Thursday, July 25, 2019

मनरेगाचे कुशलचे ३ महीन्यापासून प्रलंबित दीड लाख रुपये १० तासात मिळाले - जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार चवाट्यावर

मनरेगाचे कुशलचे ३ महीन्यापासून प्रलंबित  दीड  लाख रुपये १० तासात मिळाले - जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार चवाट्यावर  
दिनांक २६ जुलै २०१९
केळापुर तालुक्यातील  पंचायत समिती पांढरकवडा मधील ग्राम पंचायत मारेगाव येथील लाभार्थी अल्प भूधारक शेतकरी श्रीमती लिलाबाई परशराम आडे यांच्या विहिरीचे कुशल देयक सुमारे दीड  लक्ष एप्रिल मध्ये कर्ज काढून विहीर पूर्ण केल्यानंतरही देण्यात येत नव्हते मात्र मागील आठवड्यात शेकडो शेकडो चक्र मारूनही न मिळाल्यामुळे श्रीमती लिलाबाई परशराम आडे यांनी आपल्या मुलासह पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वानखेडे यांच्या दालनात आत्महत्येची धमकी देत धरणा सुरु केला परीस्थीती आटोक्याबाहेर जात असल्यामुळे त्यांनी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना निरोप दिला त्यांनी तात्काळ मध्यस्ती करून सरळ रोजगार हमी योजनेचे अति मुख्य सचिव एकनाथ डवले यांचेशी संपर्क साधला व त्यांचा श्रीमती लिलाबाई परशराम आडे यांच्याशी फोनवर संवाद करून दिला . 
श्रीमती लिलाबाई परशराम आडे यांनी  अति मुख्य सचिव एकनाथ डवले यांना फोनवरून आपन मार्च व एप्रिल महीन्यात भर दुपारच्या उन्हात आपल्या दोन मुलांसह दगड फोडुन ८०  फुटाच्या वर विहीर खोदली व त्यानंतर घरचे सोने व सावकारांकडून कर्ज घेऊन बांधकाम केले मात्र मागील तीन महिन्यांपासून ग्रामसेवक आज या उद्या देतो असे सांगत आहे ,आता वानखेडे साहेब सभापती व उपसभापती यांच्या भांडणात देयक अडल्याचे सांगीतले त्यानंतर डवले यांनी व्हीडीओ वरून संपूर्ण कामाचे निरीक्षण केले व येत्या एका दिवसात संपूर्ण देयक देण्याचे आदेश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दिले व त्याच दिवशी लाभार्थी अल्प भूधारक शेतकरी श्रीमती लिलाबाई परशराम आडे यांच्या विहिरीचे मोजमाप पैसे न घेता करण्यात आले व देयक कोणतेही कमिशन न घेता खात्यात जॅम करण्यात आली . 
केळापुर तालुक्यातील  पंचायत समिती पांढरकवडामध्ये या भागातील अण्णा हजारे व अरुण शौरी यांचे मिश्रण असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्याने २ कोटीच्या कामात ५४ कोटींचा भ्र्ष्टाचार झाल्याची तक्रार उपसभापतीनी विरोधात  केल्याचे सभापतींच्या पॅडवर  केल्याने व पंतप्रधान ,मुख्यमंत्री पासुन प्रत्येक अधिकाऱ्याला दिल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे कुशलचे देयक साधे एम बी न करता रोखण्यात आले आहे . सभापती व उपसभापती हे शिवसेनेचे असल्यानंतरही कमिशनच्या वादात तक्रारीचा पाऊस पडत आहे मात्र यामध्ये विकास व शेतकरी होरपडला जात असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत 
=============
=======

No comments: