Thursday, May 23, 2019

अभिनंदन -भारताचे नवीन मोदींचे सरकार व विरोधकांची झालेली अवस्था यामुळे जनआंदोलनकांची भुमिका भविष्यात महत्वाची -किशोर तिवारी

अभिनंदन -भारताचे नवीन मोदींचे सरकार व विरोधकांची झालेली अवस्था यामुळे जनआंदोलनकांची भुमिका भविष्यात महत्वाची -किशोर तिवारी 
दिनांक -२३ मे २०१९
आज भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सरकार निर्मितीसाठी भाजपचे निरंकुश सत्ता स्थापनेसाठी मिळालेला जनाधार अप्रितीम असुन यासाठी नरेंद्र मोदींचे व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन केले असुन त्याच वेळी भारताच्या विरोधी पक्षांना मिळालेला दारुण पराभव प्रचंड चिंतेचा असुन आता नागरी समाजक्षेत्रात (civil society ) मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व जनआंदोलन करणाऱ्या चळवळीच्या गटांना आपली जबाबदारी समजुन आपल्या सक्रीय राजकीय चळवळीमध्ये सहभाग वाढवावा असे आवाहन विदर्भ जनआंदोलन समितीचे जनआंदोलक किशोर तिवारी यांनी केले आहे . 
मागील पाच वर्षात जनआंदोलन थंड झाले होते व जनआंदोलक आपल्या राजकीय विचारसरणीचा फक्त विचार करीत विकास व सामाजिक न्यायाच्या कार्यापासुन अलिप्त झाले होते त्याचवेळी आज राजकीय,सामाजिक,औदयोगिक, शिक्षण व धार्मिक क्षेत्रात विचारवंत परिस्थितीच्या दुराव्याने चिंतीत आहेत नागरी समाजक्षेत्रात (civil society ) मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व जनआंदोलन करणाऱ्या चळवळीच्या गटांमध्ये व सरकारमध्ये पुर्वी ही कटुता दिसत नव्हती, यावर  गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्यामुळे जनतेमध्ये काम करणारे व जनतेमधुन निवडणुक जिंकणारे लोकनेते यांनी आता नवीन भारताच्या निर्मितीसाठी काम करण्याची गरज आहे शेवटी जनतेचा आदेश हा लोकशाहीमध्ये शेवटचा असतो यासाठी आता काम  करण्याची आवश्यकता किशोर तिवारी यांनी मांडली आहे . 
समाजाच्या शिक्षण ,आरोग्य व व्यसनमुक्तीवर काम करण्याची आवश्यकता आहे व यासाठी नागरी समाजक्षेत्रात (civil society ) मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व जनआंदोलन करणाऱ्या चळवळीच्या गटांना द गोष्टीसाठी सरकारवर दबाब टाकणे अत्यंत जरुरी आहे ,आज सामाजीक प्रश्न आर्थिक अडचणीला आमंत्रीत करीत  आहेत सर्व राजकीय पक्ष सत्त्येच्या बाजारात नीतिमूल्ये विकून पोटभरू धंदे करीत आहेत व आता जशी सत्ता आली तशी सत्तापक्षात गर्दी सुरु होणार मात्र बेरोजगारी ,कृषिविकास ,ग्राम विकास ,शिक्षण ,आरोग्य व व्यसनमुक्तीवर काम करण्याची काळाची गरज यासाठी या भाजपच्या  निरंकुश सत्तेवर जनआंदोलन करणाऱ्या चळवळीच्या नेत्यांनी आता सत्तेची चाकरी  न करता समाजात विंचीताना सामाजिक न्याय व सार्वजनिक जीवनातून भ्र्ष्ट व्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी आता नवीन रूपाने लढा सुरु करण्याचे प्रतिपादन किशोर तिवारी यांनी केले आहे .
---------------------------------------------------
=========================

No comments: