शेतकरी मिशन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची दारी :शासकीय मदत देण्याचे आदेश
दिनांक -९ सप्टेंबर २०१७
यवतमाळ जिल्हातील करंजी व सिंगलदिप येथे एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविण्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत कै वसंतराव नाईक शेती स्वा मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी भाजपचे नेते माजी जी.प . सद्यस्य रॉकेशभाऊ नेमनवार ,भाजपचे नेते डॉ बी झेड बावणे ,आदीवासी नेते अंकित नैताम ,तलसीलदार महादेवराव जोरवार , गटविकास अधिकारी मधुकरराव घसाळकर ,प्रशांतरावं बावणे ,विशालराव झोटींग यांच्या सोबत करंजी व सिगलदीप या ठिकाणी भेट देऊन करंजी येथील मोहन चव्हाण व सिंगलदिप येथील राजू टेकाम यांच्या कुटुंबांची सांत्वना कडून त्यांच्या अडचणींनी विचारपुस केली .
यावेळी मुंबईच्या ग्रँड मराठा फोंडेशन तर्फे या कुटुंबाना आर्थीक मदतीचे वाटप करण्यात आले . करंजी येथील आत्महत्याग्रस्त चव्हाण यांच्या बी एस सी चा अभ्यासक्रमात असणाऱ्या मुलीचा पुढील शिक्षणाचा संपुर्ण खर्च
करंजी येथील शेतकरी मोहन चव्हाण यांनी तणनाशकची फवारणी केल्यानंतर संपुर्ण पऱ्हाटी चिमुन संपुर्ण खराब झाली होती व त्यानंतर ४ एकरात ४० हजाराचे रासायनिक खत वापरूनही कोणतीही सुधारणा न झाल्यामुळें नैराश्यात गेल्याने आत्महत्या केल्याची माहीती कुटुंबीयांनी दिल्यावर किशोर तिवारी या प्रकरणाची संपुर्ण चौकशीची आदेश उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांना दिले तसेच करंजी व सिंगलदिप येथील दोन्ही आत्महत्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील असल्यामुळे या कुटुंबाना शासकीय मदत व संपुर्ण पिककर्ज देण्याची घोषणा किशोर तिवारी यांनी यावेळी केली =======================================================

No comments:
Post a Comment