Friday, September 15, 2017

'तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी ' अकालनीय - किशोर तिवारी


'तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफीची देण्याची मागणी ' अकालनीय - किशोर तिवारी 

दिनांक -१५ सप्टेंबर २०१७
यावेळी देशाच्या इतिहासात अभुतपुर्व असलेल्या महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या शेतकऱ्यांच्या अल्प व मध्यम अवधीच्या सर्व अड्चणीतल्या व शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्यातील ९८ टक्के शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें’ची तात्काळ अंबलबजावणी करून कर्जमाफी देण्याची सत्तारूढ विरोधी पक्षाची मागणी अकालनीय व आवश्यक नसल्याची ठाम भुमिका  कै वसंतराव नाईक शेतकरी मिशन अध्यक्ष किशोर तिवारी मांडली असुन असा आग्रह २००८च्या संपुआ सरकारची  कर्जमाफीच्या दूरपयोगाची पुर्णरावृत्ती करणारा असुन अडचणीतल्या शेतकऱ्यांची खरी ओळख करून त्यांनी यादी गावाच्या चावडी लाऊन सर्वांचा आक्षेप व समावेश करणे व कर्जमाफी होत असलेल्या शेतकऱ्याला नवीन पीककर्ज मिळणे काळाची गरज असुन सरकारला सर्वस्तरावरून सहकार्य करण्याची विनंती तिवारी  आहे . 
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें’तर्गत आतापर्यंत ९८ लाख अर्जाची नोंदणी झाली असुन ५०  लाखावर  शेतकर्‍यांनी आनलाईन अर्ज भरले आहेत. कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना व्हावा एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही अर्ज भरण्यासाठी गावातील सर्व शासकीय कर्मचारी शेतकऱ्यांना मदतीचे  आदेश  असुन सध्या ही   मुदत २२ सप्टेंबरपर्यंत असुन सर्व तांत्रिक अडचणी दुर करीत एकही पात्र शेतकरी  वंचित राहणार नाही अशी माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज सहकार व कृषी आयुक्तांच्या आढावा बैठकीनंतर दिले . 
सरसकट व अर्ज न करता कर्जमाफीची मागणी करणारे हे शेती न करणारे सातबारा धारक शेतकरी असुन सरकारने मक्त्याने वा भाडेपट्टीने या नामधारक शेतकऱ्यांची शेती करणाऱ्या दलीत आदीवासी इतर मागास अल्प भूधारक शेतकऱ्यांची वा भूमीहीन शेतकऱ्यांची ओळख करण्याच्या शास्त्रशुध्द प्रक्रियेला तात्काळ कर्जमाफी देण्याच्या मागणीने फाटा मिळणार असल्याची भीती तिवारी यांनी व्यक्त केली आहे. 
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंमध्ये सर्व अडचणीचे शेतकरी येतील व २००९ ते २०१६ पर्यंत पीककर्ज थकीत असलेले व बँकांनी पुर्नगठीत केलेले २०१७च्या हंगामात हप्ता न भरलेले वा भरलेले शेतकरी पात्र असल्याची माहीती यावेळी तिवारी यांनी दिली . घरात वडील व १८ वर्षावरील सर्व वेगवेगळी सातबारा असणारी मुले  स्वतंत्रपणे कर्जमाफी पात्र असुन मयत शेतकऱ्यांचे वारस यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहीती दिली . 
 ८ सप्टेंबर रोजी सर्व शासकीय निर्णयामध्ये कर्जमाफीची व्याप्ती सरकारने वाढविली असुन सर्व प्रकारच्या कृषी क्षेत्रातील मध्यम कालावधीच्या कर्जालाही छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंचा लाभ मिळणार असुन  पुर्नगठीत कर्जाच्या परत  न केलेल्या थकीत कर्जाच्या सुद्धा मिळणार असल्याची माहीती तिवारी यांनी दिली .
 =======================

No comments: