महाराष्ट्रात सर्व भुकेल्याला शिवभोजन या योजनेला समाजाने लोकचळवळ करावी - देवेंद्र फडणवीस यांची शिवभोजनावरील टीका दुर्भाग्यपूर्ण - किशोर तिवारी
दिनांक - ९ जानेवारी २०२०
दिनांक - ९ जानेवारी २०२०
सावकाराचे कर्ज काढु नका,भुकेल्याला अन्न द्या,अडाण्याला शिक्षण द्या, बेघराला घर द्या,वेळ आली तर घरातले भांडे विका पण मुलांना शिक्षण द्या म्हणणारे स्वच्छतेचे जनक, अंधश्रद्धेच्या विरुद्ध आसुड ओढणारे महान वैराग्यमुर्ती राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या मुक्तीच्या महामंत्राचा आदर्श ठेऊन गरीब आणि गरजूंना फक्त १० रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या 'शिवभोजन' योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संकल्पपूर्तीच्या भाग म्हणूननागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये या योजनेची घोषणा केली असुन या योजनेचा नियमित आढावा घेतला जात असुन आणि या योजनेच्या अंमलबजावणी निर्देश स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देत असुन गेल्या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळानं या शिवभोजन योजनेला मान्यता दिली असुन ती सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी तीन महिन्यांत ६ कोटी ४८ लाख रुपये खर्च अपेक्षित असुन प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ५० ठिकाणी शिवभोजन योजनेंतर्गत १० रुपयांत जेवणाची थाळी देण्यात येणार होती. या योजनेची आता राज्यभरात अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतल्यानंतर दिले आहे तसेच सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या या शिवभोजन योजनेंतर्गत भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या १० रुपयांत देण्यात येणार आहे मात्र ही योजनाच शुद्ध फसवेगीरी असल्याचा दावा नुकताच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार येथे केलेला दावा दुभाग्यपूर्ण असुन मला त्यांच्या कडुन ही अपेक्षा नव्हती अशी टीका अन्न सुरक्षा व अन्नअधिकार चळवळीचे कार्यकर्ते व फडणवीस यांचे कट्टर समर्थक किशोर तिवारी यांनी केली आहे .
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस सतत पोटात भुकेल्याला अन्न तहानलेल्यास पाणी द्या फक्त आणि मग बघा तुम्हाला देवाच्या दारात सुख आणि समाधानाची भीक मागायची गरजच पडणार नाही असा उपदेश देत होते व त्यांचे स्वप्नपूर्ती करून जनताराजा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून शिवभोजन योजनेंतर्गत १० रुपयांत जेवणाची थाळी देण्याची योजना शासकीय स्तरावर सुरु करणे म्हणजे त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली असल्यामुळे तसेच हे एक आध्यात्मिक कार्य असुन समाजाच्या सर्वच स्तरावरील श्रीमंत व मध्यमवर्गीयांनी या योजनेला लोकचळवळ करान्यासाठी प्रयन्त करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन किशोर तिवारी यांनी केले आहे .
शिवभोजन योजनेला वा १० रुपयांत जेवणाची थाळी देण्याची योजनेला सरकारी सनदी अधिकारी सरकार लंगर सुरु करीत असुन आता पासूनच तीनतेरा करण्याचा प्रयन्त करीत असुन त्यातच गावापासुन मुंबईपर्यंत कणाकणात भ्र्ष्टाचाराने बरबटलेल्या अन्न व नागरी पुरवडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यात कोणत्याप्रकारे भुकेलेल्या गरीबाचा तोंडातला घास खिशात टाकावा यासाठी कमर कसत आहेत आणी मागील युती सरकारच्या चूण-भाकर योजनेत खोटे बिल सादर करून अनुदान खाणारे पोटभरू राजकीय नेते व रास्त शिधावाटप दुकानदार शिवभोजन स्टाल घेण्यासाठी मुंबईवारी करीत असुन अशा सर्व योजनेची ऐशीतैशी करण्याऱ्यांची फौज असतांना एका चांगला गरीबांना वा भुकलेल्या वंचिताला अन्न देण्याच्या योजनेला त्यातील त्रुट्या काढुन सकारात्मक सहकार्य करावे कारण सत्ता आली नाही याचा त्रागा वडाचे तेल वांग्यावर काढल्याने साध्य होत नाही त्यामुळे आपली लोकप्रतिमा खराब होत आहे हे आपणास आपल्या जवळचे आपणास इतक्या लवकर सांगणार नाहीत मात्र आपण आपल्या वडिलांच्या स्मृतीत आपल्या पगारातुन वा भाजपच्या निधींमधून एक शिवभोजन केंद्र त्रिकोणी पार्कमध्ये उघडावे त्यामुळे जरूर सत्तेचे दिवस पुन्हा येतील असा मोठ्या भावाचा सल्ला किशोर तिवारी यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी न मागता दिला आहे .
======================================================================
No comments:
Post a Comment