Thursday, September 13, 2018

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हैराण :अडेगाव येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात जनतेनी वाचला समस्यांचा पाढा

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हैराण :अडेगाव येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात जनतेनी वाचला समस्यांचा पाढा 
दिनांक -१३ सप्टेंबर २०१८
झरी तालुक्यात शेतकरी महावितरण कंपनीच्या भोगलं कारभारामुळे त्रस्त झाले असुन रोहित्र डी पी चार  चार महिन्यांपासून बंद असणे घरगुती मीटरचे बिल हजारोच्या घरात येणे तसेच  सरकारी अनुदान ,पीककर्ज ,आरोग्य सुविधा यासाठी प्रचंड ओरड झाल्यामुळे शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,आमदार संजय बोदकुलवार यांनी तहसीलदार अश्विनी जाधव ,नायब तहसीलदार रामचंद्र खीरेकर ,गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण ,सह गटविकास अधिकारी शिवाजीराव गवई ,महावितरण कंपनीचे अभियंता लटारे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ गेडाम ,ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या उपस्थितीत सरकार आपल्यादारी कार्यक्रम अडेगाव  तालुका झरी   ६ सप्टेंबरला  घेतला असताना परिसरातील नागरीकांनी वीज वितरण ,अन्य सर्व विभागाचा समस्यांचा पाढाच वाचल्याने किशोर तिवारी व आमदार संजय बोदकुलवार जनतेच्या आक्रोशाची सामना करावा लागला . 
मागील पंधरवाड्यात उपविभागाचे  सर्व अधिकारी आदिवासींच्या समस्या वाऱ्यावर सोडून उपविभागीय अधिकाऱ्याच्या लग्नाला तिरुपतीला गेल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या प्रकारांनंतर या सर्व कामचुकार व नाकर्त्या अधिकाऱ्यांची मस्तवालपणाची परीक्षा घेण्यासाठी तसेच झरी  तालुक्यातील  आदीवासी ,कोलाम ,पारधी ,शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास,पाणी ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारी समाधान करण्यासाठी   सरकार आपल्यादारी कार्यक्रम अडेगाव  तालुका झरी     येथे  आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाला आदीवासी कार्यकर्ते जिल्हापरिषद सदस्यसंगीताताई सुरेश मानकर जिल्हापरिषद सदस्य मिनाक्षीताई सुरेश बोलेनवार जिल्हा परिषद सदस्य, लताताई आत्राम पंचयात समिती सभापती,राजु  गोंडरावार पंचायत समिती सदस्य, अशोकरेड्डी बोदकुरवार, अनिल भाऊ पोटे तालुका भाजपा अध्यक्ष , अनिल पावडे, विठल बंडेवार ,सुरेश बोलेनवार, सुरेश मानकर, सतिश नाकले, शाम बोदकुरवार, उपस्थित होते  . 
यावेळी शेतकऱ्यांनी तलाठी गावात येत नसल्याच्या तक्रारी केल्या ,मुकुटबन येथील ग्रामीण बँक व स्टेट बँक पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याची  तक्रार केली . शेतकरी महावितरण कंपनीच्या कडुन  रोहित्र डी पी चार  चार महिन्यांपासून पुरवढा होत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली किशोर तिवारी यांनी ह्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या आश्वासन यावेळी दिले . 
या सरकार आपल्यादारी कार्यक्रमाचे संयोजन  अडेगाव सरपंच अरुण हिवरकर उपसरपंच सिंधुताई टेकाम ,तंटामुक्ती अध्यक्ष निर्मलाताई दातारकार नंदू वऱ्हाडे भास्कर सूर गोविंदराव उरकुडे संजयभाऊ दातारकार सखाराम ठेंगणे यांनी केले होते . 
=========================================

No comments: