीमालाचा भाव ,सातबारा कोरा करून सर्व शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज यावर भाजपकडून दिलेल्या आश्वासनाची माहीती मतदारांना देण्याची गरज असुन पर्याय नसल्याने लोक आपणास निवडणून देतील हा समज चुकीचा असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 

"आपणास शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने मंत्रिपद देऊन सल्ले देण्यास  नियुक्त केले मात्र शेतीचे सर्व सल्ले सरकारला रासायनिक कीटकनाशक ,जैविक बियाणे व कृषी व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं देतात अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली .  खुली  अर्थव्यवस्था स्वीकारणाऱ्या भारतात विश्व व्यापार संघटनेच्या करारानुसार सर्व सरळ वा इतर मार्गाने देण्यात शेत असलेले अनुदानात कपात करणाऱ्या सरकारने यावर्षी  नगदी अनुदान देण्याची ऐतिहासिक सुरवात केली असुन आता याला सकारात्मक टोकाला घेऊन जाणे अत्यन्त गरजेचे असुन मात्र सर्व राजकीय पक्ष मूळ प्रश्नाला  हात लावावा यासाठी निवडणुकीच्या वेळेस सत्तेचा तुकडा न पाहता तळमळीने प्रयन्त करणे काळाची गरज असल्याचे मत   किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले आहे  . 
 . 
=====================================================

No comments: