Sunday, November 3, 2019

परतीच्या पाऊसाचा कहर सुरूच -८० लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान -मुख्यमंत्र्यांनी फोटो -पंचनाम्याची आपली बूथ व वॉर रूमची यंत्रणा कामी लावावी

परतीच्या पाऊसाचा कहर सुरूच -८० लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान -मुख्यमंत्र्यांनी फोटो -पंचनाम्याची आपली बूथ व वॉर रूमची यंत्रणा कामी लावावी 
दिनांक - ३ नोव्हेंबर  २०१९
दररोज पडत असलेल्या परतीच्या वादळी पाऊसाचा कहर दररोज नवीन नवीन क्षेत्रात पसरत असुन आता खरीपासोबत रबीचे क्षेत्र नापिकीच्या व नुकसानीच्या पट्टयात आले असुन आता संपुर्ण महाराष्ट्राचे -८० लाख हेक्टरमधील ३० हजार कोटीचे पिकांचे नुकसान झाले असुन यापुर्वी ऐन दिवाळीत प्रचंड वादळी पाऊसाने कहर केला असुन अख्ख्या महाराष्ट्रात अंदाजे कमीतकमी ६०  लाख हेक्टरमधील  सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीचे प्रचंड नुकसान झाले होते आता महाराष्ट्र सरकारने १० हजार कोटीची तातडीची मदत देऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेसह सर्व खासदार व आमदारांनी नासीडीच्या शेतात जाऊन  शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्याचा  प्रयन्त केल्याबद्दल शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी आभार मानले आहेत . 
दिवाळीच्या एकदिवसा पूर्वीपर्यंत  आठवाड्याभरापासून महाराष्ट्रात अवकाळी परतीच्या  दमदार पाऊस सुरू झाला होता   ऐन दिवाळीमध्येही पावसाने विदर्भ  आणि मराठवाड्यतील जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले. शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या विभागातील ८० टक्के   महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती मात्र मागून आलेल्या  पावसानंतर मराठवाड  पाठोपाठ आता विदर्भातील अनेक  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरीपेक्षा दिंडी ओलांडली आहे.या अवकाळी पावसाने केलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे दररोज होत असलेल्या पाऊसाने तसेच १५ दिवसांपासून ओला झालेला  सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीतील माल पंचनाम्याची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांनी कोंब निघत असल्यामुळे महसुल व कृषी विभाग हतबल असुन आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या ग्रामीण नुकसानग्रस्त क्षेत्रातील पन्ना प्रमुख ,बुथ प्रमुख ,शक्ती प्रमुख ,विधानसभा क्षेत्र विस्तारक ह्या कंत्राटी फौजेसह वॉर रुममधील पगारी नियंत्रक सर्वे टीमचे खोटे रीपोर्ट देणारे कर्मचारी ,निकामी पगारी प्रवक्ते यांना कमी लाऊन ज्या ग्रामीण महाराष्ट्राने भाजप तेल लावलेले उमेद्वाराना आमदार केले व सत्तेचा वाट दाखविली त्याना वाचविण्यासाठी २४ तासात फोटो-पंचनामे करण्याचे आदेश द्यावे  असे आवाहन शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केले आहे . 
==================================================================

No comments: