Monday, September 10, 2018

टिप्पेश्वर अभयारण्याच्या वन्यप्राण्यामुळे हजारो हेक्टर वरील पिके नष्ट :सुन्ना येथील वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्यात आंदोलनाची घोषणा

टिप्पेश्वर अभयारण्याच्या वन्यप्राण्यामुळे हजारो हेक्टर वरील पिके नष्ट :सुन्ना येथील  वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्यात आंदोलनाची घोषणा 
दिनांक -११  सप्टेंबर २०१८
टिप्पेश्वर अभयारण्याला लागुन असलेल्या मराठवाकडी ढोकी सुन्ना टेम्बी सुसरी पेंढरी वऱ्हाकवडा कोपामांडवी कोबाई कोदोरी कारेगाव घुबडी वळवाट रूढा खैरी कारेगाव बंडल अर्ली गणेरी भीमकुंड मंगी सगदा सावंगी सावरगाव रामपूर जाम कालेश्वर  मातनी झुली बोथ बहात्तर येथील सुमारे ३० हजारावर शेतकऱ्यांचे उभे पीक रानडुक्कर व रोह्यानी नष्ट केले असुन  वनखाते कृषी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तर सोडा त्यांचे साधे पंचनामेही होत नसुन आता या अन्यायांविरुद्ध या ३४ गावाच्या शेतकऱ्यांनी जी. प . प्रतिनिधी गजानन बेजंकीवार पंचायत समिती सभापती इंदुताई मिस्सेवार ,उपसभापती संतोष बोडेवार ,घाटंजी  पंचायत समिती प्रतिनिधी जीवनभाऊ मुद्दलावर  पारवा जी. प . प्रतिनिधी रूपेश  क्यातमवार  पंचायत समिती प्रतिनिधी सुहासभाऊ पारवेकर मोहन मामीडवार  यांच्या पुढाकाराने एकवटले असुन मागील  शुक्रवार ७ सप्टेंबरला टिप्पेश्वर अभयारण्याच्या सुन्ना येथील  टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्यात वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा पाढाच यावेळी वाचण्यात आला . 
माजी आमदार  लोकनेते अण्णासाहेब पारवेकर यांनी मागील दोन वर्षात  रानडुक्करांची  व रोह्याच्या संख्या वाघासारखीच वाढली असुन आमचे जगणे कठीण झाले असुन सरकारने या हजारो शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी रेटली . 
वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी  पंचनामा करण्याचे पैसे मागतात व नुकसान हजारोच्या घरात व मोबदला शे पाचशे देतात अशी तक्रार सुन्नाचे सरपंच पवन चिंतकुंटलावार यांनी केल्यावर साऱ्या शेतकऱ्यांनी हा प्रकार आम असल्याचे सांगीतले तसेच मोबदला घेण्यासाठीही पैसे खात असल्याची तक्रार करण्यात आली . वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमींना वाऱ्यावर वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी  सोडतात व नियमानुसार मिळणारी मदत देण्यास देत नसल्याच्या तक्रारी येत असल्याची  खंत मदन जिड्डेवार व मोहन मामीडवार यांनी व्यक्त केली . 
यावेळी टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी समितीचे पवन चिंतकुंटलावर ,रामण्णा बोलकुंटवार ,श्रीहरी जिड्डेवार ,दामोदर  चिंतकुंटलावर,धर्माजी बावणे ,माधवराव मरसकोल्हे  हनुमंतू कायपेल्लीवार  गजानन  जिड्डेवार,गणेरीचे निरंजनभाऊ कोचहाडे ,मंगीचे मनोज जडगिलवार ,अविनाश आनंदीवार ,प्रवीण खेरलावार ,राकेश आपतवार यांनी शेतकरी समितीच्या प्रमुख्य मागण्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्यात यावी ,श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेमध्ये सरकारी अनुदानेमार्फत सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे कुंपन लावून देण्यात यावे असा ठराव मांडला व तो आपण सरकार दरबारी रेटणार अशी घोषणा शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली . 
या टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्याला लोकनेते अण्णासाहेब पारवेकर ,शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,शेतकरी नेते मदन जिड्डेवार ,आदीवासी नेते अंकित नैताम ,शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार ,धर्माभाऊ आत्राम ,दलीत नेते नितीनभाऊ कांबळे ,बाळासाहेब राऊत ,बाबुलाल मेश्राम उपस्थित होते  . 
टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त  मेळाव्याला वनखात्याच्या अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात शेतकरी शामिल झाले होते  .  

No comments: