Thursday, July 18, 2019

नगरप्रशासनाच्या स्थायी व अस्थायी कंत्राटी सफाई कर्मचारीचे शोषण करणाऱ्या कंत्राटदारांवर अट्रासिटी लावा किशोर तिवारी यांच्या सुचना

नगरप्रशासनाच्या स्थायी व अस्थायी कंत्राटी सफाई कर्मचारीचे शोषण करणाऱ्या कंत्राटदारांवर अट्रासिटी लावा  किशोर तिवारी यांच्या सुचना 
दिनांक १९ जुलै २०१९
नगर परीषद व नगर पंचायत मध्ये लोकांनी निवडलेले नगराध्यक्ष वा सत्तारूढ पक्षाचे पोटभरू नेते गावातील घाण साफ करणाऱ्या वाल्मिकी व सुदर्शन समाजाच्या स्थायी व अस्थायी कंत्राटी सफाई कर्मचारीचे शोषण करीत असुन त्यांच्या टाळूवरचे लोणी खात असुन त्यांना हक्काची मजुरी व सुविधा सवलती यापासून नगर प्रशासनाच्या  मंजुरीने  वंचित ठेवत असल्यामुळे दलित समाजावर हा राजरोसपणे होत असलेला अट्रासिटी कायद्याची पायमल्ली असुन दोषींवर कारवाई न झाल्यास त्यांना वाचविणाऱ्याना सर्व मुख्याधिकाऱ्यांवर व सफाई नियंत्रणकावर अट्रासिटी कायद्यानुसार फौजदारी कारवाईकरून अहवाल एका महिन्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सादर करावा असा कडक सुचना शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्र राज्य सफाई  स्थायी व अस्थायी कंत्राटी कर्मचारी  संघटनेच्या आढावा बैठकीत दिले . ही आढावा बैठक पांढरकवडा येथील सुराणा भवन येथे आयोजित करण्यात आली होती .महाराष्ट्र सरकारच्या वतीने मा.श्री.डोनारकर ,सहाय्यक संचालक अमरावती,श्री.शशि मोहन नंदा D.A.O. यवतमाळ ,श्री.धिरज मोहोड मुख्याधिकारी न.प. दारव्हा,श्री.नीलेश जाधव,मुख्याधिकारी,नेर-नावाबपुर,श्री.चारुदत्त इंगोले,मुख्याधिकारी कळंब उपस्थित होते
यावेळी महाराष्ट्र राज्य सफाई स्थायी व अस्थायी कंत्राटी कर्मचारी  संघटनेच्या  श्री.जतनसिंग चव्हाण,श्री.नागेश खंडारे संस्थापक अध्यक्ष , डॉ.सौ.रेखा ताई बहनवाल राज्य कार्याध्यक्ष ,श्री.शेखर ब्राहमणे जिल्हा अध्यक्ष यांनी सफाई कर्मचारी यांच्या अनेक वर्षा पासून समस्या दूर होत नसल्याच्या व्यस्था मांडल्या  तर  ,प्रेमकुमार लेदरे ,शहर अध्यक्ष सफाई कर्मचारी संघटना,कंत्राटी संघटनेचे शहर अध्यक्ष अमर चावरे यांनी कंत्राटी कामगार वर्गाच्या पुढील मागण्या त्यामध्ये किमान वेतन नुसार पगार वाटप करणे,शासन निर्णयाप्रमाणे  सर्व लाभ त्वरित देणे,बँक द्वारे पगार करणे,नप आणि कंत्राट द्वार यांच्यात झालेल्या करारातील सर्व लाभ देण्यात यावे. 
संतोष पवार यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष (स्थायी)सफाई कर्मचारी संघटना यांनी स्थायी कर्मचारी वर्गाच्या मागण्या खालील मागण्या मांडल्या त्यामध्ये नप सफाई कर्मचारी वर्गास डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत मोफत सदनिका देण्यात याव्या,ज्या सफाई कर्मचारी वर्गाचे अनेक वर्षा पासूनचे भविष्य निर्वाह निधि कपात करण्यात आली आहे त्यांचे पैसे त्वरित जमा करून त्याची बॅलन्स शीट UAN देण्यात यावे,सफाई कर्मचारी वर्गास  आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्या,शहराची हद्द वाढ मोठ्या प्रमाणात झाली त्या प्रमानात कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी, सफाई कर्मचारी वर्गास तुच्छ वागणूक दिल्या जाते त्या वर निर्बंध लावण्यात यावे, या मागण्या रेटल्या . 
 महाराष्ट्र राज्य सफाई स्थायी व अस्थायी कंत्राटी कर्मचारी  संघटनेच्या या प्रश्ना वर अनेकदा आंदोलन करूनही  सुद्धा न सुटल्याने अखेर या विविध मागण्या संदर्भात सदर आढावा बैठकीत चर्चा करण्यात येऊन या सर्व समस्या मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून सोडविण्यात येणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.
या आढावा बैठकीत अनेक आदिवासी नेते अंकित नैताम ,बाबुलाल मेश्राम तसेच महाराष्टातील शेकडो सफाई कर्मचारी बंधु उपस्थित होते,सदर बैठक यशस्वी करण्या साठी संतोष पवार,जिल्हा उपाध्यक्ष (स्थायी) सफाई कर्मचारी संघटना ,प्रेमकुमार लेदरे ,शहर अध्यक्ष सफाई कर्मचारी संघटना,कंत्राटी संघटनेचे शहर अध्यक्ष अमर चावरे ,मयूर नरपांडे ,रोहित व्यास,संदीप झोटिंग,अविनाश तांदुलवार,संदीप उज्जेनवार,रवी कचोटे ,सचिन दुबेकार,विकी व्यास,सतीश कचोटे ,राकेश लेदरे इत्यादि सर्वांनी परिश्रम घेतले.

No comments: