Wednesday, September 5, 2018

७ सप्टेंबरला सुन्ना टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळावा :श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेच्या तात्काळ लागु करण्यासाठी शेतकरी संघर्षाच्या मार्गावर 
दिनांक -६ सप्टेंबर २०१८
टिप्पेश्वर अभयारण्याला लागुन असलेल्या मराठवाकडी ढोकी सुन्ना टेम्बी सुसरी पेंढरी वऱ्हाकवडा कोपामांडवी कोबाई कोदोरी कारेगाव घुबडी वळवाट रूढा खैरी कारेगाव बंडल अर्ली गणेरी भीमकुंड मंगी सगदा सावंगी सावरगाव रामपूर जाम कालेश्वर  मातनी झुली बोथ बहात्तर येथील सुमारे ३० हजारावर शेतकऱ्यांचे उभे पीक रानडुक्कर व रोह्यानी नष्ट केले असुन  वनखाते कृषी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तर सोडा त्यांचे साधे पंचनामेही होत नसुन आता या अन्यायांविरुद्ध या ३४ गावाच्या शेतकऱ्यांनी जी. प . प्रतिनिधी गजानन बेजंकीवार पंचायत समिती सभापती इंदुताई मिस्सेवार ,उपसभापती संतोष बोडेवार ,घाटंजी  पंचायत समिती प्रतिनिधी जीवनभाऊ मुद्दलावर  पारवा जी. प . प्रतिनिधी रूपेश  क्यातमवार  पंचायत समिती प्रतिनिधी सुहासभाऊ पारवेकर यांच्या पुढाकाराने एकवटले असुन येत्या शुक्रवार ७ सप्टेंबरला टिप्पेश्वर अभयारण्याच्या सुन्ना गेटवर टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळावा आयोजीत केला आहे . 
या टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्याला लोकनेते अण्णासाहेब पारवेकर ,शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,आदीवासी नेते अंकित नैताम ,शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार ,धर्माभाऊ आत्राम ,बाळासाहेब राऊत ,बाबुलाल मेश्राम उपस्थित राहणार आहे . 
टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी समितीच्या प्रमुख्य मागण्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्यात यावी ,श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेमध्ये सरकारी अनुदानेमार्फत सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे कुंपन लावून देण्यात यावे यांचा समावेश असुन या मेळाव्याला वनखात्याच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले असुन मोठ्या प्रमाणात शेतकरी शामिल होणार आहेत अशी माहीती संयोजक पवन चिंतकुंटलावर ,रामण्णा बोलकुंटवार , श्रीहरी जिड्डेवार ,दामोदर  चिंतकुंटलावर,धर्माजी बावणे ,माधवराव मरसकोल्हे  हनुमंतू कायपेल्लीवार  गजानन  जिड्डेवार,गणेरीचे निरंजनभाऊ कोचहाडे ,मंगीचे मनोज जडगिलवार ,अविनाश आनंदीवार ,प्रवीण खेरलावार ,राकेश आपतवार यांनी केले आहे . 


No comments: