Sunday, July 14, 2019

सर्व पारधी व कोलामांना अंत्योदय ,जातीचे प्रमाणपत्र व जमिनीचे पट्टे देणार -किशोर तिवारी यांची तेलंग टाकळी पारधीबेड्यावर घोषणा

 सर्व पारधी व कोलामांना अंत्योदय ,जातीचे  प्रमाणपत्र व जमिनीचे पट्टे देणार -किशोर तिवारी यांची तेलंग टाकळी पारधीबेड्यावर घोषणा 
दिनांक - १५ जुलै २०१९
येत्या दोन महीन्यात विषेय अभियान राबवुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने व पालकमंत्री मदनभाऊ येरावार व आदीवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या नेतृत्वात  सर्व पारधी व कोलामांना अंत्योदय ,जातीचे  प्रमाणपत्र व जमिनीचे पट्टे देणार असल्याची माहीती शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तेलंग टाकळी पारधीबेड्यावर सरकार आपल्या दारी कार्यक्रमात केली यावेळी आदिवासी नेते अंकित नैताम ,बंजारा नेते वसंत राठोड ,भाजपानेते रवी बोलेनवर सह उपायुक्त आदिवासी विकास , उपसंचालक आरोग्य डॉ फारुखी ,जिल्हा उप निबंधक सहकार अर्जना माळवे , कार्यकारी अभियंता  विदुयत वैद्य ,गट विकास अधिकारी वानखेडे ,सुरेश कव्हळे तहसीलदार ,भा.सोनटक्के निरीक्षण अधिकारी विषेय उपस्थित होते . 
तेलंग टाकळी पारधीबेड्यावर तहसिल प्रशासन आपल्या दारी  अंतर्गत लाभार्थी सत्यपन आणि दुय्यय शिधापत्रिका वाटप शिबाराचे आयोजन मो.चिखलदरा ता.केलापूर येथे करण्यात आले. त्या अनुषंगाने लाभार्थींना तात्काळ जीर्ण फाटलेल्या शिधापत्रिका दुय्यम करून वितरीत करण्यात आल्या. शिवाय हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री.सुरेश कव्हळे तहसीलदार, भा.सोनटक्के निरीक्षण अधिकारी,शु.रा.फाले पुरवठा निरीक्षक,श्री.डोमाळे,श्री. खडसे श्रीम.नागभीडकर,श्री.भिमार्टिवर तसेच मंडळ अधिकारी,तलाठी  व रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.

तेलंग टाकळी पारधीबेड्यावर सरकार आपल्या दारी कार्यक्रमात बोलतांना किशोर तिवारी यांनी स्वातंत्र्यानंतर पारधी समाजाची होत असलेली सतत उपेक्षेची  मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी गंभीर घेतली असुन यामुळेच त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेडा निवडला असुन याचे कारण मुकींदपूर पारधी बेडा भयाण वास्तव असून विकासाच्या नावाचा येथे कुठेही लवलेश नाही. पोट भरण्याच्या संघर्षात विकास यांच्यापासून कोसो दूर  गेलेला आहे. दररोज उद्याचे काय? हा प्रश्‍न यांच्या आजही पारधी समाजासमोर अशा   या पारधी पोडाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण आज येथे आल्याचे सांगितले 
आपल्या भेटीत  किशोर तिवारींनी पारधी बेड्यावर घराघरात जावून प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या प्रत्येक घरातील चुलीपर्यंत जावून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेत संबंधित अधिकार्‍यांना त्या सोडविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या या पोडावर घरकुल , नाल्या, पिण्याचे पाणी, अंत्योदयाचे धान्य, आरोग्याच्या समस्या अशा अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. यानंतर त्यांनी येथील नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना किशोर तिवारी म्हणाले  ज्या नागरिकांच्या घरकुलाच्या समस्या, प्लॉटच्या समस्या आहे. त्या निवारण्याची जबाबदारी तहसीलदारांची राहील. धान्याच्या समस्येसबंधी ते म्हणाले , येत्या सात दिवसात अंत्योदयाच्या लाभ प्रत्येक नागरिकास मिळाला पाहिजे, कुणीही यापासून वंचित राहता कामा नये अशी सूचना केली . आपण सतत  पाठपूरावा करूनही पारधी समाजाच्या समस्या सुटं नसल्यामुळे आपण ही भेट घेत असल्याचे तिवारीं यांनी यावेळी स्पष्ट  केले . 

No comments: