Thursday, May 30, 2019

पश्चिम विदर्भाचे भूमिपुत्र खासदार संजय धोत्रे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे आत्महत्याग्रस्त विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या -किशोर तिवारी

पश्चिम विदर्भाचे भूमिपुत्र खासदार  संजय धोत्रे  यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे आत्महत्याग्रस्त विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या -किशोर तिवारी 
दिनांक -३१  मे २०१९ 
माझे अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वर्गमित्र ,१९७७च्या आणीबाणीच्या चळवळीचे सहकारी अजात शत्रु आपल्या ४० वर्षाच्या समाज जीवनात तसेच राजकारणात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणारे व अध्यात्म जीवनाचे प्रचारक दोन वेळचे आमदार व अकोल्यासारख्या मतदार संघातून सतत  चारवेळा लोकसभेवर प्रत्येक वेळी आपले मताधिक्य वाढवून विजयी होण्याचा विक्रम करणारे पश्चिम विदर्भाचे कापूस उत्पादक कोरडवाहू पूर्णवेळ शेती करणारे शेतकरी खासदार संजय धोत्रे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आत्महत्याग्रस्त विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असुन त्यांच्या हमीभाव ,पिककर्ज  वाटप , कृषी वीज पुरवडा ,सिंचनाचे प्रश्न ,ग्रामीण रोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता एक सहज व्यासपीठ मिळाल्याचा आनंद कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . किशोर तिवारी यांनी खासदार संजय धोत्रे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी प्रयन्त केल्याबद्दल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,नितीन गडकरी व भाजपचे संघटन मंत्री डॉ  उपेंद्र कोठेकर यांचे आभार मानले आहे . 
खासदार संजय धोत्रे यांना त्यांचे वडील माजी आमदार श्यामराव धोत्रे ,माजीमंत्री वसंतराव धोत्रे ,जेष्ठ बंधु दिवाकरराव ,सुविद्य पत्नी श्री श्री रविशंकर यांच्या आध्यात्मिक शिक्षणाच्या प्रचारिका सौ सुहासिनी धोत्रे ,  त्यांचे जावई शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे ,शेतकरी चळवळीचे नेते आमदार रणधीर सावरकर यांच्या सार्वजानिक , राजकीय ,चळवळीच्या अनुभवाचा फायदा सतत मिळाला आहे . आपल्या ४० वर्षाच्या लोकजीवनात सुरवातीला मेकॅनिकल इंजिनीयरिंग पदवी घेतल्यावर १९८१ मध्ये अकोला येथे आपला उद्योग सुरु करून त्याला भरभराटीला नेला त्यानंतर राजकारणात लोकप्रशासनाची एम . ए . ची पदवी घेऊन आपला आमदारकीचा प्रवास २६ वर्षांपूर्वी सुरु केला व मागील वर्षी त्यांनी एल एल बी ची पदवी संपादीत केली असल्यामुळे त्यांच्याकडून ग्रामीण जनतेच्या भरपूर आशा आहेत कारण त्यांनी १० वर्ष आमदार असतांना वा १५ वर्ष खासदार असतांना एकही निधीसाठी कोणाकडूनही एकही दमडी घेतली नाही त्यांच्या याच स्वछ चारित्र्यामुळे त्यांच्या अकोलकर सतत आपला विश्वास दाखवत आहेत आता त्यांच्या या कर्तृत्वाचा फायदा आत्महत्याग्रस्त विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना किशोर तिवारी यांनी व्यक्त केला  आहे. 
आत्महत्याग्रस्त विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भरघोस विश्वास ठेवून ५० %च्या वर मतदान करून भाजप सेना युतीचे उमेदवार निवडून दिले आहेत यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत त्यावर आज त्यांच्या दुसऱ्या इंनिंग मध्ये ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या व विकास यावर चर्चा होण्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त मंत्री संजय धोत्रे यांनी  शेती माल त्याचा हमीभावावर ढोस सरंक्षण  ,पतपुरवठा धोरण, पीक पद्धती मध्ये सुधारणा तसेच ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी यावर काम करण्याचा आग्रह शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यानी केला  आहे
यापुर्वी किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ विधीसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद दिले होते  व त्याच बरोबर मागील पाच वर्षात सरकारने शेतकऱ्यासाठी चालविलेल्या पीकविमा पीककर्ज वाटप , हमीभावावर खुल्या बाजारात होणारें आक्रमण तसेच ग्रामीण भागातील युवकांना मुद्रा योजनेचा फायदा देण्यासाठी बँकेच्या नकार ,सरकारी बँकेच्या राज्य सरकारच्या विरोधातील भूमिका यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष किशोर तिवारी यांनी वेधले आहे यावर नवनियुक्त मंत्री संजय धोत्रे यांनी करण्याची वेळ आली आहे कारण सरकारला २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्यासाठी आता पीककर्ज वाटपाच्या हमीभाव देण्याच्या तसेच पंतप्रधान पिकबिमा योजनेच्या त्रूटी दूर करण्यासाठी मूळ धोरणे बदलण्याची मागणी किशोर तिवारी यांनी यावेळी केली आहे. 
========================================================


No comments: