Sunday, September 2, 2018

आदिवासींना वाऱ्यावर सोडून सारे अधिकारी कर्मचारी प्रकल्प अधिकाऱ्याच्या लग्नाला :वासरी कोलाम पोडावर पुन्हा एकदा सरकारची उदासीनता आली समोर

आदिवासींना वाऱ्यावर सोडून सारे अधिकारी कर्मचारी प्रकल्प अधिकाऱ्याच्या लग्नाला :वासरी कोलाम पोडावर पुन्हा एकदा सरकारची उदासीनता आली समोर 
दिनांक - २ सप्टेंबर २०१८
घाटंजी  तालुक्यातील  आदीवासी ,कोलाम ,पारधी ,शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास,पाणी ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारी समाधान करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  वासरी कोलाम पोडावर   सरकार आपल्यादारी कार्यक्रम  आयोजित केला  होता.   या कोलाम पोडावर पार्डी  साखरा तरोडा वडनेर लिंगापुर मोवाडा पहापळ टिटवी राजूरवाडी मारेगाव येथील शेकडो आदीवासी महीला आपल्या आदिवासी विकास ,अन्न  पुरवडा ,ग्राम विकास ,पाणी पुरवडा कृषी  व आरोग्य विभागाच्या प्रचंड तक्रारी समोर  समोर आल्या मात्र घाटंजी तहसीलदारासह आदीवासी प्रकल्प कार्यालयाचे सर्वच अधिकारी प्रकल्प अधिकाऱ्यांचा लग्नात खुर्च्या उचलण्यासाठी गेल्यामुळे एकही अधिकारी उपस्थित नव्हता यावर सर्व आदिवासींनी आपला असंतोष प्रगट करीत या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली यावेळी कोलाम नेते ,माधवराव टेकाम ,भीमराव नैताम ,बाबुलालजी मेश्राम ,लेतुजी जुनघरे ,अंकितराव नैताम व  जी.प .प्रतिनिधी  सविता मोहनराव जाधव यांनी आपल्या भावना प्रगट केल्या . 
यावेळी वासरी कोलाम पोडाचे रामकृष्ण आत्राम ,भीमराव टेकाम ,कवडू आत्राम ,विठ्ठल सुरपाम ,बापुंण्या आत्राम ,सुखदेव सुरपाम ,संजय आत्राम ,प्रशांत आत्राम ,बाजीरावजी आत्राम व मोतीराम मेश्राम यांनी आमच्या पोडावर पाणी वीज रस्ता घरकुल जातीचे प्रमाणपत्र तसेच आरोग्याच्या प्रचन्ड तक्रारीं या कार्यक्रमात विविध विभागाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विभागीय अधिकारी उपस्थित राहणार होते मात्र जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आपण पुन्हा आपल्या दारी येण्याचे आश्वासन किशोर तिवारी . 
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल झरी राळेगाव घाटंजी केळापूर मारेगाव तालुक्यातील आदिवासींच्या सरकारच्या मस्तवाल अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे समस्यांच्या डोंगर साचला आहे त्यामध्ये  कोलाम घरकुल योजना , समाज मंदिर ,युवा रोजगार ,कौशल्य विकास ,आदिवासी विभागाच्या या भागातील कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ ,विषारी पिण्याच्या पाण्याची समस्या ,घरकुल ,ग्राम विकास योजनांचा या भागातील जनतेला  मिळालेला लाभ ,कृषी विभागाच्या योजनांचा या भागातील आदिवासी ,कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ , बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ,कर्जमाफीच्या योजनांचा या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला लाभ,या जनतेला  घराचे व शेताचे मालकीचे पट्टे देण्याचे सर्व प्रकरण , वन्य प्राण्याचा त्रासामुळे रोजगार गमावलेल्याना नुकसान भरपाई ,या जनतेला गॅस जोडणी ,वन रोजगार ,  घाटंजी  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, वीज जोडणी ,वीज पुरवढा या विषयी  समस्या      जनतेच्या  शिक्षणाच्या सवलती व लाभ ,या तालुक्यातील    परीसरातीलवरळी मटका व कोंबडा बाजाराचा ,दारू विक्रीचा हैदोस रोखण्यासाठी उपाययोजना,उच्चं न्यायालयाचा आदेश नुसार या भागातील कोलाम व पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल,कर्जमाफी पासुन  वंचित असलेल्या या भागातील
शेतकऱ्यांची  यादी ,या   प्राथमिक  आरोग्यकेंद्राच्या समस्या सतत पाठपुरावा करूनही सुटत नसल्याने हा सरकार आपल्यादारी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आला आहे मात्र भ्र्ष्ट अधिकाऱ्यांनी त्याचे तीनतेरा केल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी यावेळी केला '
======================================================

No comments: