Saturday, September 8, 2018

नाकर्त्या अधिकारी व बँकाच्या उदासीनतेमुळे हजारो शेतकरी बोंडअळी अनुदानापासून ऐन पोळ्यात वंचित


नाकर्त्या अधिकारी व बँकाच्या उदासीनतेमुळे हजारो शेतकरी  बोंडअळी अनुदानापासून ऐन पोळ्यात  वंचित 
दिनांक -८ सप्टेंबर २०१८

                                   महाराष्ट्र  सरकारने बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिलेली हेक्टरी रु . ६८००  दोन हेक्टर पर्यंतची मदत सरकारने उपलब्ध करून दिल्यानंतरही अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाच्या खात्यात जमा केल्याने शेतकऱ्यांच्या एकमेव सर्वात महत्वाचा पोळा सण कोरडा झाला असुन अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने मदतीची रक्कम जमा करूनही आमच्या जवळ वेळ नाही म्हणुन बँकांनी न दिल्याच्या प्रचंड तक्रारी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे  अध्यक्ष किशोर तिवारी यांना मिळाल्याअसून या सर्व नाकर्त्या व मस्तवाल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारला शेतकरी मिशनने रीतसर तक्रार दिली आहे . 

                                                      यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोलाम आदीम जमातीचे आंबेझरी इजारा येथील   शेतकरी पोतू भीमा आत्राम सुनील आत्राम तुळशीराम लोनसावाले ,मणिराम आत्राम ,शशिकांत ढवळे या शेतकऱ्यांनी दिलेल्या लेखी  तक्रारीमध्ये म्हटले आहे की सेंट्रल बँक शाखा मारेगाव येथे त्यांची बोंडअळीची मदत जमा झाली आहे मात्र व्यवस्थापक सोनकुसरे यांनी थकीत पीककर्जामध्ये जमा केली आहे . महाराष्ट्र सरकारने मदतीचे अनुदान कर्जात जमा करण्यात येऊ नये असे स्पष्ट केल्यानंतरही आपण का कपात केली अशी विचारणा केली असता आमच्या बँकांवर  महाराष्ट्र सरकारचे नियंत्रण नसल्याचे उत्तर दिले अशीच परिस्थीती स्टेट बँकेच्या व महाराष्ट्र बँकेच्या शाखेत आहे , दाभाडी झरी तालुक्यातील शेतकरी  नामदेव आत्राम यांची बोंडअळीची मदत पिक कर्ज खात्यात जमा करण्याचे आदेश महाराष्ट्र बँकेच्या झरी शाखेने दिल्यांनतर विभागीय व्यवस्थापक प्रशांत गजभिये यांच्याकडे किशोर तिवारी यांनी तक्रार केली त्यांनी असा प्रकार होणार नाही असे आश्वासन दिले मात्र मस्तवाल बँक अधिकाऱ्याने ऐन पोळ्यात मदत शेतकऱ्यांच्या हातात दिलीच नाही 

                    महाराष्ट्र सरकारने बोंडअळीची मदतीचा दुसरा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उपलब्ध करून दिला व जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी हे मदतीची रक्कम तात्काळ तहसीलदारांना वळती केली मात्र घाटंजी झरी केळापूर या आदिवासी भागातील महसूलचे अधिकारी व कर्मचारी तिरुपतीला भुवनेश्वरीदेवीच्या दर्शनाला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गेल्यानें बोंडअळीची मदतीचे रखडले त्यातच बँकांनी दररोज फक्त १० ते १५ शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम वळती केल्याने १ महिन्यापासून आलेली रक्कम लालफीतशाही शेतकऱ्यांच्या पासुन वंचित राहीली आहे आपण या सर्व प्रकार राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांना कळविला असुन त्यांनी चौकशीची आश्वासन दिल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले आहे . 

                         बोंडअळीची मदतीच्या वाटपामध्ये सरकारी बँकाच शेतकऱ्यांवर अन्याय करीत नसुन मध्यवर्ती सहकारी बँकांचे अधिकारी आखाडीवर असल्याच्या आरोप किशोर तिवारी यांनी केला असुन हा प्रकार त्यांनी यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमनराव गावंडे यांच्याकडे केल्यावर त्यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी सर्व मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा फक्त बोंडअळीची मदतीच्या वाटपासाठी सुरु ठेवल्या आहेत मात्र शेतकऱ्यांनी आमची सुट्टी खराब केली याचा रोष प्रगट करीत त्यांनी मुठभर लोकांना बोंडअळीची मदतीचे वाटप केल्याने उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांच्या व त्यांच्या कडे काम करणाऱ्या शेतमजुरांचा पोळा कोरडा गेल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली . 


===============================================================

No comments: