Sunday, May 19, 2019

आदीवासी व पारधी बेड्यातील एकही शासकीय शाळा बंद होणार नाही - किशोर तिवारी


आदीवासी व पारधी बेड्यातील एकही शासकीय शाळा बंद होणार नाही - किशोर तिवारी 
दिनांक - २० मे २०१९
कमी पटसंख्येच्या शाळा शासनाला आर्थिक तरतुदीसाठी जड झाल्या आहेत हे कारण समोर करून  लोकप्रतिनिधींना न विचारता जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून त्याबाबत मागील आठवडयात  संबंधित पंचायत समित्यांना आदेशही बजाविण्यात दिल्यानंतर हा मुद्दा किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चेत  सध्या महाराष्ट्रात १५ हजारावर शाळा मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्यामुळे  गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेची पटसंख्या पुरेशी असणे आवश्यक आहे त्यामुळे या शाळांबाबत सध्या धोरणात्मक प्रलंबित असल्याचे  सांगीतले मात्र  या तरतुदीचा आधार घेत शिक्षण विभागातील आदिवासींविरोधी अधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कमी पटाच्या ८१ शाळा बंद करण्याचा आदेश काढला असुन  यात ५० प्राथमिक, तर ३१ उच्च प्राथमिक शाळांचा असल्याचे सांगीतले मात्र यातील कोलाम पोडावरील तसेच पेसा अंतर्गत येणाऱ्या आदीवासी खेड्याच्या तसेच पारधी बेडयाच्या  एकही शाळा बंद होणार नाही अशी माहीती महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले . 
सध्या यवतमाळ जिल्ह्यात  प्राथमिक व  उच्च प्राथमिक शाळांमध्ये ११००च्या वर शिक्षक कमी आहेत त्यामध्ये कोलाम पोडावरील तसेच पेसा अंतर्गत येणाऱ्या आदीवासी खेड्याच्या तसेच पारधी बेडयाच्या   शाळावर शिक्षक जात नाहीत त्यामुळे अशाच शाळा बंद करण्याचा  तेथील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिले आहेत  मात्र  बंद होणाऱ्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एक किलोमीटरच्या  उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरच्या आतील दुसºया शाळेत समायोजित करण्यासाठी शाळाच नसल्याचे चित्र आहे यावर किशोर तिवारी चिंता व्यक्त केली . 
महाराष्ट्रसारख्या पुरोगामी राज्यात  प्राथमिक व  उच्च प्राथमिक शाळांमध्ये ११००च्या वर शिक्षक नसणे त्यामुळे कोलाम पोडावरील तसेच पेसा अंतर्गत येणाऱ्या आदीवासी खेड्याच्या तसेच पारधी बेडयाच्या मुलांना शिक्षणासाठी वंचित ठेवणे गुन्हा असुन हा मस्तवालपणा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी फक्त अख्या महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातच कसा झाला याची चौकशी करण्याचे आश्वासन  शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले . जर कोलाम पोडावरील तसेच पेसा अंतर्गत येणाऱ्या आदीवासी खेड्याच्या तसेच पारधी बेडयाच्या  एकही शाळा बंद झाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली.
==================

No comments: