Tuesday, January 28, 2020

कृषीचा समवर्ती सूचीमध्ये समावेश व सरकारच्या कृषीधोरणावर डॉ एम एस स्वामिनाथन यांनी प्रगट केली नाराजी -किशोर तिवारी

कृषीचा समवर्ती सूचीमध्ये समावेश व सरकारच्या कृषीधोरणावर  डॉ एम एस स्वामिनाथन यांनी  प्रगट  केली नाराजी -किशोर तिवारी यांना दिला उद्धवजी ठाकरेंना सहकार्याचा विश्वास 
दिनांक -२९ जानेवारी २०२०
पहिल्या हरित क्रांतीचे जनक डॉ एम एस स्वामिनाथन यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या व उद्धवजी ठाकरे यांच्या पुठाकाराने शिवसेना खासदार आमदार नेत्यांच्या कृषीविषयी चर्चेसाठी एका दशकापूर्वी  मुंबईला आमंत्रित केल्याची व गंभीर चर्चेची आठवणीला उजाळा देत सध्या केंद्र सरकार राज्यांना अधिकार देण्यासाठी कृषी हा विषय समवर्ती सूचीमध्ये आणत नसल्यामुळे तसेच कृषी उत्पादनाला भाव ,बाजार ,शेतकऱ्यांना पोसणारी शाश्वत अन्नाची डाळीची व तेलबियांची शेती त्याला जोपासणारी आयात निर्यात धोरण तयार करण्यात तसेच आपण दिलेले पतपुरवडा धोरण शिफारशी मूळ स्वरूपात न स्वीकारल्याबद्दल नाराजी प्रगत केली असुन महाराष्ट्राला कृषी संकटातुन उभारण्यासाठी आपण जिवंत असेपर्यंत सेवा देऊ असा विश्वास प्रगट केला . किशोर तिवारी  डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या सोबत मागील २५ वर्षापासून सतत काम करीत असुन आज त्यांच्या पत्नीला वृध्दापकाळाचा त्रास होत असतांना सुद्धा तिवारी यांचेशी ४ तास चर्चा केली व  कृषी ,ग्रामविकास , आरोग्य ,रोजगार , अन्नसुरक्षा ,आदिवासी विकास ,सिंचन ,मृदसंधारण ,महसुल गृह ,समाजकल्याण ,सहकार, पणन इतर शेतकरी,  शेतमजूर तसेच ग्रामीण  व्यवस्थेतील आर्थिक समस्यांवर चर्चा केली . 
माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पत पुरवडा धोरण ,लागवडीचा खर्च वा शेतीमालाचे भाव यांचा प्रश्न , जलसंपत्तीचे समान  वाटप  तसेच  पाऊसाचे व जमीनीखालच्या जलसंपत्तीचे नियंत्रण , पीकपद्धतीमध्ये बदल व नियंत्रण ,सक्षम विपदा प्रबंधन प्रणाली व राज्याला योग्य असणारी पीकविमा योजना ,ग्रामीण जोड व्यवसाय व महीला तसेच युवकांच्या रोजगाराचा प्रश्न ,शेतीमाल  संरक्षण व  शेतीमाल साठवण प्रक्रिया व्यवस्था , ग्रामीण आरोग्य व वन्यप्राणी -शेतकरी संघर्ष , पर्यावरणाच्या तसेच जागतिक धोरणांच्या अंबलबजावणीमुळे भारताच्या कृषी व ग्रामीण  संकट या आठ  प्रमुख कृषी क्षेत्रात शेतकरी आत्महत्या वा तोट्याची शेती पुरती मर्यादीत करण्यासाठीडॉ एम एस स्वामिनाथन यांच्या  सूचना देण्यासाठी विषेय  विनंती केली होती ती डॉ एम एस स्वामिनाथन यांनी वयाच्या ९५ वर्षी त्यांचा मान ठेऊन आज  २९ जानेवारीला किशोर तिवारी यांना भेट दिला आहे . 
मागील सहा वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रावर विषेय लक्ष देण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्त्पन्न येत्या २०२२ पर्यंत दुपट्ट करण्याचा धाडसी कार्यक्रम जाहीर केला त्यासाठी त्यांनी लागवडीचा खर्च व शेतीमालाला रास्त भाव ,बाजारात होणारी लुबाडणूक रोखण्यासाठी तसेच पेरणीपूर्वी पासुन बाजारात विक्रीपर्यंत पूर्ण  संरक्षण देणारी विमा योजना ,बँकांनी शेतीसाठी सुमारे १३ लाख कोटीचे पिककर्ज शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन देण्याचा कार्यक्रम राबविला त्यामध्ये डॉ स्वामिनाथन यांच्या बहुतेक सर्व शिफारशी लागू करण्याच्या दावा सुद्धा करण्यात आला मात्र याचा परीणाम विपरीत झाला देशातील सर्व प्रकारचे शेतकरी मागील ६ वर्षात कंगाल झाले त्यामुळेपंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश एम.पी., महाराष्ट्र यासारख्या पुरोगामी राज्यांनी  २ लाख कोटींपेक्षा जास्त कृषी कर्जमाफी या सहा वर्षात दिली त्याच्या जोडीला  स्थानिक अनुदान आणि मदत पॅकेजवर सुमारे  २ लाख कोटी राज्याच्या तीजोरीतून खर्च केला त्यासोबत राष्ट्रीय आपदा प्रबंधन निधीमधून केंद्राने या राज्यांना सुमारे ३ लाख कोटी या वर्षात दिले त्याच बरोबर विमा कंपन्यांना राज्यांनी तसेच केंद्रांनी सुमारे २ लाख  खिशात कोंबले त्याचवेळी या सहावर्षात कृषी व ग्रामीण क्षेत्रातील विविध सिंचनसह सर्व योजनांच्या नावावर सुमारे ११ लाख कोटी रुपयांची  खैरात वाटण्यात आली मात्र चुकीच्या नियोजनामुळे व योजनाचा केंद्रबिंदू कृषीउद्योग ,ग्राहक व बँकांचे हित असल्यामुळे सारा पैसा पाण्यात गेला व आज कृषिक्षेत्र सर्वात जास्त संकटात आला आहे यावर किशोर तिवारी यांनी डॉ एम एस स्वामिनाथन यांच्यांशी सखोल चर्चा केली . 
सध्याचा  आर्थिक आणीबाणीच्या वेळी फक्त कृषी क्षेत्रातील गुंतवतणूक वा मूळ धोरणात्मक बदल भारताला बाहेर काढू शकतो असा डॉ एम एस स्वामिनाथन यांनी असा विश्वास आज व्यक्त केला व कृषी पतपुरवडा धोरण , आयात-निर्यात, विकास आणि कमकुवत पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय मुद्द्यांमध्ये घेण्यात आलेल्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे  यावर  सरकारने वारंवार दिलेले  अयशस्वी ठरलेले सर्व पॅकेज यांच्यावर  फेर विचार करण्याची त्यनीव्यक्त केली आहे . 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यांनी  लांब पल्ल्याच्या सकारात्मक विकासाच्या योजना लागु करण्यासाठी सर्व विचारसरणी व पक्षांच्या कृषी विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती सोबत चर्चा सुरु केल्या आहेत त्याचाच एक भाग  आजची   डॉ एम एस स्वामिनाथन यांचेशी चेन्नई येथे चर्चा असल्याचे किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले . 
================================================

No comments: