Thursday, September 12, 2013

शेतमालाला भाव द्या, पॅकेज नको!संवाद यात्रेतील शेतकर्‍यांची मागणी-कृषिमंत्र्यांच्या दौर्‍याला शेतकर्‍यांचा विरोध

शेतमालाला भाव द्या, पॅकेज नको!संवाद यात्रेतील शेतकर्‍यांची मागणी-कृषिमंत्र्यांच्या दौर्‍याला शेतकर्‍यांचा विरोध

शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये : जिड्डेवार
कारेगाव बंडल येथे काल रात्री संवाद यात्रा पोहोचली. तेथे शेतकरी नेते मदन जिड्डेवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी गावातील शेकडो शेतकरी या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता सरकारशी व व्यवस्थेची संघर्ष करावा असे आवाहन मोहन जिड्डेवार यांनी केले.
संवाद यात्रेत सहभागी शेतकरी, महिला बचतगटाचे सदस्य, शेतकरी विधवा व शेतकरी 

आम्हाला कोणतेही पॅकेज किंवा मदत शरद पवारांनी घोषीत करू नये, तर आमच्या कापसाला भाव दिल्यास आम्हीच सरकारला पॅकेज देऊ असे प्रतिपादन चनाखा येथील शेतकरी गजानन गोदुरवार यांनी केले. ते संवाद यात्रेत शेतकरी प्रतिनिधी म्हणून बोलत होते.
यवतमाळ जिल्ह्य़ातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी सुरू झालेल्या संवाद यात्रेच्या दुसर्‍या दिवशी सरकार वरील संपूर्ण विश्‍वास गमावलेल्या शेतकर्‍यांनी अशी मागणी केल्याने, कृषिमंत्र्यांच्या दौर्‍याला त्यांचा विरोध स्पष्टपणे दिसून आला आहे. पिंपळशेंडा येथे पोळय़ाच्या दिवशी आत्महत्या करणार्‍या सुपार्‍याभाऊ मेर्शाम यांच्या घरी भेट दिल्यावर गावच्या शेतकर्‍यांनी, आम्ही कोलाम असूनही अंत्योदय योजनेचे धान्य मिळत नसल्याचे सांगितले. लोकवर्गणीतून बोर मारल्यानंतरही मोटारीसाठी निधी नाही. म्हणून प्रकल्प कार्यालयातील सनदीअधिकारी प्रेरणा देशभ्रतार हाकलून लावतात, आमचे दु:ख निवारण्यासाठी आजपर्यंत कोणीही आलेला नाही, अशी माहिती तुळसाबाई आत्राम यांनी दिली. तर रूढा येथील शेतकर्‍यांनी आमचा सरकारवरच विश्‍वास नसल्याचे सांगितले. शरद पवार हे थोतांड आहेत. त्यांच्या दौर्‍यात त्यांनी २00६ च्या पूरबुडीचे पैसे २0१३ला देतांना सुद्धा आमच्या गावातील ५0 टक्के शेतकर्‍यांची नावे गहाळ का झाली, असा सवाल मधुकर कुस्नेकर यांनी केला. तर घुबडी येथील शेतकरी नेते गंगारेड्डी क्यातमवार यांनी शेकडो शेतकर्‍यांसह संवाद यात्रेत भाग घेवून शेतकर्‍याला पिककर्ज नाही, कापसाला भाव नाही, तर गरीबाला अन्न नाही, सरकार व प्रशासन आंधळे झाले असून आमच्याशी तुम्ही काय संवाद साधणार असा सवालच उपस्थित केला. चनाखा येथील सरपंच सुगरू कनाके यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह संवाद यात्रेचे स्वागत करून आम्हाला कोणतेही पॅकेज किंवा मदत शरद पवारांनी घोषीत करू नये, तर आमच्या कापसाला भाव दिल्यास आम्हीच सरकारला पॅकेज देणार आहोत असे उत्तर गजानन गोदुरवार यांनी दिले. 
गावातील प्रगतशील शेतकरी गंगाधार दासरवार यांनी पुसद अर्बन बँकेतून ७0 हजारांचे कर्ज काढले होते. कर्ज माफी आल्यानंतर कर्ज माफ झाल्याची त्यांना माहिती देण्यात आली होती. मात्र, यावर्षी १ लाख २५ हजार रुपये फक्त व्याज म्हणून परत केलेल्या कर्जाच्या वसूलीची नोटीस मिळाल्याची माहिती देऊन कृषी मंत्री शरद पवार यांनी यावर तोडगा काढला नाही, तर मला सुद्धा आत्महत्या करावी लागेल असा इशारा दिला. पिंपळखुटी येथील शेतकरी व सरपंच यांनी संवाद यात्रेमध्ये मोठय़ा प्रमाणात सहभाग घेऊन सभा सुरू असतानाच स्टेट बँक ऑफ इंडिया पाटणबोरीचे अधिकारी यांनी प्रगतीशील शेतकरी देवन्ना समावार यांच्यावर वसुलीची नोटीस बजावली. एककीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडे भारताचे कृषी मंत्री शरद पवार पिंपळखुटीला येऊन दिलास देणार आहेत. त्याचवेळी बँकेचे अधिकारी वसुलीसाठी मोकाटपणे फिरत आहेत, हे सरकार आहे, की तमाशा असा सवाल लच्छन्ना कोरेड्डीवार यांनी केला.

No comments: