महाराष्ट्रातील महायुतीचा गुंता सोडविण्यासाठी संघाने मध्यस्थी करावी -किशोर तिवारी
दिनांक -३ नोव्हेंबर २०१९
महाराष्ट्राचे शेतकरी व ग्रामीण समस्यांचे राज्यमंत्री दर्जा असलेले व निवडणुकीपूर्वी शिवेसनेत प्रवेश घेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कृषी सल्लागार विदर्भातील शेतकरी आत्महत्या जगासमोर आणुन १९९६ पासुन सतत सरकारशी भांडणारे चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी पुन्हा एकदा सरसंघचालक मोहन भागवत याना महाराष्ट्रातील भाजप सेनेतील सत्तासंघर्षात मध्यस्थी करण्याची जाहीर विनंती केली आहे कारण महायुतीला स्पष्ट सत्ता जनतेनी दिल्यावरही फक्त युतीधर्म व संवाद त्याचबरोबर दिलेला शब्द्ध फिरवल्याच्या कारणाने मागील १० दिवसांनी सुरु असलेला नंगानाच घृणास्पद असुन संघाने आपली भूमिका गंभीरपणे घ्यावी व हा तिढा सोडवावा असे आवाहन त्यांनी यावेळी दिले .
किशोर तिवारी हे हाडाचे संघाचे असुन त्यांचे वडील संघाचे व जनसंघाचे पहिले पूर्णवेळ प्रचारक होते व त्यांनी आणीबाणीत १९ महीने नाशिक जेलात हवा खाली होती मात्र न विचारता सल्ला देण्याचा त्यांचा स्वभाव असुन मागील डिसेंबर २०१८ मध्ये भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी कडे द्या म्हणजे आपल्या नागपूरचा मित्र भारताचा पंतप्रधान होऊ शकते अशी गळ संघाला टाकुन नितीन गडकरींना अडचणीत आणले होते व त्यानंतर भाजपने निर्विवाद सत्ता प्राप्त केल्यांनतर संघाने सत्ता विकेंद्रित करावी व गुजरातच्या जोडीचा एकाधिकारवाद मोडीत काढावा असा अनाहुत सल्ला दिला होता मात्र संघाने मौन धारण केल्यामुळे सबकुछ अमित शहा असे चित्र आज समोर येत आहे यावर किशोर तिवारी यांनी चिंता व्यक्त केली आहे .सध्या "धृतराष्ट्र आंधळा होता व गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली " असे चित्र असुन फक्त सारेकाही मीडियाच्या माध्यमावाले "संजय उवाज "ने टी आर पी वाढवीत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली .
आज भाजपाचे केंद्रीय नेतृत्व देशातील एकमेव हिदुत्व जपणारी समाजसेवेत सक्रिय असलेली शिवसेने सारख्या पक्षाला दिलेला शब्द्ध पाळत नाही त्यांच्याशी कोणीही बोलणार नाही नाक घासुन येतील हा आदेश देणे अत्यन्त अनैतिक आहे व असला राजधर्म आला कोठून असा सवालही किशोर तिवारी व्यक्त केला आहे .
जर आजही देशात भाजपचे सर्वात मोठा जनाधार असलेले महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते नितीन गडकरी यांना मध्यस्थीं दिली तर दोन तासात शपधविधी झाला नाही तर पहा असे बोलवचन देत मागील सहा महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात ,जनादेश यात्रेत ,प्रचारात तसेच नेता निवडीमध्ये नितीन गडकरींचा उपमान जनतेला वेदनादायी आहे संघाने आज संपुर्ण भारतात संघटनेची होत असलेली व संघाने भाजपला दिलेले पूर्णवेळ प्रचारक यांचा झळ व सत्यासाठी भांडणाऱ्यांची वाताहत ,पगारी व काँग्रेस संस्कृतीच्या नेत्यांचा हैदोस ,भरष्ट्राचाराच्या प्रचंड तक्रारी त्यातच अनियंत्रित एकाधिकारदाव मोडीत काढण्यासाठी यावेळी आदेश देऊन सत्तासूत्रे व सन्मान कोणत्याही अटी न घालता शिवसेनेला द्यावा अशी विनंती सुद्धा किशोर तिवारी यांनी केली आहे .
==========================================================================
No comments:
Post a Comment