Sunday, September 15, 2013

शरद पवारांच्या दौर्‍याच्या पहिल्या दिवशी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या : शेतकरी विधवांची भेट न झाल्याने निराशा


शरद पवारांच्या दौर्‍याच्या पहिल्या दिवशी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या : शेतकरी विधवांची भेट न झाल्याने निराशा 
दिनाक -१५सप्टेंबर २०१३

२00६ च्या नापिकीपेक्षा यंदा भयंकर नापिकी व कर्जबाजारीपणाला शेतकरी तोंड देत आहेत. अशा कठीण परिस्थितीत देशाचे कृषिमंत्री ना. शरदचंद्र पवार ३ दिवसांच्या दौर्‍यावर विदर्भात आले आहेत व केंद्र सरकारची मदत केंद्रीय पथकाचा रिपोर्ट नंतरच मिळणार व याला महिना लागू शकतो अशी घोषणा केल्यानंतर आज चार शेतकऱ्यांच्या   आत्महत्या समोर आल्या असून यावर्षी  ६२८ शेतकर्यांनी  विदर्भात आत्महत्या केल्या आहेत मागील ४८ तासात गोंदिया येथील हितखेडा गावाच्या चिंतामण बोलाने ,अमरावती येथील  चिखलगाव या गावाचे दामोधर कळसकर व तेम्भूर्खेडा येथील प्रवीण  उमेकर तर  यवतमाळ येथील खैरी या गावाचे  मनोज  मडावी  यांनी आत्महत्या केल्याच्या   समोर आल्या आहेत . 

या दौर्‍यात आपण कोणतेही राजकारण न करता शेतकर्‍यांचे अर्शू पुसणार आहात, अशा बातम्या प्रसारमाध्यमातून येत आहेत. आपण पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा २00६ चा अनुभव पाहता आपल्या या भेटीत शेतकर्‍यांचे दु:ख जाणण्याचे व अर्शू पुसण्याचे प्रयत्न राजकीय वर्दळीत मागे पडून शेतकर्‍यांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळण्याचा प्रयत्न होणार नाही, असा आशावाद विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे. यावेळी योग्य दिशेने प्रयत्न केल्यास निर्दोष शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील, असे प्रतिपादनही तिवारी यांनी केले आहे
१ जुलै २00६ मध्ये देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे ना. शरदचंद्र पवार यांच्यासोबत विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वेदना जाणून त्यांचे अर्शू पुसायला आले होते. त्यावेळी त्यांनी २ हजार ७५0 कोटी रुपये व मुख्यमंत्र्यांनी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकर्‍यांसाठी घोषित केले होते. तसेच प्रत्येकवर्षी पीककर्जाची रक्कम दुप्पट करू, असे आश्‍वासनही दिले होते. मात्र पंतप्रधान व मुख्यमंत्री पॅकेजचे ३ हजार ७५0 कोटींमधून शेतकर्‍यांना दमडीही मिळाली नाही. आता ७ वर्षानंतर २00६ च्या पीककर्जापेक्षा अर्धे पीककर्ज शेतकर्‍यांना बँक देत असून, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजनंतर विदर्भात ८ हजारावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे पंतप्रधानाच्या अर्शू पुसण्याच्या प्रयत्नाने विदर्भाच्या शेतकर्‍यांच्या दु:खात भर पडली, हे वास्तव आहे
शेतकरी विधवांची भेट न झाल्याने निराशा 

यवतमाळ जिल्ह्यातील ज्या भागात आज  भेट दीली , त्याच राष्ट्रीय महामार्गावर मंगी येथे संतोष सिडाम या तरुण आदिवासी शेतकर्‍याने प्रचंड पावसाच्या नापिकीनंतर आत्महत्या केली आहे. त्याची विधवा पत्नी कविता सिडाम ही २४ वर्षांची असून, तिला २ महिन्यांची व ३ वर्षांची एक अशा दोन मुली आहेत. कविता सिडामला संतोषने आत्महत्या का केली याची विचारणा करून शेतकरी आत्महत्येचे वास्तव जाणून घ्यायला हवे, असे आवाहन विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी उद्यापासून जिल्हा दौर्‍यावर असलेल्या देशाचे कृषिमंत्री ना.शरदचंद्र पवार यांना केले होती  परंतु त्यांनी भेट खेतली नाही  तसेच ऐन पोळ्याच्या दिवशी १ हजार रुपयांची सोय झाली नाही म्हणून ज्या पिंपळापुरच्या सदाशिव किनाके या शेतकर्‍याने आत्महत्या केली त्याचे गाव पिंपळापूरही आपण भेट देत असलेल्या पांढरकवडाच्या राष्ट्रीय महामार्गावरच्या बाजुला ४ कि.मी. अंतरावर आहे. आपण जर या गावातील शेतकर्‍यांना सदाशिवने आत्महत्या का केली हे विचारले तर सरकार व प्रशासन शेतकर्‍यांपासून किती दूर गेले आहे, याची जाणीव होईल व  याच तालुक्यातील पाथरी येथील आदिवासी शेतकरी नागोराव सोयाम यांनीही पोळ्याच्या दिवशी घरात खायला अन्न नसल्यामुळे आत्महत्या केली. आपण जर या शेतकर्‍यांच्या दारावर भेट दिली व त्यांच्या घरातील दारिद्रय व दैनावस्था पाहावे हि विनंती केली होती परंतु  पवार साहेबांनी भेट टाळली यामुळे आमची निराशा झाली आहे असे मंगलाबाई किनाके यांनी सांगितले 
 साहेब, आपण भारताचे कृषिमंत्री व महाराष्ट्राचे सर्वांत दबंग नेते आहात, मात्र विदर्भाच्या शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्येवर आपला अभ्यास कमी पडला व आपल्या सरकारचे प्रयत्न भ्रष्ट अधिकार्‍यांनी हाणून पाडले व सारी व्यवस्था जमिनदोस्त झाली आहे. आपल्या सुचनेनुसार २00७ मध्ये योजना आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी या नैराशयग्रस्त श्ेतकर्‍यांना सावकाराच्या जाळ्यातून मोकळे करा, अन्न सुरक्षा द्या, आरोग्य सुरक्षा द्या व शिक्षण सुविधा उपलब्ध करा अशा शिफारशी केल्या होत्या. मात्र महाराष्ट्र सरकारने २00७ मध्येच सर्व शिफारशी मंजूर करून त्याची अंमलबजावणी केली नाही. आज पुन्हा एकदा या शेतकर्‍यांना नवीन पीककर्जाची गरज आहे, कापसाला ६ हजार रूपये भाव हवा आहे व सर्व शेतकर्‍यांना आरोग्य, शिक्षण व अन्नसुरक्षा देण्याची गरज आहे. तीन दिवसांच्या दौर्‍यात या प्रश्नावर आपण निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी केली तर केली तर निर्दोष शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील, असा विनंती  किशोर तिवारी यांनी व्यक्त केला.

No comments: